Home लाईफ स्टाईल पुरुष मंडळींनी पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे 5 घरगुती उपाय
लाईफ स्टाईल

पुरुष मंडळींनी पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे 5 घरगुती उपाय

20
Stress and belly fat
Stress and belly fat

Belly Fat in Men : सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे प्रत्येकाला फिट राहणे जमत नाही. डेस्क जॉब, चुकीच्या वेळेस खाण्यापिण्याची सवय आणि बिघडलेली लाइफस्टाइल यामुळे पोटावरील चरबी वाढली जाते. महिलांपेक्षा पुरुष मंडळींमध्ये पोट वाढल्याची समस्या अधिक दिसते. बेली फॅटमुळे केवळ लूक बिघडला जात नाही तर काही आजारही मागे लागतात. बेली फॅट कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज, डाएट प्लॅन फॉलो केले जातात. याशिवाय काही घरगुती उपाय देखील करू शकतो. जेणेकरुन पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊ….

पुरुषांमधील बेली फॅटची कारणे
-ऑफिसमध्ये दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम करण्याच्या सवयीमुळे पुरुषांमध्ये बेली फॅटची समस्या दिसते.
-दारुचे अत्याधिक प्रमाणात सेवन करणे
-अत्याधिक प्रमाणात प्रोसेस्ड फूड, शुगर आणि तेलकट-तिखट पदार्थांचे सेवन करणे

Remedies For Reducing Belly Fat

घरगुती उपाय
-अळशीच्या बिया
पुरुष मंडळींना वजन कमी करायचे असल्यास अळशीच्या बियांचे सेवन करू शकता. अशळीच्या बियांमध्ये विघटनशील आणि अविघटनशील फायबर असते, जे दीर्घकाळ पोट भरल्यासारखे जाणवून देते. या बियांमध्ये लिग्नान असते, जे पुरुषांच्या टेस्टोरोन हार्मोनला संतुलित करते. पुरुषांनी दही, स्मूटी किंवा चटणीसोबत अळशीच्या बियांचे सेवन करावे.

दालचिनीची चहा
दालचनिनीच्या चहाचे सेवन केल्याने शरीरात थार्मोजेनिक अॅक्टिव्हिटी वेगाने वाढली जाते. यामुळे शरीर काम करताना अत्याधिक कॅलरीज बर्न करते आणि पोटावरील चरबी कमी होते. बेली फॅट कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणानंतर दालचिनीची चहा पिऊ शकता.

आवळ्याचा ज्यूस
दररोज सकाळी उपाशी पोटी आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. याशिवाय आवळ्याच्या ज्यूसमुळे लीव्हर डिटॉक्स होते. दररोज आवळ्याच्या ज्यूसचे सेवन केल्याने बेली फॅट वेगाने कमी होण्यास मदत होऊ शकते.

=======================================================================================================

हेही वाचा : 

Hair Care : घामामुळे चिकट होणाऱ्या केसांसाठी सोप्या टिप्स

चेहऱ्यावर कच्चे दूध लावता? फायद्यासह जाणून घ्या तोटे

=======================================================================================================

मेथीचे दाणे
मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्याने शरीरातील थर्मोजेनेसिसची प्रक्रिया वेगाने होते. दररोज नाश्तापूर्वी भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्याने पोटावरील चरबी कमी होऊ शकते.(Belly Fat in Men)

अश्वगंधा
पुरुषांनी दररोज अश्वगंधाचे सेवन करावे. यामुळे कोर्टिसोल हार्मोनचा स्तर कमी होतो. अश्वगंधा पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरोनचा स्तर वाढवतो. बेली फॅट आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी अश्वगंधाची चहा पिऊ शकता.

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....