Home लाईफ स्टाईल कंसीलर लावताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या टिप्स
लाईफ स्टाईल

कंसीलर लावताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या टिप्स

10
Beauty Tips
Beauty Tips

Beauty Tips : चेहऱ्यावरील डाग, डार्क सर्कल्स, पिंपल्स किंवा थकवा लपवण्यासाठी कंसीलरचा वापर केला जातो. परंतु कंसीलर योग्य पद्धतीने लावला नाही, तर तो चेहऱ्यावर उठून दिसू शकतो आणि तुमचा संपूर्ण मेकअप खराब होऊ शकतो. त्यामुळे कंसीलर लावताना काही टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे, ज्यामुळे तुम्ही नैसर्गिक, फ्लॉलेस आणि स्मूद लूक मिळवू शकता.

सर्वप्रथम, कंसीलर लावण्यापूर्वी चेहऱ्याचे प्रेपरेशन करणे फार महत्वाचे आहे. त्यासाठी चेहरा स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे त्वचा मऊ राहते आणि कंसीलर नीट बसतो. जर तुमच्या डोळ्याखाली त्वचा कोरडी  असेल, तर व्यवस्थितीत बसू शकत नाही. म्हणून अंडर-आय क्रीम वापरणं आवश्यक ठरतं. यानंतर प्राइमर वापरणं फायदेशीर ठरतं, जो कंसीलर टिकवून ठेवण्यास मदत करतो.

Beauty Tips
Beauty Tips

कंसीलर निवडताना त्याचा शेड तुमच्या त्वचेच्या रंगाशी किंवा फाउंडेशनशी जुळतो का हे तपासणे महत्त्वाचे आहे. डार्क सर्कल्ससाठी तुमच्या स्किन टोनपेक्षा एक शेड हलकाच कंसीलर निवडावा. जर खूप डार्क सर्कल्स असतील, तर त्याआधी ऑरेंज किंवा पीच करेक्टर वापरल्यास उत्तम कव्हरेज मिळते. यामुळे डार्कनेस लपतो आणि नंतर लावलेला कंसीलर उठून दिसत नाही. कंसीलर लावताना ‘डॉट’ करत लावावे. डोळ्याखाली त्रिकोण आकारात काही डॉट्स लावून, स्पंज किंवा फिंगरच्या सहाय्याने ते टॅप करत ब्लेंड करावं. कंसीलर घासू नका, कारण त्यामुळे कंसीलर हलतो आणि त्वचेवर रेघा दिसू शकतात.(Beauty Tips)

==========

हे ही वाचा : 

बदलत्या ऋतूनुसार हेअर केअर प्रोडक्ट्स बदलावेत का?

पावसाळ्यात चेहऱ्याची त्वचा तेलकट होते? करा हे घरगुती उपाय

============

कंसीलर वापरताना ब्लेंडिंग सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. जर तुम्ही ब्रश, स्पंज किंवा बोटांचा वापर करत असाल, तरीही टॅपिंग मोशनमध्ये ब्लेंड केल्यास नैसर्गिक फिनिश मिळते. ब्लेंडिंगनंतर सेटिंग पावडर लावणे विसरू नका, विशेषतः अंडरआय भागात. ट्रान्सलुसंट पावडर ही यासाठी योग्य पर्याय असतो.(Latest Marathi News)

शेवटी, संपूर्ण लूकमध्ये कंसीलर नैसर्गिक वाटावा यासाठी तुम्ही त्यावर हलकासा हायलायटर लावू शकता. पण यामध्ये अतिरेक होऊ देऊ नका. एकसंध, नैसर्गिक आणि ग्लोइंग लूकसाठी कंसीलर योग्य प्रमाणात, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने वापरणं हेच यशस्वी मेकअपचं गमक आहे. या टिप्स लक्षात ठेवून तुम्हीही परिपूर्ण मेकअप लूक सहज साधू शकता.(Make up tips)

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....