Home लाईफ स्टाईल चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील कमी, ट्राय करा हे घरगुती उपाय
लाईफ स्टाईल

चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील कमी, ट्राय करा हे घरगुती उपाय

9
Beauty Tips
Beauty Tips

Beauty Tips : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात महिलांमध्ये अँटी-एजिंगची समस्या उद्भवल्याचे दिसून येते. यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट्स केल्या जातात. तत्काळ अँटी-एजिंगच्या समस्येपासून सुटका होते. पण पुन्हा कालांतराने ही समस्या चेहऱ्यावर दिसून येते. अशातच पुढील काही घरगुती उपायांनी तुम्ही चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या कमी करू शकता.

एलोवेरा जेल
एलोवेरा जेलमध्ये अँटीसेप्टिक, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेंटरीसारखे काही गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. एलोवेरा जेलचा वापर केल्याने त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या कमी होऊ शकते. याशिवाय चेहऱ्यावर ग्लो देखील येतो. यासाठी एलोवेरा जेल घेऊन ते चेहऱ्यावर लावा. चेहऱ्याला मसाज करा. हा उपाय आठवड्यातून तीन वेळा करू शकता.

अंड
अंड्याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या कमी करू शकता. अंड्यामध्ये काही व्हिटॅमिन्स असतात. यामध्ये प्रोटीन देखील असते. याच्या मदतीने सुरकुत्या कमी होण्यासह चेहऱ्यावर ग्लो देखील येतो. यासाठी अंड्याचा सफेद भाग घेऊन तो व्यवस्थितीत फेटून घ्या. हे मिश्रण चेहऱ्याला लावून ठेवा आणि सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चराइजर लावा.

तेलाचा वापर
ज्या प्रकारे केसांचे मसाज करता त्यानुसार तेलाने चेहऱ्याचाही मसाज करू शकता. तेलाने चेहरा मसाज केल्याने ब्लड सर्कुलेशन वेगाने होते. याशिवाय कोलेजन उत्पादन वाढले जाते. यासाठी बदामाचे तेल, नारळाचे तेल किंवा ऑर्गन ऑइलचा वापर करू शकता. अथवा एसेंशिअल ऑइलाचाही वापर करू शकता. पण यामध्ये नारळाचे तेल जरुर मिक्स करा. अन्यथा त्वचेवर खाज आणि जळजळ होण्याची समस्या होऊ शकते.

केळ्याचा मास्क
केळ्यामुळे चेहरा हाइड्रेट राहण्यास मदत होते. केळ्यामध्ये नैसर्गिक तेल आणि व्हिटॅमिन्स असतात, जे त्वचेला हेल्दी होण्यास मदत होते. यासाठी एक केळ स्मॅश करुन घ्या आणि चेहऱ्यावर मसाज करा. अर्धा तास चेहऱ्याला पॅक लावून ठेवल्यानंतर धुवा. यामुळे त्वचा ग्लो होण्यासह सुरकुत्यांची समस्या कमी होईल. (Beauty Tips)

पुरेशा प्रमाणात पाणी प्या
चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे फेस मास्क लावल्याने सुरकुत्यांची समस्या कमी होत नाही. यासाठी उत्तम डाएटचे सेवन करणे अत्यावश्यक आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या कमी करायची असल्यास पुरेशा प्रमाणात पाणी प्या. यामुळे शरिर हाइड्रेट राहण्यासह सुरकुत्यांची समस्याही कमी होईल.


आणखी वाचा :
स्वत:हून ब्राइडल मेकअप करणार असल्यास या टिप्स ठेवा लक्षात
ग्लोइंग त्वचेसाठी चेहऱ्यावर ब्लीच लावता? होईल गंभीर नुकसान

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....