Home गाजावाजा स्पेशल गुहेत ५०० दिवस घालवणारी बिएट्रिज नक्की आहे कोण?
गाजावाजा स्पेशल

गुहेत ५०० दिवस घालवणारी बिएट्रिज नक्की आहे कोण?

11
beatriz flamini
beatriz flamini

सोशल मीडियाच्या जगात सर्वजणांच्या हातात मोबाईल दिसून येत आहे. मोबाईल सध्या प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा हिस्सा बनला आहे. कोणतेही काम असो मोबाईलच्या एका क्लिवर केले जाते. तुम्ही सुद्धा कधी-कधी कंटाळा आल्यानंतर काही तास त्यामध्ये डोकं घालून बसता. म्हणूनच सोशल मीडियाच्या युगात आपण कल्पना करु शकत नाही की, एखादी व्यक्ती ५०० दिवस त्यापासून दूर राहू शकत नाहीत. परंतु स्पेन मधील एथलीटने असे करुन दाखवले आहे. हा कारनामा करणारी ५० वर्षीय एथलीटचे नाव बिएट्रिज फ्लेमिनी (Beatriz Flamini)असे असून जी स्पेन मधील ग्रेनाडा येथील एका गुहेत तब्बल ५०० दिवस ऐकटी राहिली. सध्या ती वैज्ञानिकांच्या निगराणीखाली आहे. तिच्या या कामगिरीला वर्ल्ड रेकॉर्डसाठी सुद्धा पाठवले गेले आहे. सध्या तिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

बिएट्रिज फ्लेमिनी २१ नोव्हेंबर २०२१ रोजी गुहेत गेली. त्यावेळी तिचे वय ४८ वर्ष होते. गुहेत तिने आपले दोन वाढदिवस साजरे केले. बिएट्रिजच्या सपोर्ट टीमच्या मते, ५०० दिवसांदरम्यान, तिने जवळजवळ ६० पुस्तके वाचली आणि १ हजार लीटर पेक्षा अधिक पाणी प्यायली. मात्र हा प्रवास सोप्पा नव्हता.

beatriz flamini
beatriz flamini

बिएट्रिजने गुहेच्या आतमधील अनुभव ही शेअर केले. तिने असे म्हटले की, एक अशी वेळ आली होती की, गुहेत राहून दिवस मोजणे बंद केले होते. याव्यतिरिक्त तिच्यावर मधमाश्यांनी सुद्धा हल्ला केला होता. तिने पुढे असे ही सांगितले की, ५०० दिवस केवळ आम्ही पाणीच प्यायलो. आता मला अंघोळ करायची आहे. परंतु वैज्ञानिकांनी असे करण्यास मनाई केलीय.(Beatriz Flamini)

गुहेतून बाहेर पडल्यानंतर आधी तिने आपल्या नातेवाईकांना आणि सपोर्ट टीमची गळाभेट घेतली. बोलताना तिने असे म्हटले की, जग बदलले गेले आहे. जेव्हा मी २१ नोव्हेंबर २०२१ रोजी गुहेत गेली तेव्हा असे काहीच नव्हते. सध्या वैज्ञानिकांकडून तिच्यावर लक्ष ठेवले गेले आहे. तिच्या सपोर्ट टीमचे असे म्हणणे आहे की, बिएट्रिजने सर्वाधिक दिवस गुहेत राहून रेकॉर्ड केला आहे.

हे देखील वाचा- मस्कमुळे चंद्रापर्यंत प्रवास करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार

आता पर्यंत सर्वाधिक दिवस गुहेत राहण्याच्या रेकॉर्ड बद्दल बोलले तर ३३ चिली आणि बोलिवियन खाणीतील मजूरांच्या नावे आहे. ज्यांनी ६९ दिवस कॉपर गोल्ड खाणीत घालवले. २०१० मध्ये खाणीत भूस्खलन झाल्यानंतर ते तेथे अडकले गेले होते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....