Home मनोरंजन विशाखा सुभेदारांनी केली ‘पॅडी’साठी पोस्ट
मनोरंजन

विशाखा सुभेदारांनी केली ‘पॅडी’साठी पोस्ट

9
Vishakha Subhedar Post

बिग बॉस मराठीची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ आहे. जेव्हा बिग बॉस मराठीची घोषणा झाली तेव्हापासूनच या शोबद्दल लोकांमध्ये खूपच उत्सुकता दिसून येत होती. शो कधी सुरु होणार इथपासून ते या शोमध्ये कोण कोणते चेहरे दिसणार इथपर्यंत सगळ्याच गोष्टींची चर्चा बरीच रंगताना दिसत होती. सोशल मीडियावर देखील याबद्दल अनेक पोस्ट होताना दिसल्या.

अखेर या बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या सर्वच कलाकारांच्या नावावरून पडदा उठला आणि अनेक लोकप्रिय, प्रसिद्ध नाव यात दिसली. यातलेच एक नाव आहे मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय विनोदी अभिनेता पंढरीनाथ कांबळे. अनेक चित्रपट, मालिका, शो, नाटक आदींमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत पंढरीनाथ उर्फ पॅडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता हाच पॅडी बिग बॉसमध्ये गेला आहे. त्याला घरात पाहून अनेकांना आनंद झाला तर अनेकांना आश्चर्य देखील वाटले.

बिग बॉस सुरु होऊन आता एक आठवडा झाला असून, नुकतेच ‘भाऊचा धक्का’ देखील झाला. यामध्ये रितेश देशमुखने पॅडी यांना अनेक गोष्टी सुनावल्या. बिग बॉसचा पहिलाच आठवडा तुफान गाजला. अनेक भांडणं, वाद घरात झाले. मात्र यात कुठेही पंढरीनाथ कांबळे हे नाव समोर आले नाही. यावरून रितेश देशमुख यांनी आपल्या शैलीमध्ये त्यांचा समाचार घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

पहिल्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे हे या शोचा बिग बॉसचा भाग असूनही आणि स्पर्धक असूनही कशातही भाग घेत नाही. ते घरात मिक्स होत नसल्याने रितेश देशमुखने ‘भाऊचा धक्का’मध्ये पंढरीनाथ कांबळेना खडेबोल सुनावले. “प्रेक्षक म्हणून नाहीतर स्पर्धक म्हणून तू घरात खेळायला आला आहेस त्यामुळे बघ्याची भूमिका न घेता व्यक्त हो” असा सल्ला देखील यावेळी रितेशने पॅडी यांना दिला. यावेळी पॅडी यांनी नक्कीच ते त्यांचा गेम सुधारत हा खेळ खेळण्यास सुरुवात करतील असे आश्वासन देखील दिले.

आता यावरूनच पंढरीनाथ कांबळे यांची जिवाभावाची मैत्रीण असलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदाराने त्यांना पाठिंबा देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. विशाखा यांनी त्यांचा आणि पॅडी यांचा एक फोटो शेअर करत लिहिले, “फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा मित्रा… तू तिथे त्यांच्या सारखा नसलास तरीही तू खूप खरा आहेस, वेगळा आहेस, सज्जन आहेस, तारेवरची कसरत तुला कायमच जमलीय. तिथेही तू मैत्री कर आणि ती निभव.. तुझ्यातले प्लस पॉइंट्स दाखवून दे…गप बसू नकोस…यारों का यार हैं तू..तुझ्या माणसासाठी तू उभा असतोस मदतीला,आज स्वतःसाठी उभा राहा..मित्रा..More power to you Paddy Kamble”

======

हे देखील वाचा : सुरेखा कुडचींचा वर्षा उसगावकरांना पाठिंबा

======

विशाखा यांनी त्यांच्या पोस्टमधून पॅडी यांचे मनोबल वाढवत त्यांना त्यांचा गेम खेळण्यास प्रवृत्त तर केले सोबतच त्यांच्यात असणाऱ्या खऱ्या माणसाची सगळ्यांना ओळख करून देण्यास देखील सांगितले. यारो का यार असणारे पॅडी कांबळे आता येणाऱ्या भागांमध्ये कसा त्यांचा गेम खेळणार हे बघणे नक्कीच महत्वाचे असणार आहे.

 

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...