Home आरोग्य डायपरच्या रॅशेसमुळे तुमचे मुलं सारखे रडते? ‘या’ सोप्प्या टीप्स करा फॉलो
आरोग्य

डायपरच्या रॅशेसमुळे तुमचे मुलं सारखे रडते? ‘या’ सोप्प्या टीप्स करा फॉलो

10
Diaper Rashes
Diaper Rashes

डायपरच्या रॅशेजमुळे (Diaper Rashes) नवजात बाळं आणि लहान मुलांना खुप त्रास होतो. तर बाळाच्या आईकडून त्याची किती ही काळजी घेतली तरीही त्यांची त्वचा ऐवढी नाजूक असते की, कधी ना कधी त्यांना डायपरचा त्रास होतो. रॅशेज आल्याने मुलं सारखी रडतातच पण पालकांना सुद्धा त्याची अधिक चिंता वाटू लागते. त्यामुळे आम्ही तुम्हाला डायपरच्या रॅशेज संदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. या व्यतिरिक्त डायपरच्या रॅशेजमुळे तुमचे मुलं त्रस्त असेल तर पुढील काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा.

-वेळोवेळी डायपर बदला
डायपरमुळे काही वेळेस मुलांना रॅशेज निर्माण होतात. कारण डायपरमध्ये असलेल्या ओलाव्यामुळे काही वेळेस ही रॅशेजची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे वेळोवेळी तुम्ही मुलाचे डायपर बदलले पाहिजे. बाळाचे डायपर अधिक भिजले असेल तर ते वेळीच बदला.

हे देखील वाचा- बाळाच्या जन्मानंतर आई करतेय प्रवास? तर ‘या’ गोष्टींची घ्यावी विशेष काळजी

-बेबी वाइप्सने त्वचा साफ करा
डायपर बदलताना बाळाच्या गुप्तांग स्वच्छ करणे विसरु नका. डायपर काढल्यानंतर बाळाच्या डायपर भागावरील त्वचवर वॉटर बेस्ड आणि डर्मेटोलॉजिस्ट टेस्टेड वाइप्सच्या माध्यमातून साफ करा. वाइप्समध्ये बांबू वॉटर असेल तर उत्तम. कारण त्यामध्ये काही महत्वाचे मिनिरल्ससह नैसर्गिक फ्लेवोनोइड्स उपलब्ध असतात. ते त्वचेवर सर्वाधिक अँन्टीऑक्सीडेंटच्या रुपात कार्य करतात. लगेच दुसरे डायपर घालण्याऐवजी काही वेळ बाळाला डायपरशिवाय ठेवा. जेव्हा डायपरचा भाग पूर्णपणे सुका होईल तेव्हा डायपर क्रिम लावा.

Diaper Rashes
Diaper Rashes

-डायपरची योग्य साइज निवडा
बाळासाठी डायपर घेताना योग्य साइज निवडा. परंतु अतिघट्ट डायपर बाळासाठी घेणे टाळा. एकवेळ डायपर थोडे सैल असेल तरीही चालेल. अतिघट्ट डायपरच्या माध्यमातून हवेला आतमध्ये जाण्यास जागा न मिळाल्यास ते अधिक चिडचिड करु शकते आणि सारखे रडू ही शकते.

-उत्तम गुणवत्तेचे डायपर वापरा
बाळासाठी डायपर खरेदी करण्यासाठी उत्तम गुणवत्तेचे ते आहेत का हे पहा. कारण डापर दीर्घकाळापर्यंत बाळाच्या त्वचेसंपर्कात राहते. मुलाच्या त्वचेला कोणताही त्रास होऊ नये म्हणून कमी किंमतीतील डायपर घेणे टाळा. लहान मुलांना मऊ आणि सुपर एब्जॉब्र क्वालिटी असणाऱ्या डायपरचा वापर करा.

बाळांना डायपरचा अधिक त्रास होत असेल डॉक्टरांचा सल्ला घेणे विसरु नका. कारण लहान मुलांची त्वचा ही अधिक सेंसेटिव्ह असल्याने त्याची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे वरील काही गोष्टी लक्षात घ्या आणि आपल्या बाळाला रॅशेजच्या समस्येपासून दूर ठेवा.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...