Home मनोरंजन ३६ वर्षांनी पुन्हा दिगज्जांचा ‘गं कुणीतरी येणार येणार गं’ गाण्यावर डान्स
मनोरंजन

३६ वर्षांनी पुन्हा दिगज्जांचा ‘गं कुणीतरी येणार येणार गं’ गाण्यावर डान्स

13
Ashi Hi Banwa Banwi

कोणत्याही मराठी माणसाला आपण विचारले की, तुमचा आवडता मराठी चित्रपट कोणता? तर सगळ्यांचे एकच उत्तर असेल आणि ते म्हणजे….. ‘अशी ही बनवा बनवी’. या सिनेमाने महाराष्ट्राला आणि मराठी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. २३ सप्टेंबर १९८८ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. आज तब्बल ३६ वर्षांनी देखील या सिनेमाची जादू सगळ्यांवर कायम आहे.

आजही सिनेमा टीव्हीवर लागला तरी सगळेच तो बघतात. सिनेमातील गाणी आणि प्रत्येक संवाद सगळ्यांना अगदी तोंडपाठ आहे. मात्र तरीही हा सिनेमा पुनःपुन्हा पाहण्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही. आजही या सिनेमातील कलाकरांना अनेकदा या चित्रपटाबद्दल आणि त्यांच्या शूटिंगच्या आठवणींबद्दल विचारले जाते. सिनेमाचा चार्म आजही कायम आहे. याच सिनेमातील एक गाणे म्हणजे ‘गं कुणीतरी येणार येणार गं’ याबद्दल तर काय बोलावे.

स्त्री वेशातील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या डोहाळे जेवणाच्या वेळेस असलेले हे गाणे आजही लोकप्रिय आहे. तर यात सुप्रिया, निवेदिता सराफ आणि स्त्री वेशात सचिन यांनी केलेला डान्स तर विसरता न येण्यासारखा आहे. प्रेक्षकांकडून तर अनेकदा या सिनेमातील कलाकारांना सिनेमातील डान्स किंवा संवाद म्हणण्यासाठी विनंती केली जाते.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात सचिन, सुप्रिया, अश्विनी भावे आणि निवेदिता हे तिघं एकाच मंचावर असून ते चक्क ‘गं कुणीतरी येणार येणार गं’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असताना नेटकरी देखील त्यावर भरभरून कमेंट्स करताना दिसत आहे.

दरम्यान नुकताच अमेरिकेत संपन्न झालेल्या ‘नाफा’ फिल्म फेस्टिव्हलला सचिन, सुप्रिया, निवेदिता सराफ, अश्विनी भावे आदी ‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील कलाकारांनी उपस्थित लावली होती. हे सर्व कलाकार या स्टेजवर एकत्र आल्यानंतर साहजिकच बनवाबनवीचा विषय निघणार नाही, असे होईल का? या चौघांनी मिळून स्टेजवर सिनेमातील डोहाळे जेवणाच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला.

हा डान्स सुरु झाला आणि प्रेक्षकांमध्ये तर एकच जल्लोष झाला. शिट्ट्या, टाळ्या आदींच्या आवाजाने तर सभागृह दणाणून गेले होते. सचिन यांनी स्त्री लहेजा अगदी हुबेहूब साकारत हा डान्स केल्याने सोशल मीडियावर त्यांचे विशेष कौतुक होत आहे. मराठी सेलिब्रिटी कट्टा या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, सिद्धार्थ रे, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ, अश्विनी भावे आणि सुप्रिया, सुधीर जोशी, नयनतारा, विजू खोटे आदी दिग्गज मंडळींनी या सिनेमात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. आजही हा सिनेमा सगळ्यांसाठीच अजरामर कलाकृती आहे. सिनेमातील प्रत्येक कलाकाराचा अभिनय आणि विनोदाचे टायमिंग भाव खाऊन जाते.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...