Home आरोग्य Sweating Hands : सतत तळव्यांना घाम का येतो?
आरोग्यलाईफ स्टाईल

Sweating Hands : सतत तळव्यांना घाम का येतो?

9
Sweating Hands

उन्हाळा म्हटले की सर्वात जास्त त्रासदायक ठरतो तो घाम, उन्हामध्ये जा नका जाऊ घाम सतत येत असतो. या घामामुळे अंग तर चिकट होते, शिवाय अंगाचा, कपड्यांचा वास येतो, कपड्याने पांढरे घामाचे डाग पडतात. किती फॅन खाली बसले थंड खाल्ले तरी या घामापासून काही मुक्ती मिळत नाही. एसीमध्ये तेवढ्यापुरता रिलीफ मिळतो, मात्र नंतर पुन्हा जास्त वेगाने घाम येतो. आपण जर नीट लक्ष दिले तर आपल्या लक्षात येईल की घाम संपूर्ण अंगाला कधीच जास्त येते नाही, अपवाद वगळता. बहुतकरून घाम हा विशिष्ट ठिकाणीच जास्त येतो. (Sweating Hands)

कपाळावर, नाकावर, काखेत, पाठीवर आदी ठिकाणी जास्त घाम येतो. असे असले तरी काहींना इतरही ठिकाणी घाम येऊ शकतो. मात्र अनेकांना तळहाताला सतत घाम येत असतो. कधीही बघा तर त्यांचा तळहात ओलसरच असतो. यामुळे अशा लोकांना अनेकदा विविध समस्यांना सामोरे देखील जावे लागते. त्यांच्या हातची ग्रीप नीट बसत नाही. हातात कोणत्या वस्तू असल्या तर त्या ओल्या होतात. (Summer Health)

जर तुमच्या हाताच्या तळव्यांना कायम घाम येत असेल आणि तुम्हाला याचे कोणतेही कारण समजत नसेल तर ते हायपरहायड्रोसिसचे लक्षण असू शकते. तुम्हाला कोणत्याही ऋतूमध्ये किंवा कोणतीही शारीरिक हालचाल न करताही घाम येत असेल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. हायपरहायड्रोसिसची बहुतेक प्रकरणे तळवे, तळवे आणि अंडरआर्म्सशी संबंधित आहेत. ही एक क्रोनिक कंडीशन आहे. हायपरहायड्रोसिस हा आजार शारीरिक कमतरतेमुळे होतो. तुमच्या शरीरात जर एखाद्या गोष्टीची कमतरता असेल तर अशा वेळी हा आजार होऊ शकतो. (Marathi Top News)

Sweating Hands

हातांना जास्त घाम येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अतिक्रियाशील नसा. व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे सतत घाम येण्याची समस्या असू शकते. या आजारात घाम स्राव करणाऱ्या ग्रंथी खूप सक्रिय असतात, आणि हाताला घाम येऊ लागतो. हा आजार जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आणि मज्जातंतूंच्या कार्यामुळे होऊ शकतो. (Top Marathi News)

हायपरहाइड्रोसिस हा आजार अति धूम्रपान, तणाव, गर्भधारणा किंवा रजोनिवृत्तीमुळे आदी कारणांमुळे देखील होऊ शकतो. याशिवाय मधुमेह, रजोनिवृत्ती, थायरॉईड, कर्करोग आणि लठ्ठपणा यासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना देखील जास्त घाम येण्याची समस्या असू शकते. मात्र यावर उपाय काय? आज आम्ही याच समस्येवर काही घरगुती उपाय घेऊन आलो होते, ज्याचा वापर करून नक्कीच तुम्हाला आराम मिळू शकतो. (Top Stories)

तुरटीचा वापर
हातांच्या तळव्यांना येणाऱ्या घामापासून सुटका करण्यासाठी एक चमचा तुरटी पावडर दोन ग्लास साध्या पाण्यात टाका आणि त्या पाण्याने दिवसातून दोन वेळा हात धुवा. असे केल्यास हातांच्या तळव्यांवर घाम येणं कमी होईल.

टी – बॅग
एका वाटीत 4-5 टीबॅग ठेवा. आणि त्या पाण्यात हात घाला. तुम्हाला काही काळासाठी आराम मिळेल.

अँटीपर्स्पिरंट्स
घाम कमी करण्यासाठी अँटीपर्सपिरंट्स उत्तम उपाय आहे. यामुळे घाम येणे नियंत्रित करण्यास आणि त्वचा कोरडी ठेवण्यास मदत होते. अँटीपर्सपिरंट्समध्ये अॅल्युमिनियम सॉल्ट्स असतात जे छिद्रांना तात्पुरते अवरोधित करतात, घाम त्वचेच्या पृष्ठभागावर पोहोचण्यापासून रोखतात. (Lifestyle)

कच्चा बटाटा
तळहातांवर खूप जास्त घाम येत असेल तर कच्च्या बटाट्याचा वापर फायदेशीर ठरू शकतो. यासाठी कच्च्या बटाट्याच्या चकत्या कापून काही वेळ हातावर चोळा. यासाठी बटाटा मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा पल्पही हातावर चोळता येऊ शकतो. बटाटा लावल्यानंतर काही वेळ हात न धुता स्वच्छ आणि वाळलेल्या कपड्याने पुसून घ्या. काही दिवस सतत हा उपाय केल्यास घाम येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. (Social News)

Sweating Hands

बेकिंग सोडा
हातांच्या तळव्यावर येणाऱ्या घामापासून सुटका करण्यासाठी बेकिंग सोडा देखील लाभदायक उपाय आहे. एक चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात काही थेंब पाणी टाकून त्याची घट्ट पेस्ट करायची, आणि ही पेस्ट दोन्ही हातांच्या तळव्यांवर लावा. ही पेस्ट १० मिनीटे राहू द्या, त्यानंतर दोन्ही हात एकमेकांवर चोळून हात स्वच्छ करा आणि पाण्याने हात धुवून घ्या. (Marathi)

========

हे देखील वाचा : Sugarcane Juice : उन्हाळ्यात वरदान असलेल्या उसाच्या रसाचे फायदे

========

टाल्कम पावडर
टाल्कम पावडर वापरून या समस्येपासून मुक्त होऊ शकता. दोन्ही हातांवर टॅलकम पावडर टाका आणि हात एकमेकांना नीट चोळून घ्या. त्यानंतर काही वेळ पावडर तशीच राहू द्या.

अल्कोहलचा वापर
तळहातांना खूप जास्त घाम येत असेल तर कॉटन बॉल्स अल्कोहोलमध्ये बुडवून त्याने दोन्ही हातांचे तळवे नीट स्वच्छ करा. त्यानंतर दोन्ही हात एकमेकांना चोळून अल्कोहोल वाळू द्या. काम असेल तेव्हा हात पाण्याने धुवून घ्या.

(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...