१९४० चं दशक, भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. त्या काळात मुलींना घराबाहेर पडणं, शिक्षण घेणं, किंवा मोठं काहीतरी करणं याला खूप मर्यादा होत्या. मुलींनी फक्त चूल आणि मूल सांभाळावं, अशा विचारांचा तो काळ होता. पण अशा काळात एक मुलगी उभी राहिली, आणि तिने असं काही करून दाखवलं की आज संपूर्ण देश त्यांना ‘वेदर वुमन ऑफ इंडिया’! म्हणून ओळखतो. त्यांचं नाव अण्णा मनी आणि त्यांच्याबद्दलच जाणून घेऊ. (Anna Mani)
केरळमधल्या तिरुअनंतपुरम इथं २३ ऑगस्ट १९१८ ला अण्णा मणी यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबात आठ भावंडं होती. त्यांचे वडील सिव्हिल इंजिनीअर होते,आणि घरची परिस्थिती चांगली होती, वेलचीचे मळे त्यांच्याकडे होते. आता त्या काळात भारतात फक्त १% मुली साक्षर होत्या, आणि त्यातल्या एक अण्णा होत्या. त्यांच्यात वाचनाची अशी भूक होती की वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी त्यांनी गावच्या लायब्ररीतली मल्याळम भाषेतली जवळपास सगळी पुस्तकं वाचून काढली. (Top Stories)
त्यांच्या आठव्या वाढदिवसाला त्यांच्या वडिलांनी त्यांना हिऱ्याचे झुमके गिफ्ट म्हणून त्यांना दिले, पण अण्णा यांनी ते घ्यायला साफ नकार दिला. त्यांनी झुमके न घेता वाडिलांकडून विश्वकोश मागितला होता. म्हणजे बघा, त्या वयातच त्यांचं डोकं कुठे चाललं होतं!
डिग्री घेऊन त्या १९४० साली बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पोहोचल्या.तिथे त्यांना physics विषयात research करण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली. इथे त्या थेट नोबेल प्राइज विजेते सी.वी. रमण यांच्यासोबत काम करू लागल्या. १९४० च्या दशकात अण्णा मणी यांना लंडनला physics शिकण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली. पण तिथे पोहचल्यावर कळलं, की तिथे फक्त हवामानशास्त्रात इंटर्नशिप आहे. आता इथे डेस्टिनीने खेळ केला. ज्या विषयात त्यांना जायचं नव्हतं, त्याच क्षेत्रात त्यांना जावं लागलं, पण त्यांनी तिथेही इतिहास घडवला. १९४८ मध्ये त्या भारतात परतल्या आणि भारतीय हवामान विभागात कामाला लागल्या. (Anna Mani)
=================
हे देखील वाचा : Charlie Chaplin : आणि चार्ली चॅपलिनची डेड बॉडीच किडनॅप झाली !
=================
परतल्यावर अण्णा यांनी ठरवलं, आपण परदेशी यंत्रांवर अवलंबून कशाला राहायचं? आपण स्वतःची weather instruments बनवू! त्या काळात आपण सगळं परदेशातून आयात करायचो. पण अण्णा यांच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्याचं नेतृत्वाखाली १०० हून जास्त weather instruments बनवले गेले. ज्यात पाऊस, तापमान, हवेचा दाब, सगळं मोजणारे instruments होते. पण त्यांचं खरं कमाल काम होतं ओझोनच्या संशोधनात. त्यांनी ‘ओझोनसॉन्ड’ नावाचं एक जबरदस्त यंत्र बनवलं, जे हवेत बलूनवरून ३५ किलोमीटर वरपर्यंत ओझोन मोजतं. त्यांच्या या यंत्रामुळे १९८० च्या दशकात भारतीय शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिकाला जाऊन ओझोनच्या थरातली पोकळी शोधून काढली, ही गोष्ट नंतर १९८५मध्ये जोसेफ फार्मन यांच्या ओझोन पोकळीच्या शोधाशी जुळली ! अण्णा यांनी eco friendly टेक्नॉलजीचा पाया रचला, जेव्हा त्याची फारशी चर्चा नव्हती आणि कुणाला त्याची फारशी पर्वा नव्हती. १९८०-९० च्या दशकात त्यांनी १५० ठिकाणी वारा मोजण्याचे स्टेशन उभारले, ज्यामुळे भारतात वीज निर्मितीसाठी विंड फार्म्स उभे राहिले.(Top Stories)
आशा या महान Scientiest ने कधीच लग्न केलं नाही त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विज्ञानाला वाहिलं. त्यांनी पारंपरिक बुरसटलेल्या विचारांना बाजूला सारून स्वतःचं करिअर निवडलं. त्या म्हणायच्या “माझ्या निर्णयांवर माझं स्त्री असणं कधीच आड आलं नाही.”. २००१ साली, वयाच्या ८३व्या वर्षी, स्ट्रोकमुळे त्यांचं निधन झालं. पण त्यांचं हवामानशास्त्रातलं काम आजही सगळ्यांना प्रेरणा देतंय!
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- Anna Mani
- climate advocacy
- climate change heroes
- climate innovators
- climate visionaries
- eco warriors
- Eco-friendly Technology
- environmental heroes
- female innovators
- Female Pioneers in Science
- green technology
- indian meteorology
- meteorology leaders
- ozone advocacy
- Ozone Sonde
- Science Heroes
- science innovators
- science trailblazers
- STEM Inspiration
- stem leaders
- stem pioneers
- stem trailblazers
- weather pioneers
- Women in STEM
- women innovators