Home मनोरंजन गुलिगत सुरजने जिंकली सर्वांची मने
मनोरंजन

गुलिगत सुरजने जिंकली सर्वांची मने

10
Suraj Chavan

बिग बॉस मराठीची दणक्यात सुरुवात झाली. बिग बॉसचा हा सिझन खऱ्या अर्थी खूपच खास आहे. कारण या पर्वाचे अनेक वैशिष्ट्य आहेत. रितेश देशमुख पहिल्यांदाच बिग बॉसचे सूत्रसंचालन करत आहे. शिवाय या सीझनमध्ये कलाकारांसोबतच अनेक सोशल मीडिया स्टार देखील शोमध्ये दिसत आहे. त्यामुळे बिग बॉस फॅन नसलेले अनेक लोकं देखील बिग बॉसचे हे पर्व पाहत आहे. या शोमध्ये होणारे वाद, भांडणं, संवाद हे सर्वच प्रेक्षकांना चांगलेच आकर्षित करत आहे.

सुरुवातीला अनेकांना काहीसा रटाळ वाटणारा हा सिझन आता खऱ्या अर्थाने रंगात येऊ लागला आहे. सोशल मीडिया स्टार असलेला सुरज चव्हाण देखील स्पर्धक म्हणून घरात आला तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. त्याचा खेळ पहिल्यांनंतर तर त्याला अनेकांनी ‘याला खेळ समजत नाही’ असे म्हणत ट्रोल केले. घरातील सदस्यांनी देखील त्याला नॉमिनेट केले होते. प्रेक्षकांनी त्याला भरभरून मतं देत सुरक्षित ठेवले. मात्र सुरजने सुरुवातीला फक्त निरीक्षण केले आणि मग आपला खेळ खेळण्यास सुरुवात केली. त्याचा खेळ पाहून नेटकरी काय तर खुद्द रितेश देशमुखने देखील सुरजचे ‘भाऊच्या धक्क्या’वर कौतुक केले आणि त्याला अधिक चांगला खेळ खेळण्यास प्रोत्साहित केले.

सुरजला खेळ समजल्यानंतर त्याने घरातील अनेक गोष्टींवर मत मांडण्यास सुरुवात केली. भांडणांमध्ये स्वतःचे विचार देखील व्यक्त केले. अशातच आता ‘बिग बॉस’चा एक नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये कॅप्टन अंकिता वालावलकरने स्पर्धकांना दिलेल्या त्यांच्या कामानुसार सर्व काम करत आहे. यात तिने सुरजला घराच्या बाहेरच्या आवारातील केर काढण्याचे काम दिले. तो केर काढत असताना तिथे असलेले अंकिता आणि पॅडी सुरजबद्दल बोलताना दिसत आहे. अंकिता पॅडीला म्हणतेय,”सुरजला असे बघून मला कसंतरी वाटत आहे”. त्यावर पॅडी म्हणतो, ”बिचारा बाहेर देखील हेच काम करत असेल. तो काल मला म्हणत होता, दादा मला खूप वाईट वाटतं मी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता”. त्यावर अंकिता म्हणते,”सुरजला गेम कळला नाही, पण माणसं कळली”.

कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अगणित कमेंट्स आल्या आहेत. यात अनेक कलाकारांनी देखील कमेंट्स केल्या आहेत. बिग बॉस मराठीच्या मागील पर्वाचा स्पर्धक असलेल्या उत्कर्ष शिंदेनेही सुरजसाठी कमेंट करताना लिहिले, “ही ड्यूटी नकों ती ड्यूटी नकों कधी बोलला❌ शिक्षण नसुनही कधी भाषेत माज्ज दुसऱ्यांचा अपमान दिसला?❌ कोणा बद्दल वाईट गॉसिप करताना दिसला? ❌ कोणत्या मुलीचा अपमान केला?❌ गेम मधे टिकण्या साठी खोटं प्रेमाच नाटक , रडण रुस्ण फुग्ण असल काही एक केल का ❌ एकटा राहतो एकटा खेळतो एकटा भिडतो एकटा नडतो आणि एकटाच पुढे पण असणार, दिसणार.”

एखाद्या छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या सुरजने रील व्हिडीओ बनवत नेटकऱ्यांची मने जिंकली.आता ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेला सुरज त्याच्या खेळाने प्रेक्षकांना किती थक्क करतो हे बघणे महत्वाचे असेल.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...