Home मनोरंजन …म्हणून अंकिता सुशांत सिंह राजपूतला शेवटचे पहायला गेली नाही
मनोरंजन

…म्हणून अंकिता सुशांत सिंह राजपूतला शेवटचे पहायला गेली नाही

8
Ankita on Sushant Rajput
Ankita on Sushant Rajput

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांना एकेकाळी टेलिव्हिजनवर मोस्ट पॉप्युलर कपल मानले जायचे. ऑनस्क्रिन असो किंवा ऑफस्क्रिन, या दोघांच्या केमिस्ट्रीची खुप तारीफ केली जायची. मात्र दोघांनी सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोघे आपल्या आपल्या आयुष्यात पुढे जात गेले आणि याच्या काही वर्षानंतर सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. सुशांत सिंह सध्या या जगात नाही. दुसऱ्या बाजूला अंकिता आपल्या नवऱ्यासोबत बिग बॉसच्या घरात आहे. बीबी हाउसमध्ये अंकिताने खुप वेळा सुशांत सिंह राजपूतची आठवण काढल्याचे दिसून आले. (Ankita on Sushant Rajput)

सुशांत सोबत ब्रेकअप, त्याच्यासोबत घालवलेले क्षण याबद्दल खुप वेळा अंकिता बोलली. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये सुद्धा ती मुनव्वर सोबत खुप वेळ सुशांत सिंह बद्दल बोलत होती. त्याचवेळी तिने सुशांतच्या अंत्यसंस्काराला का गेली नाही याबद्दलचे कारण ही सांगितले.

बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडेने पुन्हा एकदा सुशांतचे नाव घेतले. तिने असे म्हटले की, मुनव्वरचे मोडलेले लग्न पाहता तिला जुन्या आठवणी उफाळून येतात. त्यासोबत अंकिताने सुशांतचा सिनेमा एमएस धोनीमधील गाणे सुद्धा गायले. अंकिताने सुशांत बद्दल असे म्हणते की, तो एक उत्तम व्यक्ती होता, मी असे बोलतेय पण विचित्र वाटतेय. आता मी नॉर्मल झाली आहे. पण तो आता या जगात नाही ही सर्वाधिक वाईट फिलिंग आहे.

का नव्हती गेली अंकिता?
मुनव्वर सोबत पुढे बोलताना अंकिताने म्हटले की, मला हे बोलयाचे नाही. मला हे सांगायचे सुद्धा नाही. मी तर त्याचा अंत्यसंस्काराला सुद्धा गेली नव्हती. मला जाताच येत नव्हते. मला वाटले मी त्याला असे पाहूच शकत नाही. विक्की बोलला होता, तू जा. मी तरीही नाही गेली, मी ते कसे पाहू. (Ankita on Sushant Rajput)

अंकिताने आपल्या वडिलांची सुद्धा आठवण काढली
अंकिताने हे सुद्धा म्हटले की, एखाद्याचे आयुष्यातून निघून जाणे काय असते हे पहिल्यांदाच अनुभवले नव्हते. मी पहिल्यांदाच वडिलांना असे पाहिले होते. वडिलांना सतत बिग बॉस बद्दल सांगायची. या सर्व गोष्टी हिट करतात.


हेही वाचा- 38 वर्षीय ‘या’ अभिनेत्रीच्या नवऱ्याकडे आहे 100 कोटींची संपत्ती

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...