Home प्रेस रिलीझ माझी मेहनत १०० पटीने जास्त असणार आहे – अभिज्ञा भावे
प्रेस रिलीझ

माझी मेहनत १०० पटीने जास्त असणार आहे – अभिज्ञा भावे

7
अभिज्ञा भावे

झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या आगामी मालिकेची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु आहे. या मालिकेची पहिली झलक पाहिल्यापासूनच प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हि मालिका २० मार्च पासून रात्री ८ वाजता प्रसारित होणार असून स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर हि जोडी पहिल्यांदाच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांचा अजून एक आवडता चेहरा एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावे हि टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून अभिज्ञाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तू तेव्हा तशी या मालिकेतून देखील अभिज्ञा छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


तू तेव्हा तशी या मालिकेचा प्रोमो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत अभिज्ञा म्हणाली, “सो ऑफिशिअली मी तुम्हाला पुन्हा भेटायला येते आहे एका अशा भूमिकेत जी मला याआधी करायला मिळाली नाही.. मी आशा करते कि प्रेक्षकांकडून मला भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळेल, कारण माझी मेहनत १०० पटीने जास्त असणार आहे.”

====

हे देखील वाचा: अदितीचा हा नवा अवतार देशमुखांच्या घरात घेऊन येणार नवं वादळ

====


अभिज्ञा कुठली व्यक्तिरेखा निभावणार हि माहिती अजून तरी गुलदस्त्यातच आहे पण तिची भूमिका प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकेल यात शंकाच नाही.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...