Home गाजावाजा स्पेशल मुलाला अधिक राग येतो? जाणून घ्या कारणं आणि उपाय
गाजावाजा स्पेशल

मुलाला अधिक राग येतो? जाणून घ्या कारणं आणि उपाय

10
Angry child
Angry child

प्रत्येकाला कोणात्या ना कोणत्या कारणास्तव राग येतो. अशात ती लहान मुलं असो किंवा वृद्ध माणसं. प्रत्येकाची वागण्याची-बोलण्याची पद्धत ही वेगळी असतो. पण लहान मुलांबद्दल बोलायचे झाल्यास ते अगदी हट्टीच आणि मस्तीखोर असतात. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण केल्यास त्यांना राग येतोच पण तो जोरजोरात रडू लागतात. या व्यतिरिक्त मुलांना राग येण्यामागे काही कारणं असू शकतात. तर जाणून घेऊयात मुलांना राग येण्यामागील नक्की काय कारणं असू शकतात आणि त्यांच्या रागाला कशा पद्धतीने नियंत्रणात ठेवले पाहिजे.(Angry child)

काही मर्यादा तयार करा
लहान मुलांना नेहमीच समजावून सांगा की आपल्या रागावर कशा पद्धतीने नियंत्रण ठेवले पाहिजे. तसेच असे न करण्याचे सुद्धा त्याला वेळोवेळी सांगत रहा. त्यासाठी काही मर्यादा निर्माण करा. जेणेकरुन मुलाने चुकीचे वर्तन केल्यास त्याला त्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन वागत असल्याचे दाखवून द्या. लक्षात असू द्या लहान मुलांना मारझोड करण्यापासून पालकांनी दूरच राहिलेले बरे.

रागावर नियंत्रण मिळवण्यास शिकवा
आपल्या मुलांना त्याच्या भावना व्यक्त करण्याचा योग्य मार्ग शिकवा. त्याच्याशी भांडण करण्याऐवजी एखाद्याशी कसे बोलावे हे सांगा. तसेच त्याला अधिक राग येत असेल तर त्याला शांत ठेवण्यासाठी आपण काय करु शकतो याचा सुद्धा पालकांनी विचार केला पाहिजे. जेव्हा तुमचे मुलं त्याच्या रागावर नियंत्रण मिळवून एखाद्याशी चांगले वर्तन करु लागेल तेव्हा त्याचे कौतुक करण्यास विसरु नका.

हे देखील वाचा- लहान मुलांमधील ‘या’ लक्षणांना करु नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी

Angry child
Angry child

-सेल्फ कंट्रोल करण्यास शिकवा
लहान मुलांना राग आल्यावर स्वत:ला कशा पद्धतीने शांत करायचे हे कळत नाही. अशातच त्यांना सेल्फ कंट्रोल कसे करायचे हे शिकवा. यामुळे मुलांना राग शांत होण्यास मदत होईल. त्याचसोबत एखाद्या गोष्टीबद्दल विचार करण्याबद्दल ही पालकांनी त्याला शिकवले पाहिजे.(Angry child)

-पालकांनी ठेवा स्वत:च्या रागावर नियंत्रण
घरातील मुलं ही वडिलधाऱ्या माणासांच्या काही गोष्टी पाहूनच शिकतात. त्यामुळे जर तुम्ही लहान-लहान गोष्टींवरुन भांडत असाल तर तुमचे मुलं सुद्धा तेच शिकेल जसे तुम्ही वागता.अशातच तुम्हाला सुद्धा अधिक राग येत असेल तर तो नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही असे वागत असाल तर मुलं सुद्धा त्याच पद्धतीने एखाद्याशी वागेल.

-मुलांसोबत कठोर पद्धतीने बोलणे टाळा
प्रत्येक मुलं चुकतं, त्यामुळे त्याच्याशी नेहमीच कठोर शब्दात बोलणे अगदी चुकीचे आहे. त्याला त्याची चूक पटवून देण्यासाठी समजावून सांगणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. कारण तुम्ही वेळोवेळी त्याच्यासोबत कठोर शब्दात बोलत राहिलात तर तो दुखावला तर जाईलच पण त्याच्या मनात तुमच्या बद्दलची एक वाईट प्रतीमा तयार होईल.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....