Home गाजावाजा स्पेशल गायक जंगकूक चक्क लाईव्ह कार्यक्रमात झोपला…
गाजावाजा स्पेशल

गायक जंगकूक चक्क लाईव्ह कार्यक्रमात झोपला…

8
Jungkook
And singer Jungkook pretty much fell asleep during the live show marathi info

कोरियन बँड बीटीएसचा फॅन फालोअर किती आहे, हे नेमकं सांगता येणार नाही. कारण हा ब्रॅंड जगभरात करोडो नागरिकांच्या गळ्यातला ताईत झाला आहे. त्यातील जंगकूक या गायकाचाही सोशल मिडियावर अक्षरक्षः करोडमध्ये चाहता वर्ग आहे. अतिशय देखणा असलेला जंगकूक जेव्हा गातो तेव्हा त्याच्यासोबत हे त्याचे करोडो चाहतेही गाऊ लागतात. जंगकूकचे हे चाहते, त्याच्यासाठी एवढे क्रेझी आहेत की, हा जंगकूक (Jungkook) झोपला असतांनाही त्याला लाईव्ह बघत होते. आपल्या चाहत्यांसोबत एक लाईव्ह करतांना जंगकूक चक्क झोपला. अगदी काही सेकंदाची डुलकी त्यानं घेतली नाही तर तो चक्क 21 मिनिटे गाढ झोपला. या सर्वादरम्यान त्याचा एकही चाहतावर्ग लाईव्ह सोडून गेला नाही, तर ही संख्या वाढली. तब्बल 21 मिनिटांनी जेव्हा या महशयांना जाग आली तेव्हा त्यानं पुन्हा आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधायला सुरुवात केली. जंगकूकचे (Jungkook) हे झोपेतले लाईव्ह सध्या चर्चेत आहे. या लाईव्हच्या व्हिडिओला सर्वाधिक लाईक मिळत आहेत, हे ही आणखी एक विशेष.  

कोरियन बँड बीटीएसची जगभरात सध्या सगळ्यात प्रसिद्ध असा बॅंण्ड आहे. या बॅंडमधील सातही बीटीएस सदस्यांची फॅन फॉलोइंग अन्य कुठल्याही गायकांपेक्षा अधिक आहे. यातील जंगकूक हा गायक त्यात सर्वाधिक लोकप्रिय आहे. कारण त्याच्या चाहत्यांची संख्या काही दशलक्ष आहे. या चाहत्यांचे जंगकूकवर (Jungkook) किती प्रेम आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर त्याच्या 21 मिनिटांचा गाण्याचा नाही तर झोपेचा व्हिडीओ नक्कीच बघायला हवा. जगभरातील 6 दशलक्ष चाहत्यांनी हा जंगकूकचा 21 मिनिटांचा व्हिडीओ लाईव्ह बघितला आहे.  

जगातील म्युझिक ब्रँडमध्ये बीटीएस हे नाव माहित नाही, असा क्वचित एखादा व्यक्ती असेल. या बिटीएस मधिल जंगकूकने (Jungkook) त्याच्या चाहत्यांबरोबर एक लाईव्ह केले. जंगकूक लाईव्ह करणार ही बातमी मोठी होती, त्यामुळे लाखो चाहते या लाईव्हमध्ये सामिल झाले होते.  यादरम्यान जंगकूकने (Jungkook) त्याच्या चाहत्यांना सांगितले, ‘मी असा झोपलो तर माझी कंपनी वेडी होईल, पण माझा नाईलाज आहे, असे म्हणताच जंगकूक लगेच झोपल्यासारखा दिसू लागला. सुरुवातीला जंगकूक काही नाटक करीत आहे, असे त्याच्या चाहत्यांना वाटले. पण काही मिनिटात जंगकूक झोपला आहे, याची जाणीव त्याच्या चाहत्यांना झाली. हा जंगकूक काही मिनिटे झोपला नाही तर तो 21 मिनिटे झोपला.  जंगकूक (Jungkook) झोपी गेल्यानंतर, लाइव्ह सुमारे 21 मिनिटे चालले आणि 6 दशलक्ष चाहत्यांनी त्याला झोपतांना पाहिले. जंगकूकचा हा झोपलेला असतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होत आहे. अगदी, त्याचा नवा ट्रेंडच सुरु झाला आहे.  

यावर जंगकूकच्या (Jungkook) चाहत्यांनी प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. जंगकूक आश्चर्यकारक आहे, म्हणून आम्ही 6.6 दशलक्ष चाहते, त्याला बघत होतो.  त्याचा एक चाहता लिहतोय, माझ्यासाठी सर्वकाही जंगकूक आहे., तो माझा आनंद आहे. त्याच्यासाठी काहीही करण्याची माझी तयारी असल्याचेही अनेक चाहत्यांनी म्हटले आहे.  

जंगकूक (Jungkook) आणि त्याचा बीटीएस बॅंड हा कोरियन गाण्याचा बॅंड आहे. या सर्वांनी बीटीएसची स्थापना 2010 मध्ये केली. त्यांचा पहिला अल्बम ‘2 कूल 4 स्कूल’ 2013 मध्ये रिलीज झाला. त्याला तुफान प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर बीटीएसच्या लोकप्रियतेची लाटच आली. या ग्रुपनं अनेक अल्बम लॉन्च केले आणि त्याला त्याच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतले. बीटीएसने ‘रन बीटीएस’, ‘फायर’, ‘बटर’, ‘फेक लव्ह’ आणि ‘बॉय विथ लव’ सारखे हिट अल्बम तयार केले आहेत. सध्या हा ग्रुप विखरल्यासारख्या झाला आहे. पण त्याची लोकप्रियता अगदी एका अशानेही कमी झालेली नाही. बीटीएसचे जिन आणि जे होप हे दक्षिण कोरियाच्या सशस्त्र दलात आवश्यक अशा लष्करी सेवेत आहेत. असेच अन्य सदस्यही दुस-या मोहिमेवर व्यस्त आहेत.  

========

हे देखील वाचा : १९ वर्षाची मुलगी बनली इटलीची नवी राणी 

=======

त्यामुळेच आपल्या चाहत्यांना एकदा समोरासमोर भेटण्यासाठी जंगकूकनं (Jungkook) लाईव्ह केलं असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यात चाहत्यांबरोबर संवाद साधताना हा प्रसिद्ध गायक गाढ झोपला. जंगकूक हा 26 वर्षाचा तरुण गायक आहे. या दक्षिण कोरियन गायकाचा चाहता वर्ग आता जगभरात आहे. अगदी फिफासाठीही त्यानं गाणं गायलं असून त्याच्या फिफामधील गाण्यानं अन्य जाहीर कार्यक्रमाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. जंगकूकने चीनमधील सेलिब्रिटींच्या हाय चायना मासिकाच्या यादीत सलग 10 आठवडे पहिले स्थान पटकावले आहे.  

सई बने

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....