Home गाजावाजा घरच्या घरी बनवा आवळ्याचा फेस टोनर, त्वचेला येईल ग्लो
गाजावाजा

घरच्या घरी बनवा आवळ्याचा फेस टोनर, त्वचेला येईल ग्लो

9
Amla Benefits

Amla Tonner : प्रत्येक महिलेला आपली त्वचा ग्लोइंग आणि हेल्दी रहावी असा वाटते. पण बदलत्या हवामान आणि वातावरणामुळे, धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचा डॅमेज होते. महागड्या स्किन प्रॉडक्ट्सचा वापर करून सुद्धा चेहेरा डल वाटू लागतो.याशिवाय बऱ्याच महिला कोणत्याही केमिकल्स प्रॉडक्टचा वापर न करता नॅच्युरल ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय करतात.यामध्ये आवळ्याचा समावेश देखील आहे.

आवळ्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, मॅग्नॅशियम, अँटी-ऑक्सिडेंट्स, विटामिन सी, ए आणि बी आढळतात. ही पोषण तत्त्वे आरोग्यासोबत त्वचा आणि केसांसाठी पण फायदेशीर आहेत. बबहुतांशजण त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी सकाळी आवळ्याचा ज्यूस पितात. याशिवाय आवळ्यापासून स्किन टोनर देखील तयार करू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

आवळ्याचा टोनर

आवळ्याचा टोनर तयार करण्यासाठी आधी आवळ्याचं रस आणि गुलाब पाणी घ्या. हे बनवण्यासाठी आधी आवळ्याला स्वछ पाण्याने धुवून घ्या आणि कापडाने पुसून घ्या. आवळ्याचा रस मिक्सरमध्ये बारीक करून ते पाणी गाळून घ्या. आता गुलाबाचं पाणी आणि आवळ्याचं रस एकत्रित करुन 5 ते 10 मिनट फ्रिज मध्ये ठेवा. टोनर थंड झाल्यावर चेहऱ्यावर लावा. हे त्वचेवर लावल्यास थंडावा येतो आणि फ्रेश वाटते.(Amla Tonner)

=======================================================================================================

हेही वाचा : 

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा असा करा वापर

Waxing : फेशियल वॅक्स करताना कोणती काळजी घ्यावी

=======================================================================================================

आवळा आणि एलोवेरा

एलोवेरा देखील फायदेशीर आहे. आवळ्यासोबत एलोवेरा मिक्स करुन चेहऱ्याला लावू शकता. यासाठी आवळ्याचं रस काढून त्यामध्ये ताजा एलोवेरा गर मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावल्यास त्वचा हायड्रेट करण्यास मदत होते. याशिवाय त्वचेला ग्लो येण्यासह सुरकुत्या, डार्क स्पॉट्स कमी होतात. त्वचेला पोषण मिळते आणि पिंपल्सची समस्याही कमी होण्यास मदत होते.

Recent Posts

Related Articles

Johran Mamdani
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या...

Pak Vs Afghan
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Pak Vs Afghan : ग्रेटर अफगाणिस्तानच्या नकाशामुळे पाकिस्तानमध्ये पळापळ !

अफगाणिस्तान आणि पाकिस्तामधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता या तणावात आणखी भर...

Prince Andrew
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Prince Andrew : एक राजकुमार अखेर जमिनीवर आला !

ब्रिटीश राजे चार्ल्स तिसरे यांचे धाकटे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांना अखेर जमिनीवर...

America
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

America : या माणसाने ४३ वर्ष अमेरिकेच्या तुरुंगात घालवली !

सुब्रमण्यम वेदम, या भारतीय वंशी व्यक्तिची शोकांतिका सध्या सोशल मिडियावर सर्वाधिक चर्चेत...