Home मनोरंजन Amitabh Bachhan :अखेर अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ‘ती’ कॉलर ट्यून झाली बंद
मनोरंजन

Amitabh Bachhan :अखेर अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ‘ती’ कॉलर ट्यून झाली बंद

18
Amitabh Bachchan

मागील काही दिवसांपासून आपण कोणालाही मोबाइलवरून फोन लावला की, सर्वात आधी ऐकू येतो तो अमिताभ बच्चनचा आवाज. सुरुवातीला त्यांचे बोलणे आणि ते देत असलेला संदेश ऐकायला बर वाटत होतं. ते अतिशय महत्वाचा आणि मोलाचा सल्ला द्यायचे, त्यामुळे तर आपण अधिकच सावध झालो. मात्र ही कॉलर ट्यून दिवसेंदिवस त्रासदायक ठरू लागली. अर्जेंट कोणालाही फोन करायचा असेल तर आधी ही ४० सेकंदाची कॉलर ट्यून ऐकताना चीड चीड व्हायची. आधी महत्वाची वाटणारी ही कॉलर ट्यून नंतर डोकेदुखी ठरू लागली. त्यामुळेच की काय, या ट्यून विरोधात अनेकांनी तक्रार देखील केली. (Amitabh Bachhan)

महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर सुरक्षा जागरूकता कॉलर ट्यून मागील बऱ्याच काळापासून चर्चेत होती. प्रत्येक कॉलपूर्वी ४० सेकंदांची ही ट्यून सर्व सामान्यांना अलर्ट करणारी असली तरी नंतर नंतर ती सगळ्यांसाठीच त्रासदायक ठरत होती. त्यामुळेच लोकं ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी करत होते. सर्वसामान्यांच्या तक्रारींनंतर सरकारने आता एक मोठा निर्णय घेत या कॉलर ट्यूनवर बंदी घातली आहे. जनतेच्या भरपूर तक्रारी आणि आपत्कालीन परिस्थितीत फोन करण्यासाठी होणारा विलंब लक्षात घेऊन, दळणवळण मंत्रालयाने ही कॉलर ट्यून दिवसातून फक्त दोनदाच वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. (Marathi News)

Amitabh Bachchan

दरम्यान केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याच आठवड्यात एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते की, मी देखील या कॉलर ट्युनला वैतागलो आहे. मात्र अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्युनद्वारे लोकांना खोटे फोन्स, अनोळखी लिंक्स आणि OTP शेयर न करण्याचे आवाहन केले. सोबतच असे केल्यास त्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांची देखील माहिती दिली. सुरुवातीला केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या मोहिमेचे मोठे कौतुक केले गेले. मात्र नंतर हळूहळू ही कॉलर ट्यून लोकांची डोकेदुखी ठरली. काही लोकांनी तर या कॉलर ट्यून विरोधात RTI देखील दाखल केले होते. (Todays Marathi News)

आजच्या आधुनिक काळात कॉलर ट्यून हे जनजागृतीचे प्रभावी माध्यम आहे. भारतात कोट्यवधी लोकांकडे मोबाइल फोन्स आहेत. त्यामुळेच सरकारने कॉलर ट्युनच्या माध्यमातून लोकांना सायबर सुरक्षेबद्दल जागृत करण्यास सुरुवात केली. मात्र या कॉलर ट्युनला होणार विरोध बघता सरकारने ही ट्यून पूर्णपणे बंद न करता त्याची फ्रिक्वेन्सी कमी केली आहे. (Latest Marathi NEws)

=============

हे ही वाचा : Odisha : भगवान जगन्नाथांच्या ध्वजाचे रहस्य !

Ashadhi Wari : ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा निरा स्नान सोहळा संपन्न

============

याआधी देखील कोरोना काळात सरकारने अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून घ्यायच्या काळजीची एक कॉलर ट्यून तयार केली होती. ज्यात बच्चन यांनी मास्क घालण्यापासून ते सतत हात धुण्यापर्यंत सर्वच गोष्टींबद्दल सांगितले होते. मात्र या कॉलर ट्यून विरोधात देखील तक्रार केली होती. त्यानंतर ही कॉलर ट्यून बंद करण्यात आली होती.  अनेकांनी तर सध्याच्या सायबर सुरक्षाच्या बाबतीत जागरूक करणाऱ्या कॉलर ट्युनला बंद करण्यासाठी थेट अमिताभ बच्चन यांनाच सोशल मीडियावर मेसेज केले होते. त्यांनाच तक्रार करत लोकांनी ही कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी केली होती. (Social Updates)

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...