Home मनोरंजन करिनाला ‘कहो ना प्यार है’ मधून केले होते आउट, अमिषाचा खुलासा
मनोरंजन

करिनाला ‘कहो ना प्यार है’ मधून केले होते आउट, अमिषाचा खुलासा

8
amisha patel on kareena
amisha patel on kareena

स्टार किड्स आणि त्यांच्या डेब्यूची चर्चा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. जवळजवळ २३ वर्षांपूर्वी ऋतिक रोशनच्या डेब्यूला मीडियात फार हाइप मिळाली होती. राकेश रोशन हे आपला मुलगा ऋतिक याच्यासाठी डेब्यू सिनेमा ‘कहो ना प्यार है’ एक-एक गोष्टींवर लक्ष ठेवून होते. या सिनेमात ऋतिच्या डान्सने सर्वांवर भुरळ पाडली होती. लोकांनी अमीषा पटेल आणि ऋतिकच्या जोडीला फार पसंद केले होते. त्यावेळी अशी चर्चा होती की, सिनेमात करीना घेण्यात येणार होतो. (Amisha patel on kareena)

मात्र करिनाने आपल्या डेब्यू रेफ्युजीसाठी होकार दिला आणि ऋतिकने सुद्धा बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली होती. हा किस्सा ऐवढा जुना आहे की, लोक विसरली होती. मात्र गदरच्या सक्सेस मध्ये मजा घेत असलेल्या अमीषाने यावर एक विधान केले आहे. तिने असे म्हटले की, करिनाने सिनेमा सोडला नव्हता. तर तिला सोडायला लावला होता. यामध्ये सर्वाधिक खास गोष्ट अशी की, २०२० मध्ये राकेश रोशन यांनी अमीषाला सांगितले की, करिना नक्की का या सिनेमाचा हिस्सा होऊ शकली नाही.

अमीषाच्या म्हणण्यानुसार करिनाची आई बबीता सिनेमाच्या शुटिंगमध्ये खुप हस्तक्षेप करत होती. याच कारणास्त तिच्यात आणि राकेश रोशनमध्ये मतभेद झाले. अशाप्रकारे करिनाची या सिनेमातून एक्झिट झाली होती. तिच्या मते तीन दिवसांच्या आतमध्ये नव्या अभिनेत्रीचा शोध घेतला जात होता. पिंकी आंन्टी (रितीकची आई) हिने सांगितले की, राकेश रोशन यांनी तिला एका पार्टीत डान्स करताना पाहिले होते. त्यामुळे त्यांना वाटत होते की, सिनेमातील सोनिया ही मी आहे. मला पाहून त्यांना रात्रभर झोप लागली नव्हती. (Amisha patel on kareena)

हेही वाचा- 5 अफेअर, दोन लग्न तरीही आज एकटी आयुष्य जगतेय ‘ही’ अभिनेत्री

तर याबद्दलचे तथ्य केवळ अमीषालाच माहिती आणि ती आता हे का घेऊन बसली हे सुद्धा कळत नाहीयं. मात्र आपल्या विधानांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. गदर-२ च्या यशाननंतर जेव्हा तिसऱ्या सीक्वल बद्दल बोलले जात आहे तेव्हा सुद्धा तिने म्हटले होते की, सकीनाची भुमिका तेव्हाच करेन जेव्हा तिची भुमिका मोठी असेल. कारण प्रेक्षक तारा आणि सकीना यांना पाहू इच्छितात. अमीषा सातत्याने काही प्रकारे दावे आणि खुलासे करत आहे. ऐवढेच नव्हे तर गदग-२ चे दिग्दर्शक यांच्यासोबत ही तिचे फारसे पटत नाही. तिचे असे म्हणणे आहे की, त्यांनी सिनेमात केवळ आपल्या मुलाला प्रमोट केले आहे. त्यांना माझ्या ऐवजी ममता कुलकर्णी हिला घ्यायचे होते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...