अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून 20 जानेवारी 2025 रोजी डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेणार आहेत. मात्र त्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यालयात काय करणार याची चुणूक दाखवायला सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवतांना ट्रम्प यांनी अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्वाचा कायदा बदलणार असे आश्वासन दिले आहे. आता ट्रम्प यांनी आपले हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी पावले टाकायला सुरुवात केली आहे. ट्रम्पच्या या निर्णयावर अमेरिकेवर सर्वव्यापी परिणाम होणार आहे. अमेरिका हे जगातील सर्वात शक्तीमान राष्ट्र आहे. अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळणे हे अनेकांचे आयुष्यभराचे स्वप्न असते. (America)

सर्वसमृद्धवान असलेल्या अमेरिकेचे नागरिकत्व मिळणे म्हणजे, अनेक सुखांचे आणि समृद्धीचे द्वार उघडे झाल्यासारखे आहे. मात्र यासाठी अमेरिकेत राहणारे अन्य देशांचे नागरिक दहा-दहा वर्ष प्रतीक्षेत आहेत. पण जर याच नागरिकांचे मूल अमेरिकेत जन्माला आले तर त्याला जन्मसिद्ध अमेरिकेच्या नागरिकाचा दाखला मिळतो. यामुळे अनेक स्थलांतरित अमेरिकेत स्थाईक झाले आहेत. अमेरिकेत बेकायदेशीरपणे आलेल्या अनेक स्थलांतरितांच्या मुलांनाही अशाप्रकारे अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे. मात्र यासर्वांमुळे मुळ अमेरिकन नागरिकांवर नाहक बोजा येत असल्याची ओरड एकीकडे होत आहे. ट्रम्प यांनी त्याच मुळ अमेरिकेच्या नागरिकांना, तुमच्या टॅक्सचे पैसे तुमच्याच सुविधांवर खर्च होतील, बाहेरुन आलेल्या नागरिकांवर नाही, अशा शब्दात साद घातली. आता याच नागरिकांना दिलेले वचन ट्रम्प पूर्ण करत असून यामुळे लाखो कुटुंबापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (International News)
अमेरिकन नागरिकत्व मिळवणे हे लोकांचे स्वप्न आहे. अमेरिकन नागरिक असण्याचे अनेक फायदे आहेत. अमेरिकन नागरिकांना देशातून हद्दपार करता येत नाही. पण आगामी काळात अनेक नागरिक या नागरिकत्वाच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. त्यात भारतीय नागरिकांची संख्या अधिक आहे. अमेरिकेत जन्मलेली मुले अमेरिकन नागरिकत्वाचा दाखला मिळवतात. मात्र नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा कायदाच रद्द करण्याच्या तयारीत असल्यामुळे अमेरिकेत जन्मलेल्या लाखोंचे धाबे दणाणले आहे. त्यात भारतीयांसह अनेक आशीयायी नागरिकांचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील नागरिकत्वाच्या कायद्याला कायम मुर्खांचा कायदा अशा शब्दात खिल्ली उडवली आहे. त्यांनी यामुळे अमेरिकेत कोणीही उजळ माथ्यानं नागरिक ही पदवी प्राप्त करत असल्याचे सांगितले होते. अनेक पात्र नागरिक मात्र अमेरिकेपासून दूर गेल्याची टिका ट्रम्प कायम करीत आहेत. त्यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर या कायद्यात दुरुस्ती करण्याची तयारी त्यांनी सुरु केली आहे. (America)

अमेरिकेतील नागरिकत्वचा अधिकार अमेरिकन राज्यघटनेच्या 14 व्या दुरुस्तीद्वारे सुरक्षित आहे. या कायद्यातील तरतुदी माहित असल्यामुळेच अनेक स्थलांतरित अमेरिकेत येऊन मूल जन्माला घालत आहेत. त्याला ट्रम्प टूर टू अमेरिका म्हणतात. मग त्या मुलांना अमेरिकेचे नागरिकत्व आपसूकपणे मिळते, त्यापाठोपाठ त्यांच्या पालकांनाही अमेरिकेचे नागरिकत्व मिळते. यामुळे अनेक गुन्हेगारांनाही आपल्या देशानं सामावून घेतल्याचे ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये जाहीरपणे सांगितले आहे. अमेरिकेत जन्माने नागरिकत्वाचा कायदा आहे, त्याला जमिनीचा अधिकारही म्हणतात. म्हणजेच या भूमीवार ज्याचा जन्म झाला, तो अमेरिकेचा नागरिक झाला. हा कायदा 1868 मध्ये पारित झालेल्या 14 व्या दुरुस्तीद्वारे तयार करण्यात आला होता. या दुरुस्तीनुसार युनायटेड स्टेट्समध्ये जन्मलेल्या किंवा नैसर्गिकीकृत नागरिक असलेल्या आणि त्यांच्या अधिकारक्षेत्राच्या अधीन असलेल्या सर्व व्यक्ती युनायटेड स्टेट्सचे आणि ते राहत असलेल्या राज्याचे नागरिक आहेत. ही दुरुस्ती अमेरिकेतील कुख्यात काळ्या विरुद्ध गो-या युद्धानंतर झाली. (International News)
========
हे देखील वाचा : सिरिया-अती तेथे माती !
========
यापूर्वी आफ्रिकन अमेरिकन लोकांना नागरिकत्व नाकारले होते. मात्र घटनादुरुस्ती झाल्यामुळे स्थलांतरितांना त्यांच्या मुलांसह अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. आता अमेरिकन नागरिकत्व मिळवण्याचा अधिकार 150 वर्षांहून अधिक काळापासून घटनेत अंतर्भूत आहे. या नियमानुसार, अमेरिका आपल्या सीमेत जन्मलेल्या प्रत्येक मुलाला नागरिकत्व देते. त्या मुलाचे पालक दुस-या देशाचे असले तरी मुल अमेरिकेचे होते, पर्यायानं त्याच्या पालकांनाही अग्रक्रमानं अमेरिकेचे नागरिकत्व मिळते. ट्रम्प आता ही सर्व साखळी तोडण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र काही अमेरिकन कायदेपंडितांच्या मते 14 व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदी घटनादुरुस्तीशिवाय बदलल्या जाऊ शकत नाहीत. 2022 च्या अमेरिकन जनगणनेनुसार अमेरिकेत सुमारे 48 लाख भारतीय-अमेरिकन राहतात. यापैकी 34 टक्के म्हणजेच 16 लाखांचा जन्म अमेरिकेत झाला आहे. हे सर्व आता अमेरिकन नागरिक आहेत. नवीन राष्ट्राध्यक्षांनी हा कायदाच संपवला तर 16 लाख संपवला तर 16 लाख भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांना त्याचा थेट फटका बसणार आहे. या नागरिकांना मग भारतीय किंवा अन्य देशांचे नागरिकत्व मिळवावे लागणार आहे. (America)
सई बने
- America
- china
- congress
- eknath shinde
- Entertainment
- india
- information
- International news
- Latest International News
- latest marathi headlines
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- Mumbai
- Narendra Modi
- News
- Political News
- political updates
- Politics
- Social News
- Social Updates
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Marathi Headlines
- Top Stories
- Uddhav Thackery
- vidhansabha election
- राजकारण