डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहू लागले आहेत. त्यांनी शपथ घेतल्यानंतर लगेच प्रचारात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करायला सुरुवात केली आहे. त्यातील एक म्हणजे, जन्मसिद्ध नागरिकत्वाचा कायदा. अमेरिकेत हा कायदा 150 वर्षापासून लागू असलेल्या कायद्यात आता डोनाल्ड ट्रम्प यांनी बदल करायला सुरुवात केली आहे. या कायद्यानुसार अमेरिकेत जन्म झालेल्या मुलाला अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करण्यात येते. या मुलाचे आई-वडिल जरी अमेरिकेचे नागरिक नसतील तरी हे मुल अमेरिकेचे नागरिक होत असे. या कायद्याचा फायदा ट्रम्प यांच्या मते अनेक स्थलांतरितांनी घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या मुळ नागरिकांच्या करातील पैसा या स्थलांतरितासाठी खर्च झाल्याचे त्यांचे मत आहे. (Donald Trump)

ट्रम्प यांच्या मताशी साधर्म्य असलेले अमेरिकेन याला बर्थ टुरिझम असेही बोलत होते. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हाच जन्मसिद्ध नागरिकत्व देणारा कायदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर काही तासातच रद्द केला आहे. त्याचा परिणाम मोठ्या संख्येने भारतीयांवर होणार आहे. त्यामुळे अमेरिकेतील भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नोकरीसाठी गेलेल्या अनेक भारतीयांनी अमेरिकेतच संसार थाटला आहे. आता त्यांच्या मुलांच्या भविष्यावरच सावट आल्यानं काय करायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्ता हाती घेताच प्रचारता दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. यातील प्रमुख आश्वासन म्हणजे, जन्मसिद्ध नागरिकत्व. ट्रम्प यांनी हा कायदा बदलण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. याअंतर्गत, आता देशात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला अमेरिकन नागरिक म्हणून गणण्यास नकार देण्यात आला आहे. (International News)
अमेरिकन संविधानानुसार, देशात जन्मलेल्या प्रत्येक मुलांना देशाचे नागरिक मानले जाते. या मुलांना अमेरिकेचे जन्मसिद्ध नागरिकत्वही मिळते. अर्थात मुलाचे आईवडिल अमेरिकेचे नागरिक नसले तरी मुलाला नागरिकत्व मिळते. नंतर याच मुलाच्या सोबत त्याच्या पालकांनाही अमेरिकेचे नागरिकत्व मिळत असे. मात्र या कायद्याचा गैरफायदा स्थलांतरित घेत असल्याचा आरोप कायम ट्रम्प करीत आहेत. अमेरिकेत बेकायदा स्थलांतरित होणा-यांची मोठी संख्या आहे. हे स्थलांतरित या कायद्याचा आधार घेत असल्याचे ट्रम्प यांनी अनेकवेळा आपल्या भाषणातून सांगितले होते. त्यासाठी 150 वर्षापूर्वी केलेले जन्मसिद्ध धोरण बदलणे हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसारच त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 1868 मध्ये झालेल्या अमेरिकन संविधानातील 14 व्या दुरुस्तीनुसार, देशात जन्मलेल्या सर्व मुलांना जन्मसिद्ध नागरिकत्व दिले जाते. (Donald Trump)

या दुरुस्तीचा उद्देश देशात पूर्वी गुलाम असलेल्या लोकांना नागरिकत्व आणि समान अधिकार देणे हा होता. संविधानानुसार, अमेरिकेत जन्मलेली सर्व मुले अमेरिकेचे आणि त्यांच्या अधिकारक्षेत्राच्या अधीन राहून ज्या राज्यात जन्माला येतात त्या राज्याचे नागरिक बनतात. अर्थात हा कायदा त्या काळात योग्य होता, मात्र आता त्यात संशोधन होऊन बदल आवश्यक असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे मत आहे. त्यानुसार त्यांनी पावले टाकायला सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी यासंदर्भात आदेश देत कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरितांच्या मुलांना जन्मसिद्ध नागरिकत्वापासून वगळण्यात यावे आणि त्यांना जन्मसिद्ध नागरिकत्व दिले जाऊ नये असे स्पष्ट केले आहे. आता नवीन आदेशानुसार, ज्या मुलांचे दोन्ही पालक अमेरिकन नागरिक नाहीत अशा मुलांना पासपोर्टसह अमेरिकन नागरिकत्व मिळणार नाही. आता जर त्यांच्या पालकांपैकी एक अमेरिकन नागरिक असेल तरच मुलांना जन्मसिद्ध नागरिकत्व मिळणार आहे. (International News)
ट्रम्प यांच्या या निर्णयाचा सर्वात मोठा फटका भारतीय नागरिकांना बसणार आहे. अमेरिकन जनगणना ब्युरोच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 2024 पर्यंत भारतीय अमेरिकन लोकसंख्येची संख्या 5.4 दशलक्षांपेक्षा जास्त आहे. ही लोकसंख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या 1.47 टक्के आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या 2024 च्या अहवालानुसार, अमेरिकेत 54 लाख भारतीय राहतात. त्यातील 34 टक्के लोक अमेरिकेत जन्मलेले आहेत. ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे या 34 टक्के भारतीयांना नागरिकत्वाच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. अर्थात ट्रम्प यांच्या या आदेशाला आव्हानही देण्यात आले आहे. आत्तापर्यंत ट्रम्पच्या आदेशाला रोखण्यासाठी 22 राज्यांनी खटला दाखल केला आहे. (Donald Trump)
==================
हे देखील वाचा : Donald Trump : WHO ला टाटा आणि बरंच काही !
Donald Trump : ट्रम्पंनी का बदलली शपथविधीची परंपरा !
==================
मुळात अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागते. या सर्व पद्धती क्लिष्ट आणि लांबलचक आहेत. अमेरिकन नागरिकत्व मिळविण्यासाठी ग्रीन कार्ड मिळवणे हा एक मार्ग असतो. पण ग्रीनकार्ड मिळवणेही कठीण असते. त्यासाठी अमेरिकन नातेवाईकाकडून प्रायोजकत्व मिळावे लागते. जर तुमचा जवळचा नातेवाईक अमेरिकन नागरिक किंवा ग्रीन कार्डधारक असेल तर तो तुमच्यासाठी ग्रीन कार्ड प्रायोजित करू शकतो. ग्रीन कार्ड मिळाल्यानंतर, किमान 5 वर्षानंतर नागरिकत्व चाचणी उत्तीर्ण झाल्यावरच अमेरिकन नागरिकत्व बहाल होते. ही सर्व क्लिष्ठ पद्धती आहे. आता ट्रम्प शासनात या सर्वा कायदेप्रणालीत काय बदल होणार हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. (International News)
सई बने
- America
- Birth Tourism
- BJP
- china
- congress
- donald trump
- eknath shinde
- Entertainment
- green card
- india
- information
- International news
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- Mumbai
- Narendra Modi
- News
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Social News
- Social Updates
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Stories
- Uddhav Thackery
- राजकारण