Home मनोरंजन मेट गालामध्ये आलिया, प्रियंका आणि ईशाची चर्चा….
मनोरंजन

मेट गालामध्ये आलिया, प्रियंका आणि ईशाची चर्चा….

8
Red carpet
Alia, Priyanka and Isha talk at Met Gala marathi info

मेट गाला फॅशनचा इव्हेंटच्या रेड कार्पेटवर (Red carpet) नुकताच बॉलिवूड ते हॉलिवूडमधील तारे तारकांचा जलवा दिसला. या मेट गाला फॅशन इव्हेंटच्या रेड कार्पेटवर अनेक हॉलिवूडस्टार दिसले. पण यात वरचढ ठरल्या त्या भारतीय तारकाच. प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण आणि पहिल्यांदाच या रेड कार्पेटवर आलेली आलिया भट्ट यांनी आंतरराष्ट्रीय मिडियाचे लक्ष खेचून घेतले. याशिवाय ईशा अंबानीनेही या रेड कार्पेटवर हजेरी लावली. ईशानं लाखो रुपये किंमतीची काळ्या रंगाची साडी घातली होती. शिवाय तिनं घेतलेल्या छोट्या पर्सनंही मिडियाचं लक्ष वेधून घेतलं आहे. भारतीय सेलिब्रिटींनी अतिशय प्रतिष्ठित मेट गाला फॅशन इव्हेंटच्या रेड कार्पेटवर (Red carpet)आपली जादू दाखवली आहे. आलिया भट्टपासून दीपिका पादुकोणपर्यंत, या भारतीय सेलिब्रिटींनी मेट गालामध्ये रेड कार्पेटचा आपला जलवा दाखवला. अंबानी कुटुंबाची राजकन्या असा जिचा उल्लेख होतो, त्या इशा अंबानी परमलची  मेट गालाच्या रेड कार्पेटवरील (Red carpet) उपस्थिती लक्षणिय ठरली. भारतीय सौदर्यवती आणि त्यांच्या पोशाखाची चर्चा मेट गाला फॅशन इव्हेंटमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.  

अनेक भारतीय सेलिब्रिटींनी अतिशय प्रतिष्ठित मेट गाला फॅशन इव्हेंटच्या रेड कार्पेटवर (Red carpet) आपली जादू चालवली आहे. या मेट गाला फॅशनची क्वीन म्हणून दीपिका पादुकोणचा उल्लेख करण्यात येतो. मात्र यावर्षी दीपिकासोबत आलिया भट्टनेही वाहवा मिळवली आहे. दिपिका आणि प्रियंका चोप्रा या गाला रेड कार्पेटवर लक्षवेधी पोशाख करण्यात पटाईत आहेत. प्रियंका चोप्राने 2017 मध्ये मेट गाला इव्हेंटमध्ये पहिल्यांदा आपली उपस्थिती लावली. यावेळी तिनं राफ लॉरेनने डिझाइन केलेला लांब ट्रेंच कोट घातला होता. या इव्हेंटमध्ये प्रियंका पती निक जोनाससोबत पोहोचली.  2018 मध्ये, प्रियांकाने डायरने डिझाइन केलेला राल्फ लॉरेन मरून आणि गोल्डन कॉम्बिनेशन आउटफिट घातला होता. त्यावर स्फटिक आणि मणी असलेले होते. विशेष म्हणजे या गाऊनची एम्ब्रॉयडरी भारतात करण्यात आली होती.  2019 मेट गाला इव्हेंटमध्ये, प्रियांका चोप्रा चमकदार पारदर्शक गाऊनमध्ये चर्चेत आली. प्रियंकानं यावेळी विस्कटलेल्या केसांसारखी हेअरस्टाईल केली होती.  याशिवाय त्यावर मुकूट घातला होता. तिची ही हेअरस्टाईल आणि त्यावर मुकूट बराच गाजला होता. आताही यावर्षीच्या मेट गाला इव्हेंटमध्ये, प्रियांका चोप्राने लक्ष वेधून घेतले. मात्र यावेळी तिच्या ड्रेससोबत तिनं घातलेल्या नेकलेसच्या किंमतीची चर्चा अधिक झाली.  यावर्षीच्या मेटा गालाचे वैशिष्ट ठरली ती ईशा अंबानी. मेट गाला इव्हेंटमध्ये, ईशा अंबानीने प्रबल गुरुंग या फॅशन डिझायनरनं डिझाईन केलेला सिल्व्हर क्रिस्टल आणि पर्ल वर्क असलेला काळा गाऊन परिधान केला होता.  त्यात ईशाचे भारतीय सौदर्य खुलून दिसत होते.  ईशानं हातात घेतलेल्या छोट्या पर्सचीही चर्चा चांगलीच झाली.  

या गाला रेड कार्पेटवर (Red carpet) पहिल्यांदाच आलेल्या आलिया भटच्या स्नो व्हाईट लूकनं चांगलीच वाहवा मिळवली. आलिया भट्ट पांढऱ्या गाऊनमध्ये मेट गालामध्ये दाखल झाली होती. तिचा हा गाऊन मोत्यांनी बनवलेला होता. आलिया भट्टने मेट गालाच्या रेड कार्पेटवर 1 लाख मोत्यांचा सुंदर गाऊन परिधान केला होता.  तिच्या या मेड इन इंडिया गाऊनने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.  प्रबल गुरुंग यांनीच या गाऊनचे डिझाइन केले आहे.  या गाऊनमध्ये आलियाचे सौदर्य अधिक खुलून आले होते.  आलियासोबत प्रियंका चोप्राची उपस्थितीही गाजली.  त्यामागे तिच्यापोशाखापेक्षा तिचा करोडो रुपये किंमतीचा नेकलसच अधिक होता. प्रियंका, तिचा पती निक जोनास सोबत काळ्या रंगाच्या काळ्या रंगाचा व्हॅलेंटिनो गाऊन मध्ये रेड कार्पेटवर दाखल झाली. 

========

हे देखील वाचा : जेव्हा एका सिनेमासाठी अनिल कपुरला रद्द कराव्या लागल्या होत्या सर्व तारखा

========

मात्र  सर्वांच्या नजरा तेव्हा प्रियंकाच्या हिऱ्याच्या नेकलेसवर खिळल्या होत्या.  प्रियंकानं घातलेला हा नेकलेस 11.6-कॅरेट डायमंडचा होता. प्रियांकाच्या नेकलेसची किंमत $25 मिलियन म्हणजेच जवळपास 204 कोटी रुपये आहे.  मेट गालानंतर प्रियंका चोप्राचा USD 25 दशलक्ष बल्गारी अधिकृत नेकलेस लिलाव करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.  विशेष म्हणजे, जेव्हा प्रियांकाने बोल्ड गाऊनमध्ये गाला इव्हेंटमध्ये पती अमेरिकन पॉप स्टार निक जोनाससह प्रवेश केल्यावर तिच्या चाहत्यांनी जोरदार स्वागत केले.  प्रियंका तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अमेरिकन वेब सीरिज ‘सिटाडेल’साठी चर्चेत आहे. अॅक्शन थ्रिलर मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.  गाला रेड कार्पेटच्या हा इव्हेंट काही दिवस असाच चालू असेल आणि त्यातील भारतीय अभिनेत्रींच्या सौदर्याचा आणि त्यांच्या पोशाखाचा जलवा असाच आंतरराष्ट्रीय मिडियामध्ये राहणार आहे.  

सई बने

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...