Home मनोरंजन वयाच्या 83 व्या बाबा झालेल्या Al Pacino च्या 29 वर्षीय गर्लफ्रेंन्डबद्दल माहितेय का?
मनोरंजन

वयाच्या 83 व्या बाबा झालेल्या Al Pacino च्या 29 वर्षीय गर्लफ्रेंन्डबद्दल माहितेय का?

10
al pacino
al pacino

‘गॉडफादर’आणि ‘स्कारफेस’ सारख्या सिनेमांमध्ये जेष्ठ हॉलिवूड अभिनेता अल्फ्रेडो जेम्स पचिनो उर्फ पचीने सध्या चर्चेत आहे. कारण हा अभिनेता वयाच्या ८३ व्या वर्षी चौथ्यांदा बाबा झाला आहे. अल पचीनो याच्या २९ वर्षीय गर्लफ्रेंन्डने एका बाळाला जन्म दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार नूर अल्फल्लाह आणि पचीनो यांनी मिळून बाळाचे नाव रोमन पचीनो असे ठेवले आहे. (Al pacino)

या वयात बाबा झाल्याने पचीनो फार आनंदी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकन अभिनेत्याची गर्लफ्रेंन्ड प्रेग्नेंट असल्याची बातमी समोर आली होती. त्यावर प्रतिक्रिया देत पचीनो याने असे म्हटले की, तो त्याच्यासाठी खास क्षण आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार नूरने ११ आठवड्यांच्या प्रेग्नेंसीची गोष्ट ही पचीनो याच्यापासून लपवली होती. यामागील कारण असे की, अल पचीनो आणि त्याच्या मुलांना तो या वयात बाबा व्हावा असे वाटत नव्हते. परंतु नंतर अल पचीनो याची डीएनए चाचणी करण्यात आली. तेव्हा त्याने आनंदाने त्या मुलाला स्विकारले.

पचीने आणि नूर यांना पहिल्यांदा एप्रिल २०२२ मध्ये एकमेकांना वेनिसमध्ये डेट करताना पाहिले होते. त्यानंतर दोघे बहुतांशवेळा एकत्रित ही दिसले. असे सांगितले जाते की, दोघांनी एकमेकांना कोरोनापासून डेट करण्यास सुरुवात केली होती.

अल पचीनो नेहमीच आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत राहतो. पचीनो याची एक्स गर्लफ्रेंन्ड आणि अॅक्टिंग कोच जान टॅरेंट हिच्यापासून त्याला एक मुलगी आहे. तिचे नाव जुली असे आहे. जुली ही ३३ वर्षाची आहे. तर दुसरी एक्स गर्लफ्रेंन्ड बेवर्ली डी एंजोले हिला याच्यापासून दोन जुळी मुलं आहेत. त्यांची नावे एंटोन आणि ओलिविया असे आहे. या दोघांचे वय २२ वर्ष आहे.

कोण आहे नूर अल्फल्लाह?
नूर अल्फल्लाह हिने कॅलिफोर्नियातील लॉस एंजिल्स युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केले आहे. तिने साउथ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या सिनेमॅटिक स्कूल ऑफ आर्ट्स मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. नूर हिला सिनेमात काम करण्याची आवड असून तिने फिल्म मेकिंगमध्ये मास्टर डिग्री घेतली आहे. अल पचीनो पूर्वी तिचे काही अफेअर्स ही होते. (Al pacino)

हेही वाचा- ‘या’ Celebrity नी ब्रेकअपनंतर एक्स पार्टनरचे केलेयत हैराण करणारे खुलासे

अल पचीनो पूर्वी ती २०१७ मध्ये नूर ही प्रसिद्ध गायक माइक जॅगर याला डेट करत होती. त्यावेळी नूर ही २२ वर्षाची होती. तर माइक हा ७४ वर्षाचा होता. २०१८ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. त्यावेळी नूरने असे म्हटले होते की, तिला वयाचा काहीही फरक पडत नाही. कारण हृदय केवळ भावना पाहते. नूरने ६० वर्षीय बिझनेसमॅन निकोलस बर्गग्रेन याला सुद्धा डेट करत होता. तिला काही वेळा फिल्म मेकर क्लिंट ईस्टवुडसोबत सुद्धा पाहिले गेले आहे. त्याचे वय ९३ वर्ष होते. दरम्यान, नूरने आपल्या नात्यांना कधीच स्विकारले नाही आणि मीडियाला असे सांगितले की, तो त्यांचा फॅमिली फ्रेंन्ड आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...