Home गाजावाजा स्पेशल Akshaya Tritiya 2023 Date And Shubh Muhurat: अक्षय तृतीया कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
गाजावाजा स्पेशल

Akshaya Tritiya 2023 Date And Shubh Muhurat: अक्षय तृतीया कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

7
Akshaya Tritiya 2023 Date And Shubh Muhurat
akshaya-tritiya-2023-date-and-shubh-muhurat-when-is-akshaya-tritiya-know-the-auspicious-time-and-the-importance-of-this-day-marathi-info

अक्षय्य तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया हा वर्षातील सर्वात महत्वाचा दिवस असून तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते आणि हिंदू धर्मात त्याचे विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचा जन्म परशुरामाच्या सहाव्या अवतारात झाला होता.(Akshaya Tritiya 2023 Date And Shubh Muhurat)

Akshaya Tritiya 2023 Date And Shubh Muhurat
Akshaya Tritiya 2023 Date And Shubh Muhurat

ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय  तृतीयेचा दिवस खूप खास असतो कारण या दिवशी सूर्य आणि चंद्र दोघेही उच्च राशीत असतात, त्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढते.नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. चला जाणून घेऊया यंदा अक्षय्य तृतीया केव्हा आहे? या दिवशी शुभ मुहूर्त कोणता? आणि पंचांगानुसार त्याचे महत्त्व काय.


यंदा अक्षय तृतीया कधी?

हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते. यंदा हा दिवस 22 एप्रिल 2023 रोजी असून अक्षय तृतीया सकाळी 7 वाजून 49 मिनिटांनी सुरू होईल आणि 23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी संपेल. 

Akshaya Tritiya 2023 Date And Shubh Muhurat
Akshaya Tritiya 2023 Date And Shubh Muhurat


अक्षय तृतीया 2023 शुभ मुहूर्त

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी पूजेचा शुभ काळ सकाळी ७ वाजून ४९ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून २० मिनिटांपर्यंत आहे.(Akshaya Tritiya 2023 Date And Shubh Muhurat)

=================================

हे देखील वाचा: नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे, मकरसंक्रात…

=================================

अक्षय तृतीयेचे महत्व 

अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ असून या दिवशी देवी लक्ष्मीची विधिपूर्वक पूजा केल्यास तिची कृपा कायम राहते, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी माता अन्नपूर्णा हिची देखील पूजा केली जाते. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया शुभ दिवसांमध्ये गणले जाते आणि या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी आपल्याला मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लोक शुभ आणि मंगल काम करतात. तसेच नवीन कार्याच्या प्रारंभासाठी हा दिवस शुभ मानला जातो.या दिवशी सोने खरेदी सुद्धा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेल्या कामात व्यक्तीला यश मिळते. हा दिवस सौभाग्य आणि समृद्धी घेऊन येतो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेचा दिवस लग्न किंवा साखरपुडा केल्यास शुभ मानले जाते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....