Home राष्ट्रीय Ahmedabad : अहमदाबादमध्ये भीषण विमान दुर्घटना लंडनला जाणारे विमान कोसळले
राष्ट्रीयराष्ट्रीय

Ahmedabad : अहमदाबादमध्ये भीषण विमान दुर्घटना लंडनला जाणारे विमान कोसळले

11
Ahmedabad

गुजरातच्या अहमदाबाद शहरात आज १२ जून रोजी मोठा दुर्दैवी विमान अपघात घडला आहे. अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 या फ्लाइटचा टेकऑफदरम्यान भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स प्रवास करत होते. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी सुद्धा प्रवास करत होते. मात्र या घटनेत किती जीवितहानी आणि वित्तहानी झाली याबद्दल अधिकृत माहिती अजून समजू शकलेली नाही. विमान जिथे कोसळले तो रहिवासी परिसर असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना सध्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले जात आहे. (Ahmedabad)

या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते अशी माहिती समोर आली आहे. विजय रुपाणी यांच्या बोर्डिंग पासचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता या अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सुरतहून अहमदाबादला रवाना झाले आहेत. तसेच गृहमंत्री अमित शाह यांनीही या घटनेची माहिती घेतली आहे. दुर्घटनाग्रस्त झालेले हे विमान ११ वर्ष जुने असून ते दिल्लीहून अहमदाबादला पोहोचले होते. त्यानंतर ते लंडनला रवाना होणार होते. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, ऍम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या एनडीआरएफ, सीमा सुरक्षा दल (BSF) यासोबतच अनेक टीम्स या बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Marathi News)

Ahmedabad

दरम्यान अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. आकाशात आगीचे आणि धुराचे लोट दिसत आहे. या विमान अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या इथे बचावकार्य वेगाने सुरु झाले आहे. लंडनला जाणारे विमान ज्या ठिकाणी हे कोसळलं तो भाग रहिवासी परिसर आहे. अहमदाबाद विमानतळाजवळच हे विमान कोसळले असून, त्याच भागात अहमदाबाद येथील शासकीय रुग्णालय देखील आहे. तर ज्या इमारतीवर हे विमान पडले ती रहिवासी डॉक्टरांची इमारत असल्याचे सांगितले जात आहे. विमान १.३७ मिनिटांनी म्हणजे लंच टाईमला पडल्याने इमारतीमध्ये अनेक डॉक्टर जेवणासाठी आले होते असे सांगितले जात आहे. (Todays Marathi Headline)

दरम्यान या मोठया दुर्घटनेनंतर अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातानंतर एअर इंडियाने एक ट्वीट केले आहे. यात कंपनीने म्हटले की, “अहमदाबादवरुन लंडनलाा जाणाऱ्या AI171 या विमानाचा आज १२ जून २०२५ रोजी अपघात झाला आहे. सध्या आम्ही तपशीलांची पडताळणी करत आहोत आणि लवकरच पुढील माहिती आम्ही http://airindia.com या आमच्या वेबसाइटवर आणि X हँडलवर (https://x.com/airindia) या अकाउंटवर शेअर करू.” (Latest marathi News)

===========

हे देखील वाचा :  इंडिगोची एअर हॉस्टेस ते यशस्वी पायलट : खुशबू प्रधानच्या जिद्दीच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी

===========

या अपघात झालेल्या विमानाच्या पायलटचे नाव कॅप्टन सुमित सभरवाल आहे. सुमित यांना ८२०० तास विमान उडवण्याचा अनुभव आहे. तसेच या विमानाच्या सह-वैमानिकाला ११०० तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. विमानाने अहमदाबादहून धावपट्टी २३ वरून उड्डाण केले. मात्र उड्डाण केल्यानंतर लगेचच केवळ ३ मिनिटांच्या आतच हे ते विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले. दरम्यान सोशल मीडियावर सतत या अपघाताचे विविध व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहे. (Top Marathi Headline)

Recent Posts

Related Articles

S. L. Bhyrappa
राष्ट्रीय

S. L. Bhyrappa : ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा यांचे निधन

साहित्यविश्वातून एक दुःखद बातमी येत आहे. प्रसिद्ध कादंबरीकार आणि लेखक एस.एल. भैरप्पा...

Stray Dogs
राष्ट्रीयराष्ट्रीय

Stray Dogs : दिल्ली सरकारला सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांबाबत दिला मोठा आदेश

सध्या देशातील दोन महानगरांमधील कबुतरं आणि कुत्रे हे दोन मुद्दे देशभर कमालीचे...

Independence Day | Todays Marathi News
राष्ट्रीयराष्ट्रीय

Independence Day : स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी ‘असे’ करा बुकिंग

येत्या काही दिवसातच आपण आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. १५...

AirForce
राष्ट्रीयराष्ट्रीय

AirForce : 62 वर्षांच्या सेवेनंतर Mig-21 होणार निवृत्त

कायमच भारताच्या संरक्षण दलाची संपूर्ण जगात चर्चा होताना दिसते. भारत कायमच आपली...