Home मनोरंजन पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करूनही ‘या’ सिनेमांनी मिळवला फ्लॉपचा टॅग 
मनोरंजन

पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करूनही ‘या’ सिनेमांनी मिळवला फ्लॉपचा टॅग 

7
flopped Bollywood movie
flopped Bollywood movie

बॉलिवूडमध्ये दरवर्षी शेकडो चित्रपट बनतात आणि प्रदर्शित होतात. मात्र यातले काही मोजकेच सिनेमे गाजतात, हिट होतात. चित्रपटांना हिट होण्यासाठी सरावात महत्वाची असते ती चित्रपटाची कथा. त्यानंतर बाकीच्या गोष्टी. जर चित्रपटाची कथा दमदार असेल तर इतर गोष्टी दुय्यम असल्या तरी चालतात. चित्रपटांसाठी नेहमीच एक नियम किंवा एक म्हण म्हटली जाते आणि ती म्हणजे ‘कंटेंट इज किंग’. जर चित्रपटाची कथा दमदार असेल तर त्या सिनेमाला हिट होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आणि जर सिनेमाची कथा तकलादू असेल तर मोठ्यातला मोठा कलाकार देखील त्या चित्रपटाला फ्लॉप होण्यापासून वाचवू शकत नाही. मात्र आजपर्यंत बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे होते, ज्यात अनेक मोठे कलाकार होते, मात्र सिनेमाची कथा पाहिजे तेवढी ताकदवर नसल्याने हे सिनेमे फ्लॉप ठरले. पण त्यांनी ओपनिंग तर खूपच चांगली केली मात्र पुढे हत्यार टाकले. जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल. (flopped Bollywood movie)

बच्चन पांडे

Bachchhan Paandey

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तर जोरदार सुरुवात केली. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १३ कोटींची कमाई केली. मात्र हा चित्रपट लोकांना आवडला नाही आणि नंतर या चित्रपटाची कमाई सतत पडत गेली. चित्रपटाने मोठ्या मुश्किलीने ५० कोटी कमावले. (flopped Bollywood movie)

ठग्स ऑफ हिंदोस्तान

Thugs of Hindostan

आमिर खानच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना खूपच प्रतीक्षा होती. आमिर खानने नेहमीच सुपरहिट सिनेमे दिले. मात्र त्याचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट याला अपवाद ठरला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५२ कोटी कमावले मात्र नंतर सिनेमा खाली यायला लागला आणि त्याने केवळ १५० कोटी कमावले. 

जीरो

Zero

शाहरुख खान नेहमीच त्याच्या हिट चित्रपटांसाठी ओळखला जातो. मात्र अतिशय साधी पटकथा असलेला त्याचा ‘जिरो’ सिनेमा फ्लॉप झाला. आनंद एल राय आणि शाहरुख खान यांनी पहिल्यांदा या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा काम केले. २०१८ साली आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. पहिल्या दिवशी १९ कोटी कमावलेल्या या सिनेमाने १०० कोटींचा आकडा देखील नाही गाठला. (flopped Bollywood movie)

बेशर्म

Besharam

रणबीर कपूरच्या या सिनेमात त्याने ऋषी कपूर आणि नितु कपूर यांच्यासोबत काम केले. मात्र या तिघांचे स्टारडम देखील या सिनेमाला फ्लॉप होण्यापासून वाचवू शकले नाही. सिनेमाने पहिल्या दिवशी २१ कोटी कमावले एकूण ५९ कोटींची कमाई या सिनेमाने केली. (flopped Bollywood movie)

=====

हे देखील वाचा – ‘भारत माझा देश आहे’ मध्ये झळकणार तुझ्यात जीव रंगला फेम लाडू

=====

शानदार

Shaandaar

क्वीन सिनेमानंतर या सिनेमाकडून लोकांना खूपच अपेक्षा होती. शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांचा हा सिनेमा सपाटून आपटला. १३ कोटी पहिल्या दिवशी कमावणाऱ्या या सिनेमाने ४३ कोटी कमावले होते (flopped Bollywood movie)

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...