मॉडेल आणि अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळे निधन झाले आहे. शेफालीच्या निधनाची माहिती समोर येताच मनोरंजनविश्वात एकच खळबळ उडाली आहे. २७ जून रोजी रात्री ११ च्या सुमारास अभिनेत्री शेफालीला छातीत दुखू लागल्याने तिचा पती आणि अभिनेता पराग त्यागी याने तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र रुग्णालयात पोहोचताच शेफालीला मृत घोषित करण्यात आले. सध्या तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शेफाली मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिला फॅन फॉलोविंग देखील मोठी होती. (Shefali Jariwala)
शेफाली जरीवाला कोण होती?
शेफाली जरीवाला हिचा जन्म १५ डिसेंबर १९८२ रोजी गुजरातमध्ये झाला होता. एकत्र मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला होता. तिच्या कुटुंबाने मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्यांचा सामना केला होता. तिने तिचे शिक्षण अल्मा मेटर सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमधून घेतले. शेफाली जरीवाला ही संगणक पदवीधर होती. व्यवसायाने शेफाली एक मॉडेल आणि अभिनेत्री होती. शेफाली इंडस्ट्रीमध्ये २००२ ते २०२५ या काळात सक्रीय राहीली. २००२ मध्ये आलेल्या ‘कांटा लगा’ या गाण्याच्या रीमिक्स व्हिडिओमुळे ती प्रसिद्ध झाली होती. या गाण्याच्या लोकप्रियतेनंतर लोक तिला ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखू लागले. त्यावेळी या गाण्याबद्दल काही वादही झाले होते. (Marathi News)
शेफाली जरीवालाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सांगायचे झाले तर तिने मीट ब्रदर्सचे मधील संगीतकार हरमीत सिंग यांच्यासोबत २००४ मध्ये लग्न केले होते. मात्र दुर्दैवाने २००९ मध्ये त्यांचे लग्न तुटले. या लग्नामध्ये शेफालीने हरमीतवर अनेक गंभीर आरोप केले तेव्हा या जोडप्याचा घटस्फोट झाला. नंतर, तिने २०१५ मध्ये अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले. (Todays Marathi Headline)

शेफाली जारीवालाची कारकिर्द
शेफाली जरीवाला ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल होती. तिने अनेक हिंदी संगीत व्हिडिओ, रिअॅलिटी शो आणि टेलिव्हिजन शो केले. ती ‘कांटा लगा’ या म्युझिक व्हिडिओसाठी ओळखली जायची. तिने पराग त्यागीसोबत नच बलिये ५ आणि नच बलिये ७ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. शेफाली जरीवाला हिने २०१९ मध्ये तिने बिग बॉस १३ मध्ये भाग घेतला होता. २०१८ मध्ये तिने बाॅलीवूडचा मराठी अभिनेता श्रेयस तळपदेसोबत एएलटी बालाजीच्या बेबी कम ना या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. (Marathi Latest News)
एका माहितीनुसार शेफालीने एका मुलाखतीमध्ये तिच्या आरोग्यासंदर्भात सांगितले होते. तिने खुलासा केला होता की, ती १५ वर्षांची असताना पहिला अपस्माराचा झटका (फिट्स) आला होता. त्यानंतर तिला तणावामुळे आणि चिंतेमुळे असे झटके मधून मधून येऊ लागले होते. परंतु नियमित व्यायामामुळे, मेडिटेशनमुळे तिचा हा त्रास कमी झाला होता. २००२ च्या कांता लगा या व्हिडिओ अल्बममधील गाण्यात दिसल्यानंतर शेफाली प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या या एका म्युझिक अल्बममुळे कांटा लगा गर्ल नावाने प्रसिद्ध झाली होती. (Top Trending News)
=========
हे देखील वाचा : Shefali Jariwala: ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे धक्कादायक निधन
=========
दरम्यान शेफाली सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय होती ती सतत विविध पोस्ट शेअर करायची. ती तिच्या पोस्टमधून लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासोबतच त्यांना प्रेरणा द्यायचे देखील काम करायची. शेफाली अतिशय चांगली, सेल्फ मेड, स्पष्टव्यक्ता, दयाळू अशी व्यक्ती होती. मोठ्या मेहनतीने तिने मनोरंजनविश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले होते. शेफालीने कायम सगळ्यांनाच आपल्या बोलण्यातून, वागण्यातून प्रेरणा दिली. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- kanta laga fame Shefali Jariwala
- parag tyagi
- Shefali Jariwala
- Shefali Jariwala death
- Shefali Jariwala information
- Shefali Jariwala journey
- Shefali Jariwala passed away
- Shefali Jariwala post
- Shefali Jariwala series
- Shefali Jariwala social medua
- Shefali Jariwala song
- tv actress Shefali Jariwala
- who is Shefali Jariwala?
- कांटा लागा फेम शेफाली जरीवाला
- टीव्ही अभिनेत्री शेफाली जरीवाला
- शेफाली जरीवाला
- शेफाली जरीवाला अभिनय
- शेफाली जरीवाला आणि पराग त्यागी
- शेफाली जरीवाला कोण आहे?
- शेफाली जरीवाला गाणे
- शेफाली जरीवाला डान्स
- शेफाली जरीवाला निधन
- शेफाली जरीवाला पोस्ट
- शेफाली जरीवाला माहिती
- सिनेमा
- हिंदी