Home मनोरंजन Hina Khan : अभिनेत्री हिना खानने बॉयफ्रेंड रॉकीसोबत बांधली लग्नगाठ
मनोरंजन

Hina Khan : अभिनेत्री हिना खानने बॉयफ्रेंड रॉकीसोबत बांधली लग्नगाठ

9
Hina Khan

अभिनेत्री हिना खान ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील मेगा स्टार म्हणून तिची ओळख आहे. ये रिश्ता क्या केहलता हैं या मालिकेतून अभिनेत्री हिना खान कमालीची प्रसिद्ध झाली. मालिकेतील ‘अक्षरा’ या पात्रामुळे तिला संपूर्ण जगात नवीन ओळख मिळाली. हिना कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या वैयक्तिक, व्यावसायिक आयुष्यातील अपडेट्स देत असते. आज देखील हिनाने तिच्या आयुष्यातील एक महत्वाची, मोठी आणि आनंददायी गोष्ट सगळ्यांसोबत शेअर केली आहे. (Hina Khan)

आज ४ जून रोजी हिना खानने तिचा लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड असलेल्या रॉकी जयस्वालसोबत लग्न केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हिनाने सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे. लग्नातील काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. हिनाने एक सुंदर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. मागील अनेक वर्षांपासून हिना आणि रॉकी रिलेशनशिपमध्ये होते. हिनाच्या प्रत्येक सुखदुःखाच्या वेळी रॉकी कायम तिच्यासोबत असायचा. फॅन्स त्यांना नेहमीच मेड फॉर एच अदर म्हणायचे. हिनाला कायम तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला जायचा. मात्र आता रॉकी जयस्वाल आणि हिना खानने कोर्ट मॅरेज केले आहे. (Top Stories)

हिनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “दोन वेगवेगळ्या जगातून, आम्ही प्रेमाचे एक विश्व निर्माण केले. आमच्यातील मतभेद दूर झाले, आमचे मन जुळले आणि आयुष्यभरासाठी एक बंध निर्माण झाला आहे. आम्हीच एकमेकांसाठी घर, प्रकाश आणि आशा आहोत आम्ही एकत्र मिळून सर्व अडथळे पार करू. आज आम्ही प्रेम आणि कायद्याने कायमचे बांधले गेले आहोत. पती आणि पत्नी म्हणून आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो.” (Marathi News)

Hina Khan

हिनाच्या आणि रॉकीच्या संपूर्ण लुकबद्दल बोलायचे झाले तर हिना खान पारंपरिक पण Minimalist Bride असल्याचे आपल्याला फोटोमध्ये दिसत आहे. हिनाने डिझायनर साडी आणि डोक्यावर ओढणी तर रॉकी जयस्वालने कुर्ता आणि पायजमा घातलेला दिसत आहे. हिनाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत सोबतच त्या दोघांच्या लुकबद्दल तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. हिनाच्या लुकबद्दल सांगायचे झाले तर ती सुंदर ऍपल ग्रीन रंगाच्या साडीत दिसत आहे. हिना खानने तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या दिवशी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राची सुंदर आणि अतिशय आकर्षक टिश्यू सिल्क साडी परिधान केली आहे. (Marathi Latest News)

कमीत कमी दागिने, साधा लूक करुन तिने लग्नगाठ बांधली. तिने लग्नासाठी सोनेरी-चंदेरी धाग्यांचे नक्षीकाम असणारी साडी परिधान केली आहे. यासोबतच तिने गुलाबी रंगाचा ब्लाऊज आणि डोक्यावर गुलाबी ओढणी देखील घेतलेली दिसत आहे. सोनेरी दागिने आणि मोकळे सोडलेले केस यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने सुंदर कुंदन दागिने घातले होते. कपाळावर मांग टिक्का, गळ्यात हिरव्या पन्ना हार आणि हातात सुंदर कुंदन दागिने तिच्यावर खुलून दिसत होते. अभिनेत्रीने हातापायांवर कमी मात्र आकर्षक मेंदीही काढली आहे. (Top Marathi News)

हिनाच्या दुपट्ट्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यावर विणलेले हिना आणि तिच्या पतीचे नाव. ही नावे साडीवर सुंदर भरतकाम करत लिहिलेली आहेत. केवळ साडीच नव्हे तर मनीष मल्होत्राच्या रॉयल वारसा ज्वेलरीने हिनाचा हा रॉयल लूक अधिक खास बनवला होता. तर रॉकीच्या लुकबद्दल सांगायचे झाले तर, रॉकीने मनीष मल्होत्राचा सिग्नेचर एक्रू कुर्ता घातला होता. (TOdays Marathi Headline)

Hina Khan

दरम्यान हिनाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये आणि काही रियॅलिटी शोमध्ये काम केले आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. हिना खानला मागच्यावर्षी ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. या अतिशय कठीण काळात देखील रॉकी तिच्यासोबत सावलीसारखा होता. हिना आणि रॉकीने त्यांचे नाते कधीच लपवले नाही. ते कायम विविध ट्रीपला एकत्र जायचे. केवळ सुखात नाही तर दुःखात देखील रॉकी कायम हिनासोबत आपल्याला दिसतो. (Top Marathi Headline)

==========

हे देखील वाचा : Ashok Saraf : दैव बलवत्तर म्हणून दोनदा मोठ्या अपघातातून बचावले आहेत अशोक सराफ

जाणून घ्या एव्हरग्रीन जोडी असणाऱ्या अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी

Ashok Saraf : अशोक सराफ कसे झाले इंडस्ट्रीचे ‘अशोक मामा’…जाणून घ्या रंजक किस्सा

==========

रॉकी जयस्वालबद्दल सांगायचे झाले तर, त्याचे खरे नाव जयंत जयस्वाल असे असून, तो मूळचा कोलकात्याच्या आहे. त्याचे शिक्षण कोलकाता मधेच झाले आहे. रॉकी एक एक प्रसिद्ध टेलिव्हिजन निर्माता, फिल्ममेकर आणि उद्योगपती आहे. त्याने अनेक टीव्ही शोमध्ये पडद्यामागे काम केले आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमुळे आणि हिनासोबतच्या नात्यामुळे तो कायमच चर्चेत आणि प्रसिद्धीत राहिला. हिना आणि त्याची प्रेमकहाणी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ च्या सेटवर सुरू झाली. मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. गेल्या काही वर्षांत त्यांचे नाते आणखी घट्ट झाले आहे. ते अनेकदा एकत्र दिसले आहेत. (Social Updates)

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...