Home मनोरंजन अभिषेक बच्चनची ‘ती’ पोस्ट वेधते लक्ष
मनोरंजन

अभिषेक बच्चनची ‘ती’ पोस्ट वेधते लक्ष

9
Abhishek Bachchan

मनोरंजनविश्वामधे आपण पाहिले तर अनेक नवीन नाती जुळताना दिसतात तर अनेक जुनी नाती तुटताना दिसतात. अनेकदा आपण पाहिले या क्षेत्रातील नाती ही कमकुवत वाटतात. अनेक वर्षांचे नाते ही लोकं तोडतात आणि पुढे जातात. या इंडस्ट्रीमध्ये तर आज या व्यक्तीसोबत नाव तर उद्या दुसऱ्या व्यक्तीसोबत नाव जोडले जाते. अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर लग्न केल्यावर काही वर्षांमध्ये, महिन्यांमध्ये तर काहींनी चक्क केवळ काही दिवसांतच त्यांचे लग्न मोडल्याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात.

सध्या या इंडस्ट्रीमध्ये एका घटस्फोटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तो घटस्फोट आहे अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा. अभिषेक आणि ऐश्वर्या बॉलिवूडमधील अतिशय गाजणारे, लाडके आणि प्रसिद्ध कपल म्हणून ओळखले जातात. त्यांना कमालीची फॅन फॉलोविंग आहे. त्यांचे फोटो, व्हिडिओ नेहमीच व्हायरल होतात. ऐश्वर्या, अभिषेक आणि त्यांची मुलगी आराध्या यांना एकत्र पाहायला त्यांच्या फॅन्सला नेहमीच आवडत असते.

मात्र सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या अनंत अंबानींच्या लग्नात बच्चन कुटुंबाने एकत्र हजेरी लावली. यात अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता नंदा यांच्यासह श्वेताचा नवरा आणि मुलं देखील होती. मात्र यांच्यामध्ये ऐश्वर्या कुठेच नव्हती. पण थोड्यावेळाने ऐश्वर्याने तिची लेक आराध्यासह या लग्नात एन्ट्री घेतली आणि सगळ्यांचेच डोळे मोठे झाले.

बऱ्याच आधीपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या मीडियामध्ये येत होत्या. मात्र त्यावर कोणीही काहीच भाष्य केले नाही. यानंतर सतत त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येतच आहेत. यावर वैतागून अभिषेकने ते अजूनही एकत्रच असल्याचे पोस्ट करून सांगितले होते. पण तरीही मीडियामध्ये या बातम्या आणि नेटकऱ्यांमध्ये एक प्रश्न सतत समोर येतोय की, अभिषेक आणि ऐश्वर्या खरंच घटस्फोट घेताय का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

अभिषेकने नुकत्याच संपन्न झालेल्या पॅरिस ऑलम्पिकमध्ये हजेरी लावली आणि भारतीय खेळाडूंना पाठिंबा दिला. ही ऑलम्पिक स्पर्धा संपल्यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या संपूर्ण ट्रिपचा आणि स्पर्धांचा अनुभव शेअर केला आहे. सोबतच त्याने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, ज्यात त्याने वेगवेगळे फोटो एकत्र केले आहेत. आता त्याने केलेली ही पोस्ट चर्चेत येण्याचे कारणही तसे खास आहे. अभिषेकने ही पोस्ट तर केली मात्र त्याचे कमेंट सेक्शन त्याने बंद ठेवले आहे.

अर्थात अभिषेक बच्चनने पोस्ट तर केली मात्र त्यावर आपण फक्त लाइक आणि शेअर करू शकतो. कमेंट करू शकत नाही. त्यामुळेच त्याच्या या पोस्टची नेटकऱ्यांमध्ये अधिकच चर्चा रंगल्याचे चित्र आहे. लोकं पोस्टवर कमेंट्स करत फक्त त्याच्या आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाबद्दलच विचारत राहतील आणि त्यांना ट्रोल करतील. कदाचित याच उद्देशाने त्याने कमेंट सेक्शन बंद ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे.

======

हे देखील वाचा : विशाखा सुभेदार यांची ‘पॅडी’साठी भन्नाट पोस्ट

======

अभिषेकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पॅरिस ऑलम्पिक २०२४ मधील त्याचा अनुभव कथन एक क्लिप पोस्ट केली आहे. ज्यात त्याने सांगितले की, भाला फेक खेळातील खेळाडू नीरज चोप्राला लाईव्ह खेळताना बघणे खूपच सुखद होते. यासोबतच त्याने स्टेडियममधील काही फोटो, तिरंगा घेतलेल्या विजेत्या नीरजा चोप्राला मिठी मारतानाचे काही फोटो आणि काही आयफिल टॉवर जवळील फोटो पोस्ट केले आहेत.

हा व्हिडिओ शेअर करताना अभिषेकने लिहिले, “ओमेगामध्ये माझ्या मित्रांसोबत पॅरिस ऑलम्पिक २०२४ बघणे खूपच अवर्णनीय अनुभव होता. आम्ही १८ वर्षांपर्यंत सोबत काम केले आहे. त्यांचे वेळेचे नियोजन नेहमीच मला हैराण करते. संपूर्ण शहरामध्ये उत्साह अगदी सहजच दिसून येत होता, खासकरून स्टेडियममध्ये. आणि नंतर आपल्या नीरज चोप्राला खेळताना पाहण्याचे भाग्य मला मिल्ने म्हणजे सोन्याहून पिवळेच. स्टेडियममध्ये आपल्या तिरंग्याला बघणे खूपच अभिमानास्पद होते. असे वाटत होते स्वर्गच आहे.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...