Home गाजावाजा स्पेशल आधार कार्डला कोणता मोबाईल क्रमांक लिंक आहे हे असे शोधून काढा
गाजावाजा स्पेशल

आधार कार्डला कोणता मोबाईल क्रमांक लिंक आहे हे असे शोधून काढा

8
Aadhar Card Update
Aadhar Card Update

आजच्या काळात आधार कार्ड फार महत्त्वपूर्ण कागदपत्र बनले आहे. आता सर्वाधिक महत्त्वपूर्म आयडी ओळखपत्र म्हणून याचा स्विकार केला जात आहे. बँक खाते सुरु करणे ते शाळेत प्रवेश घेण्यासाठी हे अनिवार्य करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव आधार कार्ड मोबाईल क्रमांकाला लिंक असणे गरजेचे आहे. मात्र बहुतांश लोकांना हे माहिती नसते की, नक्की कोणत्या मोबाईल क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्यात आलेले आहे.

असे तेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक मोबाईल क्रमांक असतात. त्यांना लक्षात नसते की, नक्की कोणता क्रमांक आधार कार्डला लिंक करण्यात आलेला आहे. आधार कार्ड तयार करताना मोबाईल क्रमांक देणे सुद्धा गरजेचे आहे. जर तुम्ही नंतर मोबाईल क्रमांक बदलला असेल तर तुम्ही आधार कार्डवर अपडेट करू शकता. आधार कार्ड सोबत लिंक करण्यात आलेला मोबाईल क्रमांक लक्षात ठेवणे गरजेचे आहे. बहुतांश कामांसाठी जेव्हा ओटीपीची गरज भासते तेव्हा तो आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर येतो. (Aadhar card link)

असे शोधून काढा
जर तुम्हाला माहिती नसेल तुमचा कोणता क्रमांक आधार कार्ड सोबत लिंक आहे तर घाबरण्याची काहीच गरज नाही. तुम्ही अगदी सहज घरबसल्या तुमचा कोणता क्रमांक आधार कार्डला लिंक आहे हे शोधून काढू शकता.

-सर्वात प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
-येथे My Aadhar सेक्शनवर क्लिक करा
-येथे Aadhar Service ऑप्शनवर जा
-आधार सर्विसमध्ये वेरिफाय आधार क्रमांकावर क्लिक करा
-आता आपला 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाका
-कॅप्चा कोड व्यवस्थित टाका
-आता प्रोसेस्ड टू वेरिफायवर क्लिक करा
-असे केल्याने आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे तीन क्रमांक दिसतील
-जर तुमचा एखादा मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर हे क्रमांक दिसणार नाहीत (Aadhar card link)

चेक करू शकता हिस्ट्री
आधार कार्ड तयार करणारी संस्था UIDAI आधार कार्डची हिस्ट्री चेक करण्याची सुविधा देते. आधार हिस्ट्रीवरुन कळते की, एखाद्या व्यक्तीच्या आधार कार्डचा वापर कुठेकुठे करण्यात आला आहे. परंतु कोणत्या कागदत्रासोबत आधार कार्ड लिंक आहे मात्र कळत नाही. आधारच्या दुरुपयोगापासून दूर राहण्यासाठी युआयडीएआयने आधार हिस्ट्री जाणून घेण्याची सुविधा नागरिकांना दिली आहे. जेणेकरून वेळोवेळी ते याबद्दल तपासून पाहू शकता आणि एखादी गडबड असेल तर ती त्यांना कळू शकेल.


हेही वाचा- भारतातील स्टार्टअपला ‘या’ कारणास्तव परदेशी कंपन्या पैसे लावण्यास घाबरतायत

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....