Home राष्ट्रीय आधार कार्ड संदर्भात सरकारच्या नव्या गाइडलाइन्स जाहीर
राष्ट्रीय

आधार कार्ड संदर्भात सरकारच्या नव्या गाइडलाइन्स जाहीर

9
e-Signature
e-Signature

आधार कार्ड सध्या एका महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक झाले आहे. याची सर्व ठिकाणी गरज भासते. मात्र तुमचे आधार कार्ड जुने झाले असेल तर सावध व्हा. कारण सरकारकडून १० वर्ष जुन्या आधार कार्ड संबंधित नव्या गाइडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही या गाइडलाइन्सचे पालन केले नाही तर तुमचेच फार मोठे नुकसान होणार आहे. सरकारकडून १० वर्ष जुन्या आधार कार्डसाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. (Aadhar Card Guidelines)

१० वर्ष जुन्या आधार कार्डवर होणार परिणाम
आधार कार्ड १३ वर्षांपू्र्वी २९ सप्टेंबर २०१० रोजी जारी केले गेले होते. अशातच सरकारने १० वर्ष जुन्या सर्व आधार कार्ड धारकांना आपले आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितले आहे. तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील ओळखपत्र आणि पत्त्यासंबंधित माहिती पुन्हा अपडेट करावी लागणार आहे. ही एक वेरिफिकेशन प्रोसेस आहे. ज्याच्यामाध्यमातून तुमचे आधार कार्ड वॅलिड असल्याचे समजले जाऊ शकते.

आधार कार्डवर तुमच्या खासगी माहितीच्या रुपात तुमच्या डोळ्यांचे स्कॅनिंग, फिंगप्रिंट सारख्या महत्वाच्या गोष्टींचा समावेश असणार आहे. हा डेटा सरकारकडे सुरक्षित असतो. अशातच सरकारने आपला डेटा वेळोवेळी अपडेट करते. जेणेकरुन फसवणूकीच्या घटनांपासून दूर राहता येईल.

कसे कराल अपडेट
१० वर्ष जुने आधार कार्ड तुम्ही ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने अपडेट करु शकता. त्यासाठी तुम्हा २५ रुपये ते ५० रुपयांचा शुल्क द्यावा लागतो. आधार कार्डवर तुमचा मोबाईल क्रमांक, नाव आणि पत्ता अपडेट करावा लागणार आहे. (Aadhar Card Guidelines)

ऑनलाईन अपडेट कसे कराल?
सर्वाच प्रथम My Aadhar च्या वेबसाइटला भेट द्या. uidai.gov.in च्या वेबसाइटला जा. त्यानंतर माय आधार सेक्शनला भेट द्या, येथे गेल्यानंतर अपडेट माय आधार ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर १२ डिजिटचा आधार क्रमांक दाखल करावा लागेल. त्यानंतर रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. हा ओटीपी तु्म्हाला तेथे द्यावा लागेल. त्यानंत पत्ता अपडेट करण्याचा ऑप्शन मिळेल. आता नव्या पत्त्यास कागदपत्र सादर करावे लागती.त्यानंतर कॅप्चा कोड आणि ५० रुपयांचे पेमेंट करावे लागेल.

हे देखील वाचा- म्युचअल फंड्सच्या माध्यमातून सहज घेता येते कर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

या व्यतिरिक्त आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची अखेरची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. जर तो पर्यंत तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक केलेले नसेल तर पॅन कार्ड रद्द केले जाईल. पॅन कार्डची गरज विविध आर्थिक कामांसाठी भासते. डीमेट अकाउंट सुरु करणे अथवा बँकेत एक मोठी रक्कम जमा करण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड मागितले जाते. या व्यतिरिक्त आयकर भरण्यासाठी ही हे तुमच्या कामी येते. आधार कार्डच्या माध्यमातून तुमचे बायोमेट्रिक डेटा आणि फिंगर प्रिंट्स सरकारकडे अगदी सुरक्षित ठेवला जातो.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

S. L. Bhyrappa
राष्ट्रीय

S. L. Bhyrappa : ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा यांचे निधन

साहित्यविश्वातून एक दुःखद बातमी येत आहे. प्रसिद्ध कादंबरीकार आणि लेखक एस.एल. भैरप्पा...

Stray Dogs
राष्ट्रीयराष्ट्रीय

Stray Dogs : दिल्ली सरकारला सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांबाबत दिला मोठा आदेश

सध्या देशातील दोन महानगरांमधील कबुतरं आणि कुत्रे हे दोन मुद्दे देशभर कमालीचे...

Independence Day | Todays Marathi News
राष्ट्रीयराष्ट्रीय

Independence Day : स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी ‘असे’ करा बुकिंग

येत्या काही दिवसातच आपण आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. १५...

AirForce
राष्ट्रीयराष्ट्रीय

AirForce : 62 वर्षांच्या सेवेनंतर Mig-21 होणार निवृत्त

कायमच भारताच्या संरक्षण दलाची संपूर्ण जगात चर्चा होताना दिसते. भारत कायमच आपली...