मुंबई… भारतातलं एक गजबजलेलं शहर, महाराष्ट्राची राजधानी, आणि सर्वांची स्वप्ननगरी. इथे कोणीच उपाशी राहत नाहीत असं म्हणतात. इथे आलेल्या प्रत्येक मेहनती व्यक्तीला काम मिळतच असं म्हणतात. पूर्वी बॉम्बे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शहराचं मुंबई नाव कस झालं आणि ही मुंबई संयुक्त महाराष्ट्र चळवळी नंतर महाराष्ट्राचा अविभाज्य घटक कशी झाली याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. पण आपली हीच जिवाभावाची मुंबई एकेकाळी हुंड्यात दिली गेली होती हे तुम्हाला माहितेय का ? याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. (Mumbai History)
मुंबईचा इतिहास समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. याच आपल्या मुंबईवर मौर्य, पोर्तुगीज आणि ब्रिटिश अशा अनेक शासकांनी आणि साम्राज्यांनी नियंत्रण ठेवलं. पण मुंबई ही मूळ कोळी लोकांचीच होती, हे सगळ्यांनाच माहित आहे. त्याच दरम्यानची ही गोष्ट आहे साधारण १५३४ ची! तेव्हा मुंबई आजच्यासारखी महानगरी नव्हती. मुंबईवर पोर्तुगीजांच राज्य होतं. तेव्हा गुजरात सल्तनतच्या राजा बहादुर शाहकडून एका करारावर मुंबई ही पोर्तुगीजांनी मिळवली होती. मुंबई ही मुळात फक्त सात बेटांचा एक भाग होती. या बेटांना पोर्तुगीज लोकांनी बरीच नावं दिली होती. यातळ्याचं एका बेटाचं नाव होत बॉम्बेम.

ह्याच नावाचं पुढे बॉम्बे आणि शेवटी मुंबई बनलं. या बेटा भोवती त्यांनी बरीच तटबंदी त्या काळात केली होती. किल्ले बांधले, चर्च बांधली. पण पोर्तुगीज लोक मुंबईच्या या साम्राज्याला फार काळ टिकवून ठेवू शकले नाही. कारण नोव्हेंबर १५८३ मध्ये ब्रिटिश व्यापारी पहिल्यांदा भारतात आले. त्यांना व्यापार आणि भौगोलिक दृष्ट्या मुंबई हे शहर फार महत्त्वाचं वाटलं. पुढे १६१२ मध्ये ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्यात सुरतमध्ये मुंबई वर ताबा मिळवण्यासाठी लढाई झाली. या लढाई मध्ये पोर्तुगीजांचं व्यापारात वर्चस्व सिद्ध झालं. कालांतराने, इंग्रज व्यापा-यांनी हे वर्चस्व मोडलं आणि स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं. (Top Stories)
फिर आया कहानी मे ट्विस्ट ! १६६१ मध्ये पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीन ब्रिगांझा आणि इंग्लंडचा प्रिन्स चार्ल्स २ ट्युडर मोनार्क यांचा विवाह झाला आणि याच विवाहात पोर्तुगीज राज्यकत्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांना हुंडा म्हणून दिली होती मुंबई! मुंबई मिळाल्यामुळे ते खुश झाले पण आपली जबाबदारी त्यांना आणखी वाढवायची नव्हती हा पण मुंबईसुद्धा हातून जाऊ द्यायची नव्हती. यावर त्यांनी एक शक्कल काढली. त्याने मुंबईचा प्रांत त्याकाळी भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वावर चालवण्यासाठी दिला. या बदल्यात ईस्ट इंडिया कंपनीने प्रिन्स चार्ल्स २ याला वार्षिक १० पाउंड इतक्या किमतीचं सोनं देण्याचा करार केला. अशाप्रकारे आपली मुंबई त्याकाळी ब्रिटिश राज्यकर्त्यांकडे गेली. (Mumbai History)
================
हे देखील वाचा : Reza Pahlavi : इस्रायल-इराण युद्धात राजकुमाराची एन्ट्री !
=================
पुढे १६६८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी पूर्णपणे भारतात आली. जेराल्ड अंजिअर हे मुंबईचे पहिले गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले होते. त्यांनी पहिलं वेअरहाऊस बांधलं, १६६९ मध्ये सायनचा किल्ला बांधला आणि तिथून पुढे मुंबईचा प्रगतीचा प्रवास सुरु झाला. मुंबईचा इतर भाग १७४० पर्यंत पोर्तुगीजांकडे होता आणि त्यानंतर मराठा सैन्याने तो त्यांच्याकडून जिंकला होता. आणि त्यानंतर ती खऱ्या अर्थाने एकसंध होण्याच्या दिशेने निघाली.थोडक्यात आपल्या या मुंबईने प्रत्येकाला सामावून घेतलं पोर्तुगीस, ब्रिटिश, मराठे आणि आज खुद्द आपण ! आपल्या लाडक्या मुंबईची सिनेमॅटिक वाटावी अशी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हला कंमेंट करून नक्की सांगा!
- Bombay name origin
- Bombay to Mumbai
- British Empire India
- britishers vs portuguese
- Catherine of Braganza
- cinematic storytelling
- Dowry System in India
- east india company
- Gerald Aungier
- Hidden Mumbai facts
- hidden story of mumbai
- historical Mumbai
- Indian history reels
- Maharashtra capital
- maratha empire
- Mumbai 7 islands
- Mumbai dowry story
- Mumbai history
- Mumbai origin
- Mumbai past
- mumbai story
- Mumbai untold story
- Portuguese in India
- Prince Charles II