Home गाजावाजा स्पेशल उधार मागितलेल्या ‘या’ गोष्टींमुळे तुमच्या यशाचे मार्ग बंद होतात का?
गाजावाजा स्पेशल

उधार मागितलेल्या ‘या’ गोष्टींमुळे तुमच्या यशाचे मार्ग बंद होतात का?

10
Unlucky things
Unlucky things

Unlucky things- जेव्हा आपण काही लिहित असतो तेव्हा आपलं पेन अचानक काम करणं बंद करतो तेव्हा आपण बाजूला बसलेल्या व्यक्तीकडून पेन मागते. ही गोष्ट आपण अन्य बाबतीत ही करतो. मात्र ज्योतिष शास्रानुसार काही गोष्टी उधार मागितलेल्या आपल्या आयुष्यासाठी योग्य नसतात. त्या मागितल्याने तुमचे काम तर पूर्ण होईल, पण आयुष्यात समस्यांचा काळ सुरु होईल. त्यामुळे आपण जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कधीच कोणाकडे उधार मागू नयेत. जेणेकरुन तुमच्या नशीबात नेहमीच समस्या आणि अडचणी येतील.

-फुटवेअर्स
सध्या आपल्या कपड्यांना शोभतील असे फूटवेअर्स घालण्याचा ट्रेंन्ड आहे.काही वेळेस आपण आपल्या ड्रेसला मिळतेजुळते फुटवेअर्स घालण्यासाठी आपल्या बहिण, मित्र-मैत्रीणींकडून मागून घेतो. पण शास्रात शनिचे स्थान पायांमध्ये असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शरिराचे सर्व संघर्ष हे पायाच्या ठिकाणी येतात. अशातच दुसऱ्यांकडून मागून घेतलेले फुटवेअर्स घातल्यास आपण त्यांच्या समस्या आपल्यावर ओढावून घेतो. या व्यतिरिक्त दुसऱ्यांच्या चप्पल घातल्याने तुमच्या जीवनात दारिद्र सुद्धा येऊ शकते.

-अंगठी
काही वेळेस आपण अंगठी सुद्धा दुसऱ्यांकडून मागून घालतो. ती कोणतीही असो. परंतु दुसऱ्यांकडून मागून घेतलेली अंगठी घातल्यास तुमच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव टाकते. यामुळे घरात आर्थिक समस्या ही उद्भवतात. काही संकटांचा सामना सुद्धा करावा लागू शकतो.

हे देखील वाचा- घरात कधीच ठेवू नका ‘या’ गोष्टी अन्यथा आर्थिक संकटाला बळी पडाल

Unlucky things
Unlucky things

-पेन
आपण लिहित असताना पेन बंद पडल्यास दुसरे विकत घ्या किंवा आपल्याकडे एक्स्ट्रा पेन ठेवा. पण दुसऱ्यांकडून पेन मागून घेत त्याने लिहू नका. त्यामुळे तुमच्या प्रगतीत बाधा येऊ शकते.(Unlucky things)

-कपडे
कपडे अशी एक गोष्ट आहे जी आपण नेहमीच घालतो. परंतु प्रत्येकामध्ये एक स्वत:ची एनर्जी असतो. अशातच जर तुम्ही दुसऱ्यांचे कपडे घातल्यास त्यांची एनर्जी तुमच्या एनर्जीला मिळते. यामुळे तुमचे नशीब धोक्यात येऊ शकते. या व्यतिरिक्त दुसऱ्यांच्या कपड्यांमुळे तु्म्हाला स्किन इंफेक्शन किंवा अॅलर्जी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे अत्यंत गरज भासल्यास असे कपडे घाला जे गरम पाण्यात धुतले असतील. दुसऱ्यांकडे कपडे मागण्यापासून दूरच रहा.

-घड्याळ
घड्याळ आणि नशीब हे एकत्रित जोडले जाते. त्यामुळे दुसऱ्यांकडून मागून घड्याळ घेतले आणि ते आपण घातल्यास त्याचा तुमच्या नशीबावर प्रभाव पडू शकतो. आपल्याला माहिती नसते समोरच्या व्यक्तीचे नशीब किती चांगले आहे की वाईट. अशातच त्या व्यक्तीचे नशीब वाईट असेल आणि त्याच्याच कडून मागून तुम्ही घड्याळ घातल्यास त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर ही पडू शकतो. त्यामुळेच कधीच दुसऱ्यांकडून घड्याळ मागून घालू नका.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....