Home मनोरंजन जागरणात भजनं गायची नेहा कक्कर, आज एका गाण्यासाठी घेते ‘इतकं’ भलंमोठं मानधन
मनोरंजनव्यक्ती विशेष

जागरणात भजनं गायची नेहा कक्कर, आज एका गाण्यासाठी घेते ‘इतकं’ भलंमोठं मानधन

9

बॉलिवूडची टॉपची पार्श्वगायिका नेहा कक्करच्या आवाजाचे चाहत्यांना वेड लागले आहे. नेहा कक्करची गाणी जवळपास प्रत्येक पार्टीला चार चांद लावतात. पण तुम्हाला माहितीये का, की नेहा कक्करचा आतापर्यंतचा प्रवास किती संघर्षांनी भरलेला आहे. लहान वयात भजने गाणारी नेहा कक्कर एका सिंगिंग रियॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती, तरीही विजय तिच्या नशिबात नव्हता. पण बॉलिवूडमध्ये टॉपला पोहोचणे तिच्या नशिबी होते. नेहाने कधीही हार मानली नाही आणि एक एक पाऊल पुढे टाकत यशाचे शिखर गाठले. रोमँटिक गाण्यांपासून ते आयटम नंबरपर्यंत, नेहा कक्करचा आवाज पसंत केला जातो. (Neha Kakkar lifestyle)

चित्रपटांमध्ये गाण्यासोबतच, नेहा कक्कर भाऊ टोनी कक्करसोबत म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसते. नेहा अनेकदा टीव्हीवर अनेक रियॅलिटी शोला जज करताना दिसते. ही बबली गर्ल आजच्या काळात टॉप गायकांमध्ये सामील झाली आहे. आज नेहा कक्करची कमाई, नेट वर्थ आणि तिच्या लक्झरी लाइफस्टाइलबद्दल सर्वकाही जाणून घेऊया.

नेहा कक्करचे आलिशान घर 

नेहा कक्कर उत्तराखंडमधील ऋषिकेशची आहे, मात्र तिचे कुटुंब संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आले होते. आज नेहा कक्कर मुंबईच्या प्राइम लोकलमध्ये राहते. येथे पॅनोरमा टॉवरमध्ये तिचा एक आलिशान फ्लॅट आहे. रिपोर्ट्सनुसार, नेहाच्या घराची किंमत जवळपास १.२ कोटी रुपये आहे. (Neha Kakkar lifestyle)

नेहा कक्करचे कार कलेक्शन 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायिका नेहा कक्करचे आजच्या प्रत्येक १२व्या चित्रपटात एक गाणे आहे. या यशामुळे नेहाची जीवनशैलीही आलिशान बनली आहे. नेहा कक्करकडे करोडोच्या आलिशान गाड्या आहेत. तिच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी क्यू ७, बीएमडब्ल्यू इत्यादी गाड्या आहेत. (Neha Kakkar lifestyle)

हे देखील वाचा: सलमान खानची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या एका चित्रपटासाठी किती पैसे घेतो अभिनेता

नेहा कक्करची कमाई 

गायिका नेहा कक्कर चित्रपट, म्युझिक व्हिडिओ, रियॅलिटी शो आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून भरपूर कमाई करते. ती एका रियॅलिटी शोमध्ये जज म्हणून २० लाखांपेक्षा जास्त फी घेते. त्याचवेळी नेहा कक्कर चित्रपटातील एका गाण्यासाठी जवळपास २५ लाख रुपये घेते. एवढेच नाही, तर नेहा स्टेज शोमध्येही परफॉर्म करते. ती एका शोमध्ये प्रति तास २० ते २५ लाख रुपये घेते. (Neha Kakkar lifestyle)

नेहा कक्करची संपत्ती

नेहा कक्करच्या नेट वर्थबद्दल बोलायचे झाले, तर वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून संगीतात सामील झालेल्या नेहा कक्करने लहान वयातच बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत गायकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नेहाची एकूण संपत्ती सुमारे ५ मिलियन डॉलर आहे. नेहा कक्कर भारतीय चलनात सुमारे ३८ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. ती महिन्याला ३० लाख रुपये कमवते, तर नेहा कक्करचे वार्षिक उत्पन्न ३.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. (Neha Kakkar lifestyle)

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...