Home प्रेस रिलीझ ‘वाय’ या ‘मल्टि-स्टारर’ थरारपटाचे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेस रिलीझ

‘वाय’ या ‘मल्टि-स्टारर’ थरारपटाचे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला

10
Y

अजित सूर्यकांत वाडीकर लिखित व दिग्दर्शित ‘वाय’ (Y) हा सिनेमा येत्या २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून, मराठीत पहिल्यांदाच असा हायपरलिंक थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या पोस्टरपासूनच खरंतर या चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

अनेक चित्रपटगृहांमध्ये दिसणाऱ्या स्टँडीज मुळेही ‘वाय’ या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. सुरुवातीला फक्त मुक्ता बर्वेचाच चेहरा समोर आल्यानंतर पडद्याआड असलेले चित्रपटातील इतर कलाकारही आता समोर आले आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘वाय’ या चित्रपटाचे एक टिझर झळकले होते. त्यात चित्रपटातील सर्व अभिनेत्रींचे दर्शन घडले होते. एकाच वेळी वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडमोडींची एक धावती झलक यात दिसली होती. यात मुक्ता बर्वे व्यतिरिक्त प्राजक्ता माळी, रसिका चव्हाण प्रमुख भूमिकेत असल्याचे दिसून आले होते.

====

हे देखील वाचा: यश आणि नेहावर चढला हळदीचा रंग, पाहा फोटो

====

या टिझरला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटाचा दुसरा टिझर प्रदर्शित झाला आहे. ‘वाय ‘ चित्रपटाच्या या दुसऱ्या टिझर मधून चित्रपटातील अभिनेतेही आता प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. यात नंदू माधव, संदीप पाठक, ओमकार गोवर्धन, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले, रोहित कोकाटे, संदीप दंडवते हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘वाय’ मधील सर्व चेहरे आता गुलदस्त्याबाहेर आल्यामुळे 13 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलर बद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...