Home प्रेस रिलीझ ‘फनरल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेस रिलीझ

‘फनरल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

7
Funral

आपण खूप आशा अपेक्षा घेऊन जगतो. खूप काही मिळावं म्हणून धावपळ करतो, ते ‘खूप काही’ मिळाल्यावर चार घटका निवांत जातील म्हणून परत धडपड करतो आणि मग खूप धडपड केल्यावर काहीतरी मिळाल्यावर “अरेच्चा जगायचं तर राहूनच गेलं ! हे लक्षात येतं पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आज जगण्याचा उत्सव व्हावा आणि मरणाचा सोहळा व्हावा अशी परिस्थिती किती अभावाने दिसते.

आयुष्य जगलो, यापेक्षा ते कशा पद्धतीने जगलो हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा विचार देत जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंट’ प्रस्तुत ‘फनरल’ (Funral) हा मराठी चित्रपट १० जूनला चित्रपटगृहांत येत आहे.

सिनेसृष्टीची पार्श्वभूमी नसलेल्या लेखक-निर्माते रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीनं एक छान सामाजिक कथा ‘फनरल’ चित्रपट रूपात मांडली आहे. आयुष्याकडे बघण्याचा अगदी वेगळा विचार घेऊन आलेल्या ‘फनरल’ चित्रपटात आरोह वेलणकर, तन्वी बर्वे, विजय केंकरे, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, हर्षद शिंदे, पार्थ घाटगे, सिद्धेश पुजारे यांच्या भूमिका आहेत.

नुकताच ‘फनरल’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर अनावरण सोहळा कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात स्थैर्यासाठी धडपडणाऱ्या ध्येयवादी हिरा या युवकाची ही गोष्ट आहे. सोबत सदा, सूर्या आणि विनोद हे त्याचे मित्रही आहेत. प्रयत्न करुनही योग्य ती नोकरी, व्यवसाय मिळत नसल्याने कुटुंबाकडून, समाजाकडून होणाऱ्या सततच्या अवहेलनाला कंटाळून हे सगळे एक जगावेगळा व्यवसाय निवडतात.

====

हे देखील वाचा: ऐतिहासिक सिनेमा शेर शिवराज आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध

====

आनंदासाठी, समाधानासाठी आयुष्यभर झटणाऱ्या माणसांचा शेवटही आनंददायी व्हावा यासाठी ते प्रयत्न करतात. त्यात त्यांना यश मिळतं का? खरंच आयुष्याचा शेवट गोड होऊ शकतो का? या सगळ्याची उत्तर ‘फनरल’ चित्रपट देणार आहे. वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नाव कोरणारा हा चित्रपट नक्कीच वेगळा विचार देऊन जातो.

या वेळी बोलताना लेखक-निर्माते रमेश दिघे सांगतात, ‘आपण आनंद शोधत त्यातली गंमत अनुभवणं हे प्रत्येकाने करायला हवं तेच सांगण्याचा प्रयत्न ‘फनरल’ चित्रपटात करण्यात आला आहे. मला असं वाटतं लोकांनी या चित्रपटाविषयी एकमेकांना सांगावे व अधिकाधिक लोकांनी हा चित्रपट पहावा’. अभिनेता आरोह वेलणकरने याप्रसंगी सांगितलं, ‘माझी यातील भूमिका आणि हा चित्रपट प्रत्येकाला खूप काही देईल’.

‘माझ्या वाटयाला ही भूमिका आली त्याबद्दल मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो’. ‘प्रत्येकाचं आयुष्य कशा पद्धतीने सुंदर आणि सकारात्मक होऊ शकतं याचा महत्त्वाचा संदेश देणारा हा चित्रपट पाहून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा एक वेगळा विचार घेऊन नक्कीच बाहेर पडाल, अशी मी खात्री देतो असं दिग्दर्शक विवेक दुबे यांनी सांगितलं.

‘फनरल’ चित्रपटाचे संकलन निलेश गावंड तर छायांकन अनुराग सोळंकी यांनी केले आहे. कलादिग्दर्शन मनोहर जाधव आणि महेश साळगांवकर यांचे आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत अद्वैत नेमळेकर तर साऊंडची जबाबदारी सूर्या मुकादम आणि गंधार मोकाशी यांनी सांभाळली आहे.

====

हे देखील वाचा: २२ जुलैला भेटीला येणार ‘अनन्या’

====

क्रीएटीव्ह दिग्दर्शक रमेश दिघे आणि श्रीपाद जोशी आहेत. असोशिएट निर्माते प्रदीप दिघे आहेत. कार्यकारी निर्माते प्रसाद पांचाळ तर सहाय्यक निर्माते विश्वास भोर व सचिन ढमाले आहेत. सहाय्यक दिग्दर्शक दीप व्यास तर चीफ सहाय्यक दिग्दर्शक डॉ. गिरीश मोगली आहेत. सन्मानाने जगणाऱ्यांना हसत हसत विचार करायला भाग पाडणारा ‘फनरल’ १० जूनला राज्यभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...