Home प्रेस रिलीझ 15 जुलैला झळकणार ‘तमाशा लाईव्ह’
प्रेस रिलीझ

15 जुलैला झळकणार ‘तमाशा लाईव्ह’

9
Tamasha Live

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चे (Tamasha Live) जबरदस्त टिझर सोशल मीडियावर झळकले होते. टिझरने चित्रपटाविषयीची उत्सुकता इतकी वाढवली की, प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहू लागले. मात्र आता ‘तमाशा लाईव्ह’साठी प्रेक्षकांना जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण येत्या 15 जुलै रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ टिझरला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता आम्ही हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तमाशा लाईव्ह’म्हणजे प्रेक्षकांसाठी सांगितिक मेजवानी आहे. आपली लोककला जपत त्याला आधुनिकतेचा साज देण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.’’

प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘तमाशा लाईव्ह’ची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केला असून सौम्या विळेकर, डॅा. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्माते आहेत. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची आहे.

====

हे देखील वाचा: अखेर तो क्षण आलाच, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत संपन्न होणार नेहा आणि यशाचा साखरपुडा

====

तर या चित्रपटाला अरविंद जगताप यांचे संवाद लाभले असून कथा विस्तार किरण यज्ञोपवित यांनी केला आहे. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या चित्रपटातील गाण्यांना क्षितीज पटवर्धन यांनी बोल दिले आहेत. ‘तमाशा लाईव्ह’मघ्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे आणि भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...