Home मनोरंजन करण जोहरच्या पार्टीत ब्रालेटवर ब्लेझर घालून आलेल्या मलायकाला नेटकऱ्यांनी केले ट्रोल 
मनोरंजन

करण जोहरच्या पार्टीत ब्रालेटवर ब्लेझर घालून आलेल्या मलायकाला नेटकऱ्यांनी केले ट्रोल 

9
Malaika Arora
Malaika Arora

सध्या मीडिया, सोशल मीडिया आणि बॉलिवूडमध्ये फक्त आणि फक्त एकच चर्चा चालू आहे आणि ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची. अतिशय आलिशान आणि जंगी अशा या पार्टीत बॉलिवूडच्या आणि टेलिव्हिजनविश्वातल्या अनेक लहान मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अगदी एकता कपूरपासून ते सलमान खान, आमिर खान पर्यंत सर्वच दिग्गज मंडळींनी या पार्टीची शान वाढवली.  या पार्टीला आलेल्या सर्वच कलाकारांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रत्येक कलाकारांचा अंदाज, वेशभूषा आणि स्टाईल सध्या गाजत असताना अनेक कलाकार विविध कारणामुळे ट्रोल देखील होताना दिसत आहे. (Malaika Arora)

या ट्रोल होणाऱ्या सेलेब्रिटींमध्ये सर्वात वरचा नंबर लागला तो अभिनेत्री आणि डान्सर असणाऱ्या मलायका अरोराचा. नेहमीच आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे आणि फॅशनमुळे गाजणाऱ्या मलायकाला आता मात्र तिच्या कपड्यांवरूनच ट्रोल केले जात आहे. झाले असे की करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मलायकाने(Malaika Arora) जो ड्रेस घातला होता तो ड्रेस नेटकऱ्यांना काही आवडला नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तसे पाहिले तर मलायका स्टाईल आणि फॅशन दिवा  म्हणून ओळखली जाते मात्र या पार्टीमध्ये मलायकाचा फॅशन सेन्स जर गडबडलेला दिसला. (Malaika Arora)

या पार्टीमध्ये मलायका खूपच बोल्ड अंदाजात पोहचली. तिने यावेळी नियॉनचे हिरव्या रंगाचे ब्लेझर आणि शॉर्ट्स घातले होते, तिने तिचा हा लूक गुलाबी रंगाच्या ब्रालेटने पूर्ण केला होता. तिचे ब्लेझर पूर्णपणे रिव्हिलिंग होते. सोबत तिने एक सिल्वर रंगाची पर्स देखील कॅरी केली होती. सध्या सोशल मीडियावर मलायकाच्या याच लूकची चर्चा होताना दिसत आहे. या पार्टीमध्ये मलायका तिची बहीण अमृता अरोरा आणि मैत्रीण करीना कपूर खानसोबत पोहचली होती. या तिघींसोबत सैफ अली खानदेखील दिसला. मलायकाच्या या लूकवरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करताना वल्गर देखील म्हटले आहे. एका युजरने तिच्या या लूकवर कमेंट करताना लिहिले, ‘बहुतेक ती टॉप घालायला विसरली आहे’ तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘कपड्यांचे सर्वात वाईट सिलेक्शन.’ आदी अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी मलायकावर टीका केली आहे.(Malaika Arora)

हे पहिल्यांदाच नाही की मलायकाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले जाते याआधी देखील अनेक वेळा तिला कपड्यांवरून किंवा तिच्या संपूर्ण लूकवरून ट्रोल केले गेले आहे. कपडेच काय मलायकाला तर तिच्या वैयक्तिक जीवनावरून देखील ट्रोल केले गेले. अर्जुन कपूरला डेट करण्यावरून देखील तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले होते. (Malaika Arora)

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...