Home मनोरंजन तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी, दया भाभी पुन्हा झाली आई 
मनोरंजन

तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी, दया भाभी पुन्हा झाली आई 

10
Disha vakani
Disha vakani

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वत मोठा आणि लोकप्रिय शो म्हणून सर्वांच्याच डोक्यात पहिले नाव येते ते तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेचे. या मालिकेने मागील १३ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली असून, आता या मालिकेतील पात्रांना त्यांच्या ओळखीपेक्षा जास्त मालिकेतील नावानेच ओळखले जाते. ही मालिका मागील अनेक वर्षांपासून सतत लोकांचे मनोरंजन करणारी ही मालिका नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय बनत असते. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकाणी(Disha vakani) अर्थात दया भाभी मागील काही वर्षांपासून मालिकेत दिसत नाही. दया भाभी पुन्हा येणार अशा अनेक बातम्या आजपर्यंत आल्या. दिशा प्रेग्नेंट असल्यामुळे तिने काही वर्षांपूर्वी मालिका सोडली आणि त्यानंतर ती तिच्या मुलीच्या संगोपनात व्यस्त झाली मात्र आता तिच्याबाबत पुन्हा एक बातमी येत आहे.(Disha vakani)

दिशा वाकाणीच्या(Disha vakani) घरी पुन्हा एकदा नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. दिशाने काही दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिल्याचे नुकतेच समजले आहे. दिशाने मुलाला जन्म दिल्याचे तिचे पती असलेल्या मयूर पारख आणि भाऊ असलेल्या मयूर वाकाणी यांनी सांगितले आहे. नुकतेच मयूर वाकाणीने एका मुलाखतीदरम्यान त्याचा आनंद व्यक्त करत सांगितले की, “२०१७ साली दिशाने मुलीला जन्म दिला आणि मी मामा झालो. आता पुन्हा एकदा मामा झाल्यामुळे मला अतीव आनंद झाला आहे.”मयूर वाकाणी तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत सुंदरलाल या भूमिकेत दिसतो. 

दिशा वाकाणीचा(Disha vakani) डिसेंबरमध्ये एका फॅमिली फंक्शनमधला तिच्या पतीसोबतचा मयूर पारेखसोबतचा  एक फोटो खूपच व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये दिशांचे बेबी बंप दिसत असल्यामुळे तिचा हा फोटो तुफान गाजला. त्यामुळे ती पुन्हा प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या देखील मीडियामध्ये आल्या. मात्र या बातम्यांवर दिशा किंवा तिच्या कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती आली नव्हती. त्यामुळे अनेकांनी हा फोटो तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीचा असावा असा अंदाज बांधला होता. मात्र आता ही नवीन गोड बातमी आल्यानंतर सर्वांना समजले की दिशाचा तो फोटो दुसऱ्या प्रेग्नन्सीचाच होता. 

दिशा वाकाणी(Disha vakani) २०१७ सालापासून तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेपासून लांब आहे. २०१७ साली दिशाने मॅटर्निटी सुट्टी घेतली तशी ती मालिकेत दिसलीच नाही. २०१९ साली तिला एका छोट्याच्या काही मिनिटांच्या सीनमध्ये पाहण्यात आले होते. मात्र त्यानंतर दिशा शोमध्ये परतली नाही. आता दोन बाळांची जबाबदारी असलेली दिशा पुन्हा शोमध्ये कधी दिसेल याबद्दल सर्वांनाच प्रश्न आहे. मात्र दिशाला शोमध्ये बघण्यासाठी तिच्या आणि मालिकेच्या चाहत्यांना अधिक काळ वाट पाहावी लागेल हे नक्की. 

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...