Home मनोरंजन लॉकडाऊनमध्ये कमल हसन यांच्या पूर्व पत्नी असलेल्या सारिका यांना करावा लागला होता आर्थिक तंगीचा सामना
मनोरंजनसामाजिक

लॉकडाऊनमध्ये कमल हसन यांच्या पूर्व पत्नी असलेल्या सारिका यांना करावा लागला होता आर्थिक तंगीचा सामना

11
sarika
sarika

२०२० साल उजाडले आणि या वर्षाने सर्वांनाच एक वेगळेच जग दाखवले आणि एका भयानक परिस्थितीशी ओळख करून दिली. याच वर्षात कोरोना नावाच्या महामारीने आपल्या आयुष्यात प्रवेश केला आणि सगळ्यांचे जीवन केवळ घर नावाच्या चार भितींच्या कैदेत सीमित झाले. कोरोनामुळे सर्वांचे कामधंदे बंद झाले आणि सर्वच माणसं घरात अडकली याला कलाकार देखील अपवाद नव्हते. या परिस्थितीमध्ये अनेकांच्या कामधंद्यावर गदा आली. अनेक कलाकारांना कामं मिळणे बंद झाल्याने त्यांची देखील आर्थिक परिस्थिती खराब झाली. यादीत अनेक मोठमोठ्या कलाकारांची नावे सामील आहेत. यातील एक मोठे नाव म्हणजे अभिनेत्री सारिका(sarika). 

जुन्या काळातील अतिशय सुंदर, प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळख मिळवलेल्या आणि कमल हसन यांची पहिली पत्नी असलेल्या सारिका(sarika)यांनी देखील लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकटांचा सामना केला. याबद्दल खुद्द त्यांनीच एका मुलाखतीमध्ये खुलासा केला. नुकतीच सारिका यांनी एक मुलाखत दिली असून, या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींवर त्यांनी भाष्य केले. त्यांनी सहन केलेल्या आर्थिक संकटाबद्दल त्या म्हणाल्या, “मला एका वेळी असे वाटत होते की, मी माझे आयुष्य वाया घालवत आहे. रोज सकाळी आपण उठतो आणि आपल्या मनासारखे काही घडले नाही तर आपण पुन्हा झोपून जातो. मी एक वर्ष ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आणि मी काहीच काम नाही केले. मी दुसरीकडे कुठे जाऊन वेगळे काही करू इच्छित होती. मात्र नेमके तेव्हाच लॉकडाऊन लागले आणि माझे पैसे संपून गेले. मी कुठे जाणार? मला अभिनयच करावा लागला. कारण थिएटरमध्ये २००० ते २७०० रुपयेच मिळत होते आणि या पैशात तुम्ही काहीच करू शकत नाही. तसे तर मी थियेटर करण्याचा निर्णय लॉकडाउनच्या आधी घेतला होता. मी विचार केला मी एक वर्ष थियेटर करेन पण मी पाच वर्ष केले.”

(courtsy instagram)

सारिका (sarika) यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचे संपूर्ण कुटुंबच चित्रपट क्षेत्राशी जोडले गेले आहे. सुपरस्टार कमल हसन यांची पहिली पत्नी, अभिनेत्री श्रुती आणि अक्षरा हसन यांची आई असलेल्या सारिका यांनी स्वतःची एक वेगळी निर्माण केली होती. लहानपणापासूनच त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. कमी वयात वडील गमवल्यामुळे त्यांच्यावर घराची जबाबदारी आली आणि त्यांनी काम सुरु केले. काही काळाने यश मिळायला लागल्यावर आईशी न पटल्यामुळे त्यांनी त्यांचे घर सोडले आणि त्या चेन्नईमध्ये आल्या इथेच त्यांची ओळख कमल हसन यांच्याशी झाली आणि त्यांच्यात प्रेम खुलले काही काळ लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर सारिका (sarika) यांनी श्रुतीला जन्म दिला आणि नंतर त्या दोघांनी लग्न केले. पुढे त्यांच्या दुसऱ्या मुलीचा अक्षराचा जन्म झाला.  मात्र यानंतर त्यांच्यात काही बिनसले आणि ते वेगळे झाले. 

सारिका (sarika) यांच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, त्या लवकरच अलंकृता श्रीवास्तव यांच्या anthology सीरीजमध्ये दिसणार असून, त्यांच्यासोबत यात दानेश रिजवी आणि एहसास चन्ना देखील असणार आहेत. सोबतच येत्या १३ मेला त्यांची Modern Love: Mumbai ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. याशिवाय त्या सूरज बडजात्या यांच्या ‘उंचाई’ या सिनेमात अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, अनुपम खेर, बोमन ईरानी आदी कलाकारांसोबत झळकणार आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Devark Mandir
सामाजिक

Devark Mandir : या सूर्यमंदिरापुढे औरंगजेबानंही मानली हार !

देशभर सध्या छटपूजा उत्साहात सुरु आहे. छठ पूजेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Uttarakhand
सामाजिक

Uttarakhand : येथे दिवाळी नंतर साजरी होते, बुधी दिवाळी !

दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. दिव्यांच्या या सणाला प्रत्येक घरासमोर दिव्यांची...