Home मनोरंजन खरंच हिमेशच्या दुसऱ्या पत्नीमुळेच झाला होता का त्याच्या पहिला घटस्फोट? जाणून घ्या हिमेशच्या दोन्ही लग्नाबद्दल
मनोरंजन

खरंच हिमेशच्या दुसऱ्या पत्नीमुळेच झाला होता का त्याच्या पहिला घटस्फोट? जाणून घ्या हिमेशच्या दोन्ही लग्नाबद्दल

12
Himesh Reshammiya
Himesh Reshammiya

बॉलिवूडमधून नेहमीच घटस्फोट, ब्रेकअप असे शब्द ऐकायला मिळतात. सामान्य लोकांसाठी अतिशय भयानक आणि त्रासदायक असणारे हे शब्द कलाकारांसाठी मात्र खूपच नॉर्मल समजले जातात. ‘कितने अजीब रिश्ते है यहा पे’ ही ओळ या सेलेब्रिटी लोकांचे आयुष्य बघून आपल्याला अगदीच योग्य वाटते. आज या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा घटस्फोट होऊन त्यांनी दुसऱ्यांदा पुन्हा नव्याने त्यांचा संसार थाटला. असाच एक सेलिब्रिटी गायक, संगीतकार म्हणजे हिमेश रेशमिया. हिमेशने त्याच्या संगीताने आणि त्याच्या हटके आवाजाने इंडस्ट्रीमध्ये आणि लोकांमध्ये त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली. हिमेशचे गाणे, म्युझिक अल्बम म्हटल्यावर तो गाजणार हे गृहीतच धरलेले असायचे. हिमेशचे गाणे, संगीत जेवढे गाजले तेवढीच त्याचे वैयक्तिक जीवन देखील चर्चेचा विषय ठरला. हिमेशचे २२ वर्ष जुने पहिलं लग्न मोडल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. हिमेशने नुकताच त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. जाणून घेऊया हिमेश आणि त्याच्या दोन्ही लग्नाबद्दल. (Himesh Reshammiya)

हिमेश रेशमिया आणि त्याची दुसरी पत्नी असलेल्या सोनिया कपूर यांनी नुकताच लग्नाचा वाढदिवस साजरा केला. हिमेशने सोनियासोबत दुसरे लग्न केले आहे. त्याचे पहिले लग्न १९९५ साली कोमलसोबत झाले होते, मात्र लग्नाच्या २२ वर्षांनी या दोघांनी घटस्फोट घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार या घटस्फोटाचे कारण होते हिमेश आणि सोनिया यांच्यात निर्माण झालेली जवळीक. या घटस्फोटावर भाष्य करताना कोमलने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “माझ्यात आणि हिमेशमध्ये खूपच चांगले बॉंडिंग आहे. आम्ही नेहमीच एकमेकांचा आदर ठेवतो. आम्ही दोघांनी मिळून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघेही एकमेकांचा नेहमीच आदर राखू कारण, मी त्या कुटुंबाचा हिस्सा होती आणि नेहमीच असेल. आमच्या दोघांमध्ये कम्पॅटिबिलिटी इशु असल्यामुळे आम्ही वेगळे झालो.” (Himesh Reshammiya)

सोनिया आणि हिमेशच्या नात्याबद्दल कोमलने सांगितले होते की, “या प्रकरणात कोणाला आणणे योग्य नाही. सोनिया या घटस्फोटासाठी अजिबातच जबाबदार नाही. आमचा मुलगा आणि कुटुंब सोनियाच्या खूपच जवळ आहे. ती देखील आमच्यासोबत घरातील सदस्यासारखी राहते”. या घटस्फोटावर हिमेशने सांगितले होते की, “मी आणि कोमलने वेगळे होण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला दोघांना किंवा आमच्या परिवारातील कोणाला याबद्दल अजिबात आक्षेप नव्हता. कोमल नेहमीच माझ्या कुटुंबाचा हिस्सा असेल आणि मी तिच्या.” कोमल आजही हिमेश ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्याच बिल्डिंगमध्ये राहते. (Himesh Reshammiya)

हिमेश आणि त्याची पहिली पत्नी कोमल

हिमेश आणि सोनिया यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास या दोघांमध्ये २००६ पासून जवळीक निर्माण झाली. पुढे त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. पुढे सोनिया हिमेशच्या घरी देखील जा ये करायची. मीडियामधील रिपोर्ट्सनुसार तर हिमेशने सोनियाचे खर्च देखील उचलण्यास सुरुवात केली. ते दोघे लिव्ह इनमध्ये देखील राहत होते. सुट्ट्यांसाठी देखील ते अनेकदा सोबत जायचे. मात्र हिमेशने या सर्व गोष्टी नाकारल्या होत्या. हिमेशने कधीच सोनिया आणि त्याच्या नात्यावर खुलेपणाने भाष्य केले नाही. मात्र जेव्हा २०१६ साली कोमलने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला तेव्हा सोनिया आणि त्याचे नाते सर्वांपुढे उघड झाले. पुढे २०१८ साली हिमेश आणि सोनियाने एकमेकांसोबत लग्न केले. (Himesh Reshammiya)

============

हे देखील वाचा – हृषिकेश आणि प्रियदर्शन निघाले ‘छुपे रुस्तम

============

आज हिमेश आणि सोनिया एकमेकांसोबत खुश असून ते नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फोटो शेअर करत असतात. तत्पूर्वी हिमेशने सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ सिनेमातून त्याच्या संगीतकार म्हणून करिअरला सुरुवात केली. पुढे हिमेशने एकापेक्षा एक हिट गाणी आणि म्युझिक अल्बम दिले आणि तो टॉपच्या संगीतकार आणि गायकांमध्ये सामील झाला. नाकातून गाण्याच्या आणि संत टोपीमध्ये राहण्याच्या त्याच्या स्टाइलने त्याला एक वेगळी ओळख दिली होती. (Himesh Reshammiya)

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...