Home मनोरंजन काही वर्षांपासून डेट करणारे साऊथमधील स्टार कपल विग्नेश आणि नयनतारा ‘या’ दिवशी अडकणार लग्नाच्या बेडीत
मनोरंजन

काही वर्षांपासून डेट करणारे साऊथमधील स्टार कपल विग्नेश आणि नयनतारा ‘या’ दिवशी अडकणार लग्नाच्या बेडीत

10
Nayanthara Vignesh Shivan
Nayanthara Vignesh Shivan

मागील काही दिवसांपासून मनोरंजनविश्वात अनेक लहान मोठे कलाकार लग्नाच्या बेडीत अडकताना दिसत आहे. रणबीर आणि आलिया यांच्या बिग बॅश लग्नानंतर अनेक कलाकारांच्या लग्नाच्या  बातम्या समोर आल्या. आता बॉलिवूडसोबतच टॉलिवूडमध्ये देखील लवकरच सनई चौघड्यांचे सूर ऐकायला येणार आहेत. दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मीडियामधील रिपोर्ट्सनुसार आता नयनतारा मागील काही काळापासून विग्नेश शिवनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आता या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. (Nayanthara Vignesh Shivan)

नयनतारा आणि विग्नेश यांनी यावर्षी ९ जून रोजी लग्न करण्याचे ठरवले आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील पॉवर कपल म्हणून विग्नेश शिवन आणि नयनतारा यांना ओळखले जाते. मागील बऱ्याच वर्षांपासून हे दोघं रिलेशनशिपमध्ये आहे. मिळणाऱ्या माहितीनुसार या दोघांनी त्यांच्या लग्नाचे स्थळ देखील निश्चित केले असून, येत्या ९ जून रोजी आंध्रप्रदेशमधील तिरुमाला तिरुपति मंदिरात त्यांनी लग्न करण्याचे ठरवले आहे. ‘एके 62’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वी हे कपल लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, विघ्नेश ‘एके 62’चे दिग्दर्शन करत आहे. मात्र, अद्याप या लग्नाबाबत या दोघांच्या बाजूने कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. (Nayanthara Vignesh Shivan)

या लग्नाबद्दल मीडियामध्ये येणाऱ्या माहितीनुसार विग्नेश आणि नयनतारा (Nayanthara Vignesh Shivan) यांचे लग्न एक खासगी समारंभ असणार असून ज्यात फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार सहभागी होणार आहेत. नयनताराने विग्नेश शिवन दिग्दर्शित आणि निर्मित ‘काथुवाकुला रेंदु काधल’ या सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत भरपूर वाहवा मिळवली. या सिनेमाच्या यशानंतर या दोघांनी अनेक मंदिरांमध्ये जाऊन देवाचे आशीर्वाद घेतले. यातच तिरुमाला तिरुपति मंदिराचा देखील समावेश होता. या मंदिरातील त्यांचा एक फोटो देखील तुफान व्हायरल झाला होता. (Nayanthara Vignesh Shivan)

======

हे देखील वाचा –किम शर्मा आणि लिएंडर पेस लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, कोर्ट मॅरेज करत देणार नात्याला नाव

======

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री असलेली नयनतारा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक विघ्नेश मागील ६ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांची प्रेमकहाणी कोणत्याही चित्रपटासारखीच आहे. ‘राउडी धान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती आणि त्यांची मैत्री झाली, मग पुढे ते प्रेमात पडले. या दोघांनी मागच्यावर्षी  २५ मार्च २०२१ रोजी साखरपुडा केला होता. त्यांच्या या साखरपुड्यानंतर त्यांच्या फॅन्सला आता त्यांच्या लग्नाची खूपच उत्सुकता लागून आहे. (Nayanthara Vignesh Shivan)

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...