Home मनोरंजन किम शर्मा आणि लिएंडर पेस लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, कोर्ट मॅरेज करत देणार नात्याला नाव
मनोरंजन

किम शर्मा आणि लिएंडर पेस लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, कोर्ट मॅरेज करत देणार नात्याला नाव

12
Kim Sharma and Leander Paes
Kim Sharma and Leander Paes

सध्या मनोरंजनविश्वातून अनेक सुखद बातम्या येत आहेत. अनेक कलाकार त्यांच्या लग्नाच्या घोषणा करत असून, काही सेलिब्रिटी लग्न केल्याचे जाहीर करत आहे. यातच आता अजून एक लोकप्रिय कपल लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा आणि टेनिसपटू लिएंडर पेस लवकरच विवाहबद्ध होणार असल्याचे समजत आहे. किम आणि लिएंडर पेस नेहमीच एकमेकांसोबत खास वेळ घालवताना दिसतात. त्यांच्या विविध व्हेकेशनचे फोटो, व्हिडिओ देखील नेहमीच व्हायरल होताना दिसतात. प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार, एका यशस्वी नात्यानंतर लवकरच लिएंडर पेस आणि किम शर्मा लग्नबंधनात अडकणार आहे.  (Kim Sharma and Leander Paes)

लिएंडर पेस आणि किम शर्मा (Kim Sharma and Leander Paes) यांच्या लग्नाबद्दल मीडियामध्ये जरी चर्चा होत असली तरी त्यांच्या लग्नाची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. या दोघांचे लग्न कोणत्याही प्रकारचा भव्य समारोह नसून अतिशय सध्या पद्धतीने होणार आहे. किम आणि लिएंडर कोर्ट मॅरेज करणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. अजून जरी या दोघांकडून लग्नाची माहिती समोर आली नसली तरी त्यांच्या लग्नाच्या बातमीमुळे फॅन्समध्ये खूपच आनंदाचे वातावरण आहे. (Kim Sharma and Leander Paes)

तसे पहिले तर मागील काही काळापासून नात्यात असणाऱ्या लिएंडर पेस आणि किम शर्मा यांच्या नात्याला त्यांच्या दोघांच्या आई-वडिलांनी देखील होकार दिला असून, त्यांना देखील हे नाते मान्य असल्याने त्यांच्या लग्नासाठी ही अधिकच सकारात्मक बाब असल्याचे सांगितले जात आहे. मीडियामधील बातम्यांनुसार लिएंडर पेस आणि किम शर्मा यांच्या आईवडिलांची मुंबईतच भेट झाली आणि त्यांनी लगेच या नात्यासाठी होकार दिला. किम शर्माच्या वांद्रेच्या घरी दोघांच्या आईवडिलांची भेट झाली आणि त्यांनी मिळून कोर्ट मॅरेज करण्याचे ठरवले आहे. याआधी कोलकातामध्ये देखील या सर्वांची भेट झाली होती. आता ही भेट आणि चर्चा सत्यात कधी उतरते हे बघणे महत्वाचे असेल. यासाठी या दोघांकडून या लग्नावर भाष्य होणे गरजेचे आहे. (Kim Sharma and Leander Paes)

======

हे देखील वाचा – ‘केजीएफ’ फेम ‘या’ दिग्गज अभिनेत्याचे बंगलोरमध्ये दुःखद निधन
======

नुकतेच या दोघांच्या नात्याला एक वर्ष पूर्ण झाले. मागच्यावर्षी या दोघांनी सप्टेंबर महिन्यात त्यांचे नाते जगजाहीर केले. या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. किमचे याआधी २०१० साली उद्योजक असलेल्या अली पुनजानीसोबत लग्न झाले होते. मात्र त्यांचे लग्न जास्त काळ टिकले नाही आणि त्यांनी २०१६ साली घटस्फोट घेतला. त्यानंतर किमचे नाव क्रिकेटर युवराज सिंगसोबत जोडले गेले. त्यानंतर ती हर्षवर्धन राणेला डेट करत असल्याच्या देखील मीडियामध्ये बातम्या आल्या होत्या. तसेच याआधी लिएंडर पेसचे महिमा चौधरीसोबत रिलेशन होते. शिवाय संजय दत्तची बायको असणाऱ्या रिया पिल्लईसोबत लिएंडर पेस लिव्ह इनमध्ये राहायचा. त्या दोघांना रिया नावाची मुलगी देखील आहे, जिचा जन्म २००५ साली झाला. आता या दोघांच्या नवीन नात्यासाठी त्यांचे नातेवाईक मित्र मंडळींसोबतच फॅन्सदेखील आतुर आहे. (Kim Sharma and Leander Paes)

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...