Home प्रेस रिलीझ झी मराठीवर नवी मालिका ‘सत्यवान सावित्री’
प्रेस रिलीझमनोरंजन

झी मराठीवर नवी मालिका ‘सत्यवान सावित्री’

11
Satyawan Savitri

आपल्या प्रेमावरील अतूट विश्वासाच्या जोरावर साक्षात यमराजांकडून पतीचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची (Satyawan Savitri) गोष्ट लवकरच प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे. सत्यवानावरील असिम प्रेमामुळे यमदेवांशी कुशलतेने संवाद साधण्याचं धैर्य सावित्रीच्या ठायी आलं. तिच्यातील कलागुणांनी तिला सामान्यातून असामान्य घडवलं.

तिची ही प्रेरणादायी गोष्ट तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, या हेतूने झी मराठी वाहिनीने ही कथा दैनंदिन मालिकेतून सादर करण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. नेहमीच प्रयोगशील आणि वेगळ्या विचार करणाऱ्या झी मराठी वाहिनीची ही कलाकृती प्रेक्षकांना नक्की आवडेल.

महाभारताच्या वनपर्वातील एक उपकथानक म्हणून आलेली सत्यवान-सावित्रीची (Satyawan Savitri) गोष्ट सर्वांनाच माहित आहे. परंतु ही सावित्री कोण होती, कशी होती, तिची आणि सत्यवानाची भेट कशी झाली, तिच्याकडे असं कोणतं सामर्थ्य होतं की ज्यामुळे तिने सत्यवानाचे प्राण परत आणले. याचं आजवर प्रत्येकालाच कुतूहल आहे.

====

हे देखील वाचा: ‘फनरल’ चित्रपटाच्या प्रचाराचा पवित्रस्थळी शुभमुहूर्त

====

अश्वपती राजाची लाडकी कन्या ते सत्यवानाशी लग्न झाल्यावर सासरच्या कुळाचा सन्मान वाढवणारी आदर्श सून हा प्रवास सावित्रीसाठी अतिशय खडतर होता. यासाठी तिला असंख्य संकटांचा सामना करावा लागला.

झी मराठी वाहिनीवर भव्य-दिव्यपणे सादर होणारी ही मालिका प्रेक्षकांना सत्यवान-सावित्रीच्या मनोहारी विश्वात घेऊन जाणार आहे. सत्यवान आणि सावित्री यांच्या प्रेमाची आणि निष्ठेची ही कथा आहे. या मालिकेचं दृश्यरुप प्रेक्षकांना आश्चर्यचकीत करणारं असणार आहे. असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी निर्धार आणि योग्य निर्णय घ्यावा लागतो. तसेच जीवघेण्या संकटावर मात करण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती असावी लागते, हे आपल्याला सत्यवान-सावित्रीच्या गोष्टीतून अनुभवता येणार आहे.

====

हे देखील वाचा: ‘तिरसाट’ चित्रपटाचा टीजर लाँच

====

या मालिकेची निर्मिती द फिल्म क्लिक यांनी केली असून आदित्य दुर्वे आणि वेदांगी कुलकर्णी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेचा प्रोमो नुकतंच प्रेक्षकांनी वाहिनीवर पाहिला आणि प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. सत्यवान-सावित्रीचं असीम प्रेम आणि सावित्रीचा सामान्यातून असामान्य प्रवास कसा होता, हे पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी सत्यवान-सावित्री ही मालिका झी मराठीवर १२ जूनपासून संध्याकाळी ७ वाजता येत आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...