Home प्रेस रिलीझ ‘तिरसाट’ चित्रपटाचा टीजर लाँच
प्रेस रिलीझमनोरंजन

‘तिरसाट’ चित्रपटाचा टीजर लाँच

10
'तिरसाट'

आयुष्यातली सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम… हे प्रेम मिळवण्यासाठी किती धडपड करावी लागते, त्यासाठी किती काय काय झेलावं लागतं याची थरारक गोष्ट तिरसाट या चित्रपटातून उलगडणार आहे. २० मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीजर नुकताच लाँच (Tirsaat Marathi Movie Teaser Launch) करण्यात आला.

दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सनं तिरसाट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अँड. उमेश शेडगे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे.

====

हे देखील वाचा: बालकलाकार स्वराली कामथेचं ‘जिप्सी’ चित्रपटातून पदार्पण

====

तर प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. पी. शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

प्रेम मिळवण्यासाठी सहन करावा लागणारा विरोध, प्रेमासाठी करावी लागणारी धडपड टीजरमधून दाखवण्यात आली आहे. त्यामुळे तिरसाट हा चित्रपट उत्सुकता वाढवत आहे.

====

हे देखील वाचा: ‘वीर दौडले सात’चं मोशन पोस्टर रिलीज

====

काही दिवसांपूर्वीच चित्रपटातलं उधाण आलंया, फरमान आलंया, जीवाला या जीवाचं आवताण आलंया,’ असे शब्द असलेलं गाणं लाँच करण्यात आलं. या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आता या टीजरमुळे आता चित्रपटाची आणखी चर्चा सुरू झाली आहे

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...