Home प्रेस रिलीझ अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने झळकले ‘तमाशा लाईव्ह’चे टिझर
प्रेस रिलीझमनोरंजन

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने झळकले ‘तमाशा लाईव्ह’चे टिझर

10
Tamasha Live Teaser

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) या चित्रपटातील ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचा भन्नाट टिझर (Tamasha Live Teaser) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, भरत जाधव यांच्या भूमिका आहेत.

टीझरमध्ये सिद्धार्थ म्हणतो बातमी तर रंगणारच… सोनाली आणि सचितही एकच वाक्य बोलत आहेत, आता कोणत्या दगडाला शेंदूर फासणार? हे नेमकं काय प्रकरण आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना २४ जूनला मिळणार आहे. याशिवाय ‘तमाशा लाईव्ह’मध्ये सचित आणि सोनालीचा रॉकिंग डान्सही पाहायला मिळत आहे. यात पाश्चिमात्य नृत्यासोबतच महाराष्ट्राची लोककलाही झळकत असून नृत्याला दिलेले हे आधुनिक रूप ही या चित्रपटाची खासियत आहे.

‘तमाशा लाईव्ह’बद्दल दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, ” ‘तमाशा लाईव्ह’च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात अतिशय कसलेले कलाकार, तगडी संगीत टीम आहे. हा एक संगीतमय चित्रपट असला तरी त्याला आधुनिकतेची जोड लाभली आहे. चित्रीकरणाआधी आमची अडीच महिने कार्यशाळा सुरु होती. कार्यशाळेच्या सुरुवातीलाच या कलाकारांना व्यक्तिरेखेशी एकरूप होणे जरा कठीण जात होते. त्या व्यक्तिरेखेला शंभर टक्के न्याय मिळत नसल्याची भावना कलाकारांकडून व्यक्त होत होती. मात्र अडीच महिन्यांनी हे चित्र पूर्णपणे पालटले.

====

हे देखील वाचा: उन्हळ्याच्या सुट्टीत म्हणा ‘हुतूतू हूतूतूतू,’ ‘भारत माझा देश आहे’ तील गाणे प्रदर्शित

====

मला आठवते, चित्रीकरण संपल्यानंतर एकदा एडिटला बसल्यावर मला सोनालीची एक लाईन सापडत नव्हती आणि ती त्यावेळी एका चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. मी तिला फोन केला आणि अल्पावधीतच तिने मला व्हॉट्सअपवर संपूर्ण सीन रेकॉर्ड करून पाठवला. एवढी ती त्या व्यक्तिरेखेशी एकरूप झाली होती आणि तीच नाही तर चित्रपटातील प्रत्येक कलाकार अडीच महिन्यांनी आपापल्या व्यक्तिरेखेशी जोडले गेले होते.

‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” ज्या वेळी संजय जाधवने ‘तमाशा लाईव्ह’ची संकल्पना मला ऐकवली, तेव्हाच मला यात काहीतरी अफलातून असल्याचे जाणवले. ‘तमाशा लाईव्ह’ या धमाकेदार नावातच खूप काही दडले आहे. जे चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना कळेलच. हा एक मल्टीस्टारर चित्रपट असून चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेची निवड ही अतिशय अचूक आहे.

====

हे देखील वाचा: महेश मांजेरकराच्या आगामी चित्रपटाची घोषणा, मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची साकरणार महाकलाकृती

====

या चित्रपटाच्या निमित्ताने शास्त्रीय संगीतातील शौनक अभिषेकी, आनंद भाटे, राहुल देशपांडे आणि अनुराधा कुबेर हे दिग्गज एकत्र आले आहेत. त्यामुळे हा एक खूप भव्यदिव्य असा जागतिक पातळीचा चित्रपट आहे. संजय जाधवच्या डोक्यात काही गोष्टी पक्क्या असल्याने त्या चित्रपटात उतरवणे त्याला खूप सोपे जाते आणि त्यातूनच मग एक उत्तम कलाकृती घडते.”

प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्मिती ‘तमाशा लाईव्ह’ची कथा मनीष कदम यांनी लिहिली आहे. तर संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत असलेल्या या चित्रपटातील गाण्यांचे बोल क्षितिज पटवर्धन यांचे आहेत. त्यामुळे ही म्युझिकल ट्रीट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...