Home मनोरंजन तापसीचा ‘शाबास मिथू’ झळकणार ‘या’ दिवशी रुपेरी पडद्यावर
मनोरंजन

तापसीचा ‘शाबास मिथू’ झळकणार ‘या’ दिवशी रुपेरी पडद्यावर

8
Shabaash Mithu

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsi Pannu) स्टारर ‘शाबास मिथू’ (Shabaash Mithu) ची रिलीज डेट समोर आली आहे. शुक्रवारी चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना अभिनेत्री तापसी पन्नूने सांगितले की, हा चित्रपट जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. शाबास मिथू हा चित्रपट भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या करिअरबद्दल सांगणार आहे.

आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून तिने आपल्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर कसे पोहोचले हे मोठ्या पडद्यावर प्रत्येकाला सांगितले जाईल. विशेष म्हणजे, मिताली राजची 23 वर्षांची कारकीर्द, तिने सलग सात वेळा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 धावा करण्याचा विक्रम केला आहे. यासोबतच मिताली राजने 4 वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे.

shabaash mithu release date: 'Shabaash Mithu', a biopic on cricketer  Mithali Raj starring Taapsee Pannu, to release on July 15 - The Economic  Times

====

हे देखील वाचा: हे चार चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर देणार टक्कर

====

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करताना, अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्टर शेअर केली आहे. तापसी लिहिते, “काहीतरी घडवून आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलीपेक्षा कोणीही शक्तिशाली असू शकत नाही. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी एक योजना आहे! ही एका मुलीची कथा आहे जिने या “जंटलमन्स गेम” मध्ये प्रवेश केला. बॅट उचलून स्वप्नाचा पाठलाग केला. हा चित्रपट 15 जुलै 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.”

भारतीय महिला संघाच्या कर्णधाराची भूमिका साकारण्यासाठी तापसीने विशेष क्रिकेट प्रशिक्षण घेतले आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तापसीने चाहत्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी अनेक फोटोही शेअर केले आहेत. लंडन, यूके येथील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर शूट करण्यासाठी अभिनेत्री खूप उत्साहित होती आणि तिथल्या शूटचे फोटोही शेअर केले. सृजित मुखर्जी दिग्दर्शित आणि प्रिया एवेन लिखित शाबास मिथू 15 जुलै 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

====

हे देखील वाचा: दीपिका पादुकोणपूर्वी ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये केलं परीक्षण

====

मार्च महिन्याच्या सुरुवातीला ‘शाबास मिथू’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. 1 मिनिटांच्या टीझरमध्ये अभिनेत्री तापसी पन्नूला प्रेक्षकांच्या गर्जना ऐकून स्टेडियममध्ये प्रवेश करताना दाखवण्यात आले आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...