Home मनोरंजन मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवतरली ‘चंद्रमुखी’
मनोरंजन

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवतरली ‘चंद्रमुखी’

9
'चंद्रमुखी'

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारी एकदम गजबजून गेले होते. सर्वत्र ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल घुमत होते. या उत्साही वातावरणात या विमानतळावर लावण्यवती ‘चंद्रमुखी’ अवतरली होती.

आपल्या साजशृंगार, मोहमयी नजाकती, अदांनी ‘चंद्रा’ने उपस्थितांना घायाळ केले. यावेळी ‘चंद्रा’ने सादर केलेल्या या नृत्यात हवाईसुंदरींनीही ठेका धरला. मराठी सिनेसृष्टीत एखाद्या चित्रपटाला अशा प्रकारे प्रसिद्धी देण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. स्पाईसजेटच्या विमानावर यावेळी ‘चंद्रमुखी’चे पोस्टरही झळकले.

====

हे देखील वाचा: ‘C.I.D.’ फेम दयामुळे विशाखा सुभेदारने सोडली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’!!?

====

सध्या सर्वत्र प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’चीच हवा आहे. जिथे पाहावे तिथे ‘चंद्रा’ अवतरत आहे. पुण्यातील मेट्रोमध्ये प्रवाशांना आपल्या सूरतालात दंगवल्यानंतर आता ‘चंद्रा’ने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपला जलवा सादर केला.

या दरम्यान ‘चंद्रा’ म्हणजेच अमृता खानविलकर आणि ‘दौलतराव देशमाने’ म्हणजेच आदिनाथ कोठारे यांनी २९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा ‘चंद्रमुखी’ सर्व प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा, असे आवाहनही केले.

====

हे देखील वाचा: लगन’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित

====

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कंपनी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाईटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्यासह मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, अशोक शिंदे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अन्य प्रमुख कलाकार आहेत.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...