Home मनोरंजन रोहित शेट्टीची पहिली वहिली वेबसिरीज ‘इंडियन पुलिस फोर्स’मध्ये विवेक ओबेरॉयची एन्ट्री
मनोरंजन

रोहित शेट्टीची पहिली वहिली वेबसिरीज ‘इंडियन पुलिस फोर्स’मध्ये विवेक ओबेरॉयची एन्ट्री

9
vivek oberoi
vivek oberoi

आपल्या दमदार ॲक्शनमुळे आणि तुफान कॉमेडीमुळे ओळखला जाणारा हिट दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी. रोहितचा सिनेमा म्हटले की, हवेत उडणाऱ्या गाड्या, कमालीची ॲक्शन आणि त्याला कॉमेडीची खमंग फोडणी. सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये हिट चित्रपटांची ग्यारंटी असलेला रोहित लवकरच वेबसिरीजच्या माध्यमातून ओटीटी माध्यमावर पदार्पण करत आहे. ‘इंडियन पुलिस फोर्स’ असे त्याच्या पहिल्या वहिल्या वेबसिरीजचे नाव असून या सिरीजमध्ये अनेक मोठमोठे कलाकार पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी या सिरीजमध्ये असणार आहे हे तर सर्वश्रुत आहे. मात्र आता या सिरीजमध्ये अजून एका बड्या अभिनेत्यांची एन्ट्री झाली आहे. ‘इंडियन पुलिस फोर्स’ या रोहितच्या सिरीजमध्ये विवेक ओबेरॉयदेखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती खुद्द विवेकनेच सोशल मेडियावरून दिली आहे. या माहितीसोबतच त्याने त्याचा लुक देखील जाहीर केला आहे. विवेकने इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली असून यासोबतच त्याने त्याचा एक फोटो देखील शेअर केला आहे.  

विवेकने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “सर्वश्रेष्ठ बल, “इंडियन पुलिस फोर्स”मध्ये सहभागी होऊन आणि रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये सुपरकॉप बनण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे. या अद्भुत अशा भूमिकेसाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद भावा. माझ्या अन्य दोन सुपर पोलीस सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी यांना देखील धन्यवाद. खाकीमध्ये वीरता.” विवेकने शेअर केलेल्या त्याच्या फोटोमध्ये तो खाकी वर्दीमधे दिसत असून, त्यावर त्याने बुलेटप्रूफ जॅकेट देखील घातले आहे. डोळ्यांवर गॉगल आणि हातात बंदूक अशा डॅशिंग लूकमध्ये विवेक कमाल दिसत आहे. सध्या रोहितच्या या सीरीजचे शूटिंग चालू असून लवकरच ही सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे. 

=======

हे देखील वाचा – ‘भूल भुलैया २’ सिनेमाच्या पोस्टरमधून दिसला कलाकारांचा दमदार अंदाज, ट्रेलरने दिली सिनेमाच्या यशाची ग्यारंटी 

=======

विवेक ओबेरॉयच्या या पोस्टनंतर त्याचे फॅन्स त्याला या अवतारात बघण्यासाठी खूपच उत्साहित दिसत आहे. विवेकच्या पोस्टवर सध्या कमेंट्सचा वर्षाव होत असून फॅन्सला त्याला शुभेच्छा देण्यासोबतच सीरीजमध्ये बघण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत आहे. या सीरिजबद्दल सांगताना रोहित म्हणाला होता की, “भारतीय पोलीस दल माझ्यासाठी नेहमीच खास आहे आणि मी अनेक वर्षांपासून यावर काम करत होतो. मी अमेझॉन प्राईमसोबत सहयोग करून खुश आहे. या माध्यमातून जगातील सर्वच प्रेक्षक या सीरीजचा आनंद घेऊ शकतात.”

रोहित शेट्टीने आतापर्यंत गोलमाल, बोलबच्चन, सिंघम, सिंघम २, दिलवाले, सिम्बा, सूर्यवंशी आदी अनेक हिट सिनेमे दिले आहेत. याशिवाय तो टीव्ही क्षेत्रात देखील ‘खतरो के खिलाडी’ शोचे सूत्रसंचालन करताना दिसतो. आता या सीरिजच्या माध्यमातून त्याने ओटीटी मध्यमातून एन्ट्री घेत आहे. 

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...