Home मनोरंजन “तिरसाट” चित्रपट २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
मनोरंजन

“तिरसाट” चित्रपट २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

12
"तिरसाट"

‘उधाण आलंया, फर्मान आलंया, जीवाला या जीवाचं आवताण आलंया,’ असे शब्द असलेलं “तिरसाट” चित्रपटातलं श्रवणीय गाणं नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. अल्पावधीतच सोशल मीडियावर या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून २० मे रोजी “तिरसाट” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सनं “तिरसाट” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अॅड. उमेश शेडगे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे.

पी. शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.निलेश कटके लिखित “फर्मान आलंया” हे गीत पी. शंकरम यांच्याच आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे, नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

====

हे देखील वाचा: ‘भारत माझा देश आहे’ मध्ये झळकणार तुझ्यात जीव रंगला फेम लाडू

====

अतिशय सुंदर शब्द, तितकंच श्रवणीय संगीत आणि अप्रतिम असं छायांकन या गाण्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे या गाण्याला प्रेक्षक पसंतीची पावती मिळाली आहे. आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा विचार “तिरसाट” या चित्रपटातून मांडण्यात आला असून नकार सकारात्मकतेनं पचवला की आयुष्याला अर्थ येतो या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...