Home मनोरंजन ‘भूल भुलैया २’ सिनेमाच्या पोस्टरमधून दिसला कलाकारांचा दमदार अंदाज, ट्रेलरने दिली सिनेमाच्या यशाची ग्यारंटी 
मनोरंजन

‘भूल भुलैया २’ सिनेमाच्या पोस्टरमधून दिसला कलाकारांचा दमदार अंदाज, ट्रेलरने दिली सिनेमाच्या यशाची ग्यारंटी 

11
bhool bhulaiyaa 2
bhool bhulaiyaa 2

बॉलिवूडचा हँडसम आणि चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्तिक आर्यनने खूपच कमी वेळात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या लुक्सने आणि अभिनयाने सर्वांनाच त्याने त्याची दखल घ्यायला भाग पाडले आहे. सध्या कार्तिक त्याच्या आगामी ‘भूल भुलैया २’ (bhool bhulaiyaa 2) सिनेमामुळे चांगलाच मीडियामध्ये गाजत आहे. आपल्या प्रत्येक सिनेमातून प्रेक्षकांसमोर काहीतरी वेगळे देणारा कार्तिक या सिनेमातूनही रसिकांसाठी काहीतरी खास आणि हटके घेऊन येणार आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचे पहिले पोस्टर नुकतेच समोर आले.

‘भूल भुलैया २’ (bhool bhulaiyaa 2) या सिनेमात असणारी सर्वच कास्ट या पोस्टरमध्ये दिसत असून, प्रत्येक कलाकार त्याच्या भूमिकेतून स्वतःची एक छाप पाडताना दिसत आहे. अतिशय रंजन असणारे हे पोस्टर कार्तिक आणि कियारा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे. या पोस्टरमधून प्रत्येक कलाकाराचा लूक देखील जाहीर झाला असून कार्तिक आणि कियारासोबत इतर कलाकारही दमदार भूमिकांमधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. सध्या सर्वत्र फक्त या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरची चर्चा असून, नेटकऱ्यांनी या पोस्टवर भरभरून कमेंट्स करत पोस्टर आवडल्याची पोचपावती दिली आहे. 

कार्तिक आर्यनने हे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “रुह बाबा आणि फॅमिली आज येत आहे. ट्रेलर लवकरच” या सिनेमाच्या ट्रेलरबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या टीझरमुळे तर ‘भूल भुलैया २’ (bhool bhulaiyaa 2) सिनेमाच्या ट्रेलरबद्दल अधिकच उत्सुकता ताणली गेली आहे. या पोस्टरवर फॅन्ससोबतच कलाकारांनी देखील कमेंट्स करत ट्रेलरबद्दल उत्सुकता असल्याचे सांगितले आहे.

=====

हे देखील वाचा – ब्रेस्ट कॅन्सरशी लढणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने सर्जरीपूर्वी शेअर केला तिचा व्हिडिओ, सकारात्मकता पाहून फॅन्स झाले भावुक 
=====

‘भूल भुलैया २’ (bhool bhulaiyaa 2) सिनेमाच्या पोस्टरनंतर आज ट्रेलरही प्रदर्शित झाला असून, ट्रेलरमध्ये सिनेमातील सर्वच कलाकार दिसत आहे. कार्तिक आर्यन सिनेमात एका तांत्रिकाच्या भूमिकेत दिसणार असून, तो भूत दिसत असल्याचा दावा करतो. तर कियारा अडवाणीच्या अंगात मंजुलिकाची आत्मा असते. यासोबतच तब्बू देखील दमदार भूमिकेत दिसत असून तिचा अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राजपाल यादवची कॉमेडी देखील सिनेमात वेगळे रंग भरताना दिसत आहे. हा सिनेमा नक्कीच भूल भुलैया इतकाच यशस्वी होणार यात शंका नाही. 

कार्तिक आर्यन सध्या ‘भूल भुलैया २’ (bhool bhulaiyaa 2) सिनेमात व्यस्त असला तरी त्याच्या हातात अनेक चांगले सिनेमे आहेत. मागच्यावर्षी तो ‘धमाका’ सिनेमातून सर्वांसमोर आला होता. आता ‘भूल भुलैया २’नंतर शहजादा, कॅप्टन इंडिया, सत्यनारायण की कथा आदी चित्रपटनमध्ये दिसणार आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...