Home मनोरंजन नॅशनल क्रश रश्मिका मंदानासोबत व्हायरल झाला रणबीर कपूरचा फोटो 
मनोरंजन

नॅशनल क्रश रश्मिका मंदानासोबत व्हायरल झाला रणबीर कपूरचा फोटो 

12
Ranbir and Rashmika Mandanna leaked
Ranbir and Rashmika Mandanna leaked

पूर्वी माणसाच्या तीन मुख्य गरजा अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुख्य होत्या. मात्र आजच्या आधुनिक काळात अन्न, वस्त्र, निवारा या तीन गरजांमध्ये सोशल मीडिया ही चौथी गरज जोडली गेली आहे. सोशल मीडियाच्या येण्यामुळे मनुष्याचे जीवन पूर्णपणे बदलून गेले आहे. अगदी लहानातल्या लहान गोष्टीपासून ते मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत सर्वच बाबी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. या सोशल मीडियाचे जेवढे फायदे तेवढे तोटे देखील आहेत. या सोशल मीडियाचा सर्वात मोठा तोटा कोणाला होत असेल तर तो सिनेसृष्टीला बसत आहे. कोणत्याही चित्रपटाबद्दल किंवा आगामी कलाकृतीबद्दल गुपित ठेवणे यामुळे अवघड झाले आहे. चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील तर बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि सिनेमाशी संबंधित अनेक गोष्टी बाहेर येतात. (Ranbir and Rashmika Mandanna leaked)

आता देखील असेच काही झाले आहे. रणबीर कपूर लवकरच ‘ॲनिमल’ नावाच्या चित्रपटात दिसणार असून, सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. संदीप रेड्‌डी वांगा दिग्दर्शित हा सिनेमा पुढच्या वर्षी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. मनालीमध्ये सुरू असलेल्या सिनेमाच्या शूटिंग सेटवरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे (Ranbir and Rashmika Mandanna leaked). या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना दिसत आहे. या फोटोमध्ये रणबीर कपूर पांढऱ्या रंगाच्या कुर्ता पायजमामध्ये दिसत आहे, तर रश्मिकाने पांढऱ्या रंगाची लाल बॉर्डर असणारी साडी नेसली आहे. एका फॅनने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना आतापासूनच उत्सुकता आहे. (Ranbir and Rashmika Mandanna leaked)

https://twitter.com/arthwrites/status/1517731890014285824

सर्वात आधी या सिनेमात रणबीर कपूरसोबत परिणीती चोप्रा दिसणार होती. तिच्या नावाची घोषणा देखील करण्यात आली, मात्र तिच्याकडे असलेल्या तारखांच्या कमतरतेमुळे तिने हा सिनेमा सोडला आणि त्यानंतर ‘ॲनिमल’मध्ये रश्मिका मंदानाची एन्ट्री झाली आहे. या सिनेमात रश्मिका रणबीर कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांना या सिनेमात एक नवीन आणि फ्रेश जोडी पाहिजे होती त्यामुळे रश्मिकाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. (Ranbir and Rashmika Mandanna leaked)

=========

हे देखील वाचा – लग्नाच्या बातम्यांमुळे मीडियामध्ये गाजणाऱ्या कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचा झाला ब्रेकअप?

=========

तत्पूर्वी १४ एप्रिल रोजी रणबीर कपूरने त्याची गर्लफ्रेंड असलेल्या आलिया भट्टसोबत लग्न केले. त्यांचे लग्न अतिशय खासगी आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. लवकरच रणबीर आणि आलिया अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात दिसणार आहे. तर रश्मिका काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ सिनेमात अल्लू अर्जुनसोबत दिसली होती हा सिनेमा तुफान गाजला.(Ranbir and Rashmika Mandanna leaked)

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...